Chanakya Niti : बलाढ्य शत्रूचा पराभव कसा करायचा? चाणक्य यांनी सांगितल्या चार गोष्टी

आर्य चाणक्य हे एक महान कुटनीती तज्ज्ञ होते. त्या काळात चाणक्य यांचा सल्ला घेण्यासाठी त्यांच्याकडे दूरवरून लोकं येत असत. चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपला शत्रू जर आपल्यापेक्षा बलाढ्य असेल तर त्याचा पराभव कसा करायचा? याबद्दल चाणक्य यांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत.

Chanakya Niti : बलाढ्य शत्रूचा पराभव कसा करायचा? चाणक्य यांनी सांगितल्या चार गोष्टी
Chanakya Niti
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 09, 2026 | 9:56 PM

आर्य चाणक्य हे एक महान कुटनीती तज्ज्ञ होते. धनानंदच्या राज्यात त्यांचा अपमान झाला होता, त्यानंतर त्यांनी आपल्या अपमानाचा असा बदला घेतला की थेट राजा धनानंदची राजवट उलथून लावली. त्यानंतर त्यांनी चंद्रगुप्त मौर्य यांना राजा केलं, असं मानलं जातं. त्याच काळात चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी माणसाने आयुष्य कसं जगावं? याचं थोडक्यात सार सांगितलं आहे. चाणक्य आपल्या या ग्रंथामध्ये म्हणतात जेव्हा शत्रू हा आपल्यापेक्षा बलवान असेल तर त्याच्यासोबत लढण्यासाठी कधीही थेट मैदानात उतरण्याची चूक करायची नाही, तुम्ही जर तसं केलं तर तुमचा पराभव होऊ शकतो. परंतु तुम्ही जर अशा शत्रूचा पराभव करण्यासाठी बुद्धीचा वापर केला तर नक्कीच तुम्ही तुमच्या शत्रूवर विजय मिळवाल, फक्त एक लक्षात ठेवा जेव्हा शत्रू मोठा असतो, तेव्हा आव्हान देखील मोठं असतं, त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तुमचा संयम कधीही ढासळू देऊ नका, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

घाई करू नका – चाणक्य म्हणतात जेव्हा तुमचा शत्रू हा तुमच्यापेक्षा जास्त बलवान असतो, अशावेळी कधीही घाई करू नका, आती घाई तुम्हाला संकटात नेऊ शकते. त्यामुळे कधीही पहिला वार तुम्ही स्वत: करू नका. शांत बसून तुमचा शत्रू काय चाल खेळणार आहे, याचा आधी नीट अंदाज घ्या आणि त्यानंतरच तुमचा डाव टाका, यामुळे तुम्हाला तुमच्या शत्रूच्या खऱ्या ताकदीचा अंदाज होईल आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमचे पुढचे डावपेच आखू शकाल, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

सावध रहा – चाणक्य म्हणतात जेव्हा तुमचा शत्रू हा तुमच्यापेक्षा जास्त बलवान असतो, तेव्हा त्याच्यापासून कायम सावध रहावं. तुम्ही जर गाफील राहिलात तर तुमचा कधीही घात होऊ शकतो, त्यामुळे माणसाने कायम सावध राहिलं पाहिजे. तुमचा शत्रू काय करतोय? याबद्दल तुम्ही वेळोवेळी माहिती ठेवली पाहिजे, हीच माहिती तुम्हाला संघर्षाच्या काळात उपयोगी ठरणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या शत्रूपेक्षा एक पाऊल पुढे असणं गरजेचं आहे, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

कमी बोला – चाणक्य म्हणतात माणसाने नेहमी कमी बोलावं, कारण जर तुम्ही जास्त बोललात तर तुमचे सर्व प्लॅन समोरच्या व्यक्तीला कळू शकतात, त्यामुळे माणसाने नेहमी कमी बोलावं असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे. तसेच चाणक्य म्हणतात अशावेळी मानसाने नेहमी संयम ठेवला पाहिजे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us