AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : या 5 लोकांपासून कायम दूर रहावे, अन्यथा आयुष्यातील अडचणी वाढतच जातील

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, ते आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये म्हणतात या जगात असे काही लोक असतात, त्यांच्यापासून नेहमी दूर राहिलं पाहिजे. अशा लोकांसोबत केलेली जवळीक तुम्हाला महागात पडू शकते, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

Chanakya Niti : या 5 लोकांपासून कायम दूर रहावे, अन्यथा आयुष्यातील अडचणी वाढतच जातील
chanakya nitiImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 25, 2026 | 8:07 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी म्हटलं की जगातील सर्वच लोक हे चांगले असतात असं नाही किंवा जगातील सर्वच लोक हे वाईट असतात असं देखील नाही. त्यामुळे तुम्हाला चांगली माणसं आणि वाईट माणसं यातील फरक ओळखता आला पाहिजे. ज्या लोकांना हा फरक ओळखता येतो, अशी लोक आयुष्यात यशस्वी होतात. मात्र ज्या लोकांना आपल्यासाठी चांगलं कोण? वाईट कोणं यातील फरक ओळखता येत नाही, त्यांचं भविष्यात फार मोठं नुकसान होतं. अशी लोक कोणावरही लगेच विश्वास ठेवतात. पुढे अशा लोकांचा विश्वासघात होण्याची शक्यता असते. मात्र त्यावेळी तुमच्या हातातून वेळ निघून गेलेली असते. जगात असे काही लोक आहेत, ज्यांची संगत तुम्ही टाळली पाहिजे, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

नकारात्मक विचार करणारी माणसं – चाणक्य म्हणतात जे लोक सतत नकारात्मक विचार करतात. प्रत्येक गोष्टीमध्ये काही न काही चूक काढतातच. अशा लोकांपासून तुम्ही नेहमी सावध राहिलं पाहिजे. कारण अशा लोकांमुळे तुमचं मोठं नुकसान होण्याची शक्यता असते.

वाईट संगत – चाणक्य म्हणतात जी लोक व्यसनाच्या आहारी गेलेली असतात, अशा लोकांसोबत कधीही मैत्री केली नाही पाहिजे. कारण तुम्ही जर अशा लोकांच्या संगतीमध्ये राहिलात तर तुमचं आयुष्यात फार मोठं नुकसान होऊ शकतं. तुम्हालाही व्यसनाची सवय लागू शकते.

स्वार्थी लोक – चाणक्य म्हणतात जे लोक स्वार्थी असतात, ते आपल्या फायद्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. त्यामुळे तुम्ही जर अशा लोकांसोबत मैत्री केली तर तुम्ही अडचणीत सापडू शकतात. त्यामुळे अशा लोकांपासून नेहमी सावध राहिलं पाहिजे.

दुटप्पी लोक – चाणक्य म्हणतात जे लोक आपल्या वक्तव्यावर ठाम नसतात. अशा लोकांसोबत केलेली मैत्री महागात पडू शकते. त्यामुळे तुम्ही मोठ्या संकटात सापडू शकतात. त्यामुळे अशा लोकांसोबत मैत्री करू नये, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

मत्सर करणारे लोक – चाणक्य म्हणतात जे लोक तुमचा द्वेष करतात. जे लोक तुम्हाला आनंद झालेला असताना दु:खी होतात, अशा लोकांपासून नेहमी दूरच रहावे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?