Chanakya Niti : चाणक्य म्हणतात ‘अशा’ पुरुषांच्या प्रेमात वेड्या होतात स्त्रीया
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत आणि कुटनीती तज्ज्ञ होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये आर्य चाणक्य यांनी आदर्श पुरुषांची लक्षणं सांगितली आहेत.

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये त्यांनी अनेक विषयावर चर्चा केली आहे, हा ग्रंथ आजही अनेकांना आपलं जीवन जगताना मार्गदर्शक ठरतो. आर्य चाणक्य यांनी चाणक्य नीती या ग्रंथामध्ये जीवन जगत असताना कोणत्या गोष्टी कराव्यात? कोणत्या गोष्टी करू नयेत? आपला खरा मित्र कसा असावा? शत्रू कसा ओळखावा, आदर्श पत्नी कोणाला म्हणावं, आदर्श पत्नीची लक्षणं काय आहेत? आदर्श पती कसा असतो? राजाचा आपल्या प्रजेसोबत व्यवहार कसा असावा? असा एकना अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.
दरम्यान आर्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीतीमध्ये आदर्श पुरुषांची काही लक्षणं सांगितली आहेत, चाणक्य म्हणतात अशा पुरुषांच्या प्रेमात महिला वेड्या होतात. स्त्रीया आपल्या जोडीदारांकडून याच गुणांची अपेक्षा करतात. चला तर मग जाणून घेऊयात आर्य चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे ते?
आर्य चाणक्य म्हणतात कुठलीही स्त्री आपल्या जोडीदाराकडून किंवा होणाऱ्या पतीकडून प्रामाणिकपणाची अपेक्षा करत असते, जर एखाद्या स्त्रीला एखाद्या पुरुषामध्ये प्रमाणिकपणा दिसला तर ती त्याच्याकडे आकर्षिक होऊ शकते, आपल्याला प्रामाणिक जोडीदार हवा अशी प्रत्येक महिलेची इच्छा असते.
चाणक्य म्हणतात आणखी एक अशी गोष्ट आहे की जीची स्त्रीया या नेहमी आपल्या जोडीदाराकडून अपेक्षा करतात ती म्हणजे जेव्हा आपली बायको किंवा प्रेयेसी आपल्यासोबत बोलत असेल तर तिची अपेक्षा असते की आपल्या जोडीदारानं आपलं बोलणं काळजीपूर्वक ऐकलं पाहिजे, तुम्ही जर तुमच्या जोडीदाराचं बोलणं काळजीपूर्वक ऐकत असाल तर तुमचा संसार सुखाचा होऊ शकतो असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
चाणक्य पुढे म्हणतात की, तुम्ही कधीही खोट बोलू नका, तुम्ही जर तुमच्या जोडीदारासोबत खोटं बोलत असाल तर ही गोष्ट ती कधीच स्विकारू शकत नाही, त्यामुळे तुमच्यामध्ये वाद देखील होऊ शकतात. प्रत्येक स्त्री आपल्या जोडीदाराकडून खरेपणाची अपेक्षा करत असते.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)