Chanakya Niti : आयुष्यात या 4 लोकांपासून नेहमी दूर राहा, अन्यथा एक दिवस मोठ्या संकटात सापडाल, चाणक्य काय म्हणतात?

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी चांगल्या माणसांना काही विशिष्ट स्वभावाच्या लोकांपासून नेहमी दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. चाणक्य म्हणतात त्यातच तुमचं हीत आहे.

Chanakya Niti : आयुष्यात या 4 लोकांपासून नेहमी दूर राहा, अन्यथा एक दिवस मोठ्या संकटात सापडाल, चाणक्य काय म्हणतात?
chankya
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 12, 2026 | 8:54 PM

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्ततज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजही आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगी पडतात. आर्य चाणक्य आपल्या या ग्रंथामध्ये म्हणतात की या समाजात हजारो स्वभावाचे, सवयीचे लोक असतात. समाजात व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात. समाजात सर्वच लोक वाईट असतात असंही नाही, आणि सर्वच लोक हे चांगले असतात असंही नाही. त्यामुळे आपल्याला वाईट लोक हे ओळखता आले पाहिजेत. अशा लोकांपासून तुम्ही चार हात दूरच राहिलं पाहिजे. जर तुम्ही अशा लोकांसोबत जवळीक वाढवली तर एक दिवस तुम्ही नक्कीच मोठ्या संकटात सापडला, मात्र तोपर्यंत वेळ निघून गेलेली असेल. त्यामुळे तुमच्या हातात पश्चताप करण्याशिवाय इतर कोणताही मार्ग नसेल असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

वाईट लोकांपासून नेहमी दूर राहा – आर्य चाणक्य म्हणतात दुर्गुणी लोकांची कधीही संगत करू नये. अशा लोकांची संगत एक दिवस तुम्हाला अडचणीत आणते. एखाद्या व्यक्तीला एखादं वाईट व्यसन आहे, खोट बोलण्याची किंवा चोरी करण्याची सवय आहे, किंवा तो जुगार खेळतो, अशा लोकांशी तुम्ही कधीही मैत्री करू नका. कारण आयुष्यात चांगल्या गोष्टींची सवय लागण्यासाठी खूप वेळ जातो, मात्र ज्या वाईट गोष्टी आहेत. त्यांची सवय लगेच लागते. जर या सवयी तुमच्या मित्रांमुळे तुम्हाला लागल्या तर तुम्ही तुमच्या संसाराचं वाटोळ कराल, त्यामुळे अशा लोकांपासून चार हात दूर राहण्यातच तुमचं हीत आहे, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

मूर्ख लोक – चाणक्य म्हणतात जे लोक अज्ञानी असतात मूर्ख असतात अशा लोकांशी कधीही मैत्री करू नका. त्यांना उपदेश देण्याच्या भानगडीमध्ये पडू नका. कारण तुमच्या उपदेशाचा त्यांच्यावर कोणताही परिणाम होत नाही. उलट त्यांच्यामुळे तुम्ही अडचणीत येतात, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

नकारात्मक लोक – चाणक्य म्हणतात जे लोक कायम नकरात्मक विचार करतात, त्यांना त्यांच्या आयुष्यात कधीही काही सकारात्मक दिसतच नाही, अशा लोकांपासून माणसाने नेहमी दूर राहिलं पाहिजे, कारण त्यांच्या नकरात्मकतेचा तुमच्या आयुष्यावर परिणाम होऊ शकतो. हा भविष्यात तुमच्यासाठी फार मोठा धोका ठरू शकतो.

आळशी लोक – चाणक्य म्हणतात तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात यश मिळवायचं असेल तर कष्टाला पर्याय नाही. त्यामुळे मानसाने नेहमी आळशी लोकांपासून दूर रहावं.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us