AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहचं तीन वर्षानंतर पुनरागमन, इंग्लंडमध्ये मोडला मोठा विक्रम

भारत आणि इंग्लंड यांच्यात एजबेस्टन येथे पहिला वनडे सामना होत आहे. या सामन्यातून जसप्रीत बुमराहने तीन वर्षानंतर वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात मोठा विक्रम नावावर केला आहे.

Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहचं तीन वर्षानंतर पुनरागमन, इंग्लंडमध्ये मोडला मोठा विक्रम
Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहचं तीन वर्षानंतर पुनरागमन, इंग्लंडमध्ये मोडला मोठा विक्रम Image Credit source: BCCI Twitter
| Updated on: Jul 14, 2026 | 6:33 PM
Share

Jasprit Bumrah, IND vs ENG 1st ODI: बर्मिंघमच्या एजबेस्टन मैदानात नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने लागला आणि भारताच्या वाटेला प्रथम गोलंदाजी आली. या सामन्यातून जसप्रीत बुमराहचं पुन्हा एकदा वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण झालं. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात संधी मिळताच जसप्रीत बुमराहने आपल्या भेदक गोलंदाजीचा नजराणा सादर केला. या सामन्यात त्याच्या गोलंदाजीला आणखी धार चढल्याचं दिसून आलं. इतकंच काय तर विकेट घेत एक मोठा विक्रमही आपल्या नावावर केला. जसप्रीत बुमराहने दुसऱ्या स्पेलच्या पहिल्या चेंडूवर इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूक याला बाद केलं आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला दबदबा असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध केलं.

हॅरी ब्रूक पाठवलं तंबूत

जसप्रीत बुमराहने पहिला स्पेल चांगला टाकला. मात्र त्याला काही विकेट मिळाली नाही. इंग्लंडचे फलंदाज मात्र त्याचा सामना करताना अडचणीत आले. त्यामुळे कर्णधार शुबमन गिलने त्याला दुसरा स्पेल टाकण्यासाठी लवकरच बोलवलं. या स्पेलच्या पहिल्याच चेंडूवर शुबमन गिलने कमाल केली. बुमराहने ऑफ स्टम्पच्या बाहेर शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू टाकला. त्यामुळे चेंडूला उसळी आणि बाहेरच्या दिशेने मार्ग मिळाला. इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूक हा चेंडू खेळताना चुकला आणि रोहित शर्माच्या हाताता झेल देऊन बाद झाला. या विकेटसह जसप्रीत बुमराह इंग्लंडच्या भूमीत सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे. या यादीत त्याने रवींद्र जडेजाला मागे टाकलं. जसप्रीत बुमराहचे इंग्लंडमध्ये 31 विकेट झाले आहेत.

इंग्लंडमध्ये भारतासाठी सर्वाधिक वनडे विकेट घेणारे गोलंदाज

  • जसप्रीत बुमराह: 31 विकेट
  • रवींद्र जडेजा: 30 विकेट
  • भुवनेश्वर कुमार: 28 विकेट
  • मदन लाल: 27 विकेट
  • मोहम्मद शमी: 26 विकेट

जसप्रीत बुमराहने वनडे क्रिकेटमध्ये 150 विकेटचा पल्लाही गाठला आहे. हॅरी ब्रूकची विकेट त्याच्या वनडे कारकिर्दीतील 150वी विकेट होती. बुमराहाने 90 वनडे सामन्यात ही कामगिरी केली आहे. भारतासठी वनडे क्रिकेटमध्ये झटपट 150 विकेट घेणारा तिसरा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी मोहम्मद शमीने 80 सामन्यात, कुलदीप यादव 88 सामन्यात ही कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे कसोटीत 150वी विकेटही इंग्लंडचा कर्णधारच होता. त्याने तेव्हा बेन स्टोक्सला बाद करून 150 वी विकेट साजरी केली होती.

Follow Us
राज्याच्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल? बड्या मंत्र्याची जागी मुंडेंना
राज्याच्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल? बड्या मंत्र्याची जागा घेणार धनंजय मुंडे?
मोठी बातमी! शिंदे महत्त्वाचा संदेश घेऊन दिल्लीत? राजकीय घडामोडींना वेग
मोठी बातमी! शिंदे महत्त्वाचा संदेश घेऊन दिल्लीत? राजकीय घडामोडींना वेग
फक्त एक अट, तर देवेंद्र फडणवीसही उद्धव ठाकरेंसोबत रामरक्षा म्हणतील,
फक्त एक अट, तर देवेंद्र फडणवीसही उद्धव ठाकरेंसोबत रामरक्षा म्हणतील, 'त्या' विधानाची सर्वत्र चर्चा
केद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराबाबत सर्वात मोठी अपडेट! ताकाद वाढली मग
केद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराबाबत सर्वात मोठी अपडेट! ताकाद वाढली मग शिवसेनेचा कोणत्या पदावार दावा? शिंदेंनी दिलं थेट उत्तर
पुण्यात खळबळ! पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी कनेक्शन, एकाच वेळी 60
पुण्यात खळबळ! पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी कनेक्शन, एकाच वेळी 60 हून अधिक...
सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदावरून पाठवलेल्या नोटीसमध्ये मोठा ट्विस्ट!
सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदावरून पाठवलेल्या नोटीसमध्ये मोठा ट्विस्ट! पत्रात मोठी विसंगती; 18 फेब्रुवारीशी काय कनेक्शन?
केंद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराच्या पर्श्वभूमीवर मोठ्या हालचाली! दिल्ली
केंद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराच्या पर्श्वभूमीवर मोठ्या हालचाली! दिल्ली दौऱ्याआधीच एकनाथ शिंदेंनी...
राजकीय हालचालींना वेग! NCP तील मंत्र्यांची तातडीची बैठक, काय घडणार?
राजकीय हालचालींना वेग! NCP तील मंत्र्यांची तातडीची बैठक, पुढे काय घडणार?
सिया केतन प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर! थेट पंतप्रधानांना पत्र
सिया केतन प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर! थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलं पत्र
फक्त चर्चा की सत्य, राष्ट्रवादी पक्ष लवकरच फुटणार? बड्या नेत्याच्या
NCP | फक्त चर्चा की सत्य, राष्ट्रवादी पक्ष लवकरच फुटणार? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ