Chanakya Niti : चाणक्य म्हणतात तोच खरा हुशार माणूस, जो या चार गोष्टी नेहमी गुप्त ठेवतो

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, अर्थतज्ज्ञ होते आणि कुटनीतीतज्ज्ञ देखील होते. चाणक्य म्हणतात माणसाच्या आयुष्यात अशा काही गोष्टी असतात, ज्या नेहमी गुप्त ठेवल्या पाहिजेत, त्यातील काही गोष्टी या पत्नीला देखील सांगता कामा नये, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

Chanakya Niti : चाणक्य म्हणतात तोच खरा हुशार माणूस, जो या चार गोष्टी नेहमी गुप्त ठेवतो
Chanakya Niti
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 16, 2026 | 9:27 PM

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. आर्य चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी त्यांच्या आयुष्यात त्यांना जे अनुभव आले, ते त्यांनी मांडले आहेत. तसेच त्यातून काय शिकलं पाहिजे? हे देखील चाणक्य यांनी सांगितलं आहे. चाणक्य यांचा हा ग्रंथ आजही अनेकांना मार्गदर्शक ठरतो. चाणक्य म्हणतात प्रत्येकाच्या आयुष्यात अशा काही घटना किंवा गोष्टी असतात, ज्या कायम गुप्त ठेवल्या पाहिजे. त्यातील काही गोष्टी तर आपल्या पत्नीला देखील सांगता कामा नये, अन्यथा तुम्ही भविष्यात मोठ्या संकटात सापडू शकता. चाणक्य म्हणतात आपण जेव्हा एखादी योजना तयार करतो आणि ती दुसर्‍यांना सांगतो, तेव्हा अशा स्थितीमध्ये समोरचा व्यक्ती तुमची योजना किंवा कल्पना चोरण्याची शक्यता असते, तसेच जर तुमची योजना ही शत्रू पर्यंत पोहोचली तर ती यशस्वी होण्यापूर्वीच त्यामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात, त्यामुळे तुम्हाला तुमच्या कामात अपयश मिळण्याची शक्यता असते, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

मोठं आर्थिक नुकसान – चाणक्य म्हणतात जेव्हा तुमचं मोठं आर्थिक नुकसान होतं, तेव्हा त्याबद्दल कोणालाही सांगू नका, कारण तुम्ही जर तुमच्या आर्थिक नुकसानाबद्दल इतरांना माहिती दिली, आणि लोकांना समजलं की तुम्ही आर्थिक अडचणीमध्ये आहात, तर अशावेळी तुमच्या जवळचे लोक देखील तुमच्यापासून दुरावले जातील, तुम्ही आर्थिक संकटात आहात, याची त्यांना कल्पना जरी आली तरी देखील ते तुम्हाला कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत करणार नाही, त्यामुळे जर तुमचं आर्थिक नुकसान झालं असेल तर ते गुप्त ठेवा, त्याबद्दल कोणाशीही चर्चा करू नका, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

लग्नपूर्वीचे प्रेमसंबंध – चाणक्य म्हणतात जर तुमचं आता लग्न झालं आहे, मात्र लग्नापूर्वी तुमचे दुसऱ्या महिलेसोबत प्रेमसंबंध होते, तर ते आपल्या बायकोला सुद्धा कधीच सांगू नका, कारण यामुळे बायकोचा स्वभाव हा संशयी बनण्याची शक्यता असते, त्यातून अनेकदा घरात वाद होऊ शकतात. घरात शाती राहणार नाही. जेव्हा तुमचं लग्न होतं, तेव्हा तुम्ही आपल्या जोडीदारासोबत कायम प्रामाणिक रहा, त्यामुळे तुमचा संसार दीर्घकाळ टिकेल, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

उत्पन्नाचा स्त्रोत – चाणक्य म्हणतात की माणसाने आपल्या कितीही जवळचा व्यक्ती असला तरी त्याला देखील कधीच आपण किती कमावतो आणि आपल्या उत्पन्नाचा स्त्रोत काय आहे? याबद्दल माहिती देऊ नये. उत्पन्नाबाबत तुम्ही जर एखाद्या व्यक्तीला माहिती दिली तर तुमच्यासोबत दगा फटका होण्याची शक्यता असते, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

कमकुवत बाजू – चाणक्य म्हणतात प्रत्येक माणसाची एक कमकुवत बाजू असते, ते त्यालाही चांगलंच माहिती असतं, मात्र अशा गोष्टींची कुठेही चर्चा करता कामा नये, अन्यथा लोक तुमच्या या स्थितीचा फायदा घेऊ शकतात, त्यामुळे भविष्यात तुम्हाला मोठं नुकसान होण्याची शक्यता असते.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us