Chanakya Niti : या लोकांवर विश्वास कराल तर आयुष्यात सगळं गमावून बसाल, चाणक्य यांनी काय सांगितलंय?

आर्य चाणक्य हे एक महान विचावतं, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते, त्यांनी माणसांचे असे काही स्वभाव आपल्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये सांगितले आहेत. चाणक्य म्हणतात जर तुम्ही अशा स्वभावांच्या व्यक्तींवर विश्वास ठेवला तर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं.

Chanakya Niti : या लोकांवर विश्वास कराल तर आयुष्यात सगळं गमावून बसाल, चाणक्य यांनी काय सांगितलंय?
चाणक्य
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Dec 17, 2025 | 9:51 PM

आर्य चाणक्य हे एक कुटनीतीतज्ज्ञ होते. चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये केवळ राज्य कारभार कसा करावा? याबद्दलच्याच नीती सांगितलेल्या नाहीयेत, तर चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजही आयुष्य जगत असताना मार्गदर्शक ठरतात. अनेकदा आपली फसवणूक होते, आपण चुकीच्या माणसांवर विश्वास ठेवतो, मात्र जोपर्यंत आपली फसवणूक होत नाही, तोपर्यंत आपल्याला कळत नाही समोरचा माणूस विश्वास ठेवण्या योग्य आहे की नाही? परंतु चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये अशा लोकांपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे, कोणापासून सावध राहिचं आणि कोणावर विश्वास ठेवायचा? याबद्दल त्यांनी आपल्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, चाणक्य म्हणतात काही लोक असे असतात, ज्यांच्यावर कधीही विश्वास केला जाऊ शकत नाही, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे, आणि अशा लोकांची नेमकी कोणती लक्षणं चाणक्य यांनी सांगितलेली आहेत, त्याबद्दल.

अपेक्षा – चाणक्य म्हणतात जे लोक कायम कोणत्याही कामाच्या बदल्यामध्ये किंवा एखाद्या गोष्टीच्या बदल्यामध्ये तुमच्याकडून अपेक्षा ठेवतात, अशा लोकांपासून कायम सावध रहावं, या लोकांवर कधीही विश्वास ठेवू नये, या लोकांशी केवळ कामापुरते संबंध ठेवावेत, तसेच या लोकांना आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या योजनांची देखील माहिती देऊ नये, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

स्वार्थी लोक – चाणक्य म्हणतात असे लोक हे तर फारच घातक असतात, अशा लोकांशी तर कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवूच नाही, कारण हे लोक आपल्या छोट्याशा स्वार्थासाठी देखील तुमच्यासोबत दगा फटका करण्याची शक्यता असते. अशा लोकांवर जर विश्वास ठेवला तर तुमच्या जीवाला देखील धोका होऊ शकतो, त्यामुळे कायम अशा लोकांपासून सावध रहावे.

सत्ता आणि पदावर असलेले लोक – चाणक्य म्हणतात असे लोक कधीच कोणाचे नसतात. त्यामुळे जे लोक सत्ता आणि पदावर आहेत, त्यांच्यापासून दूर रहावं, अशा लोकांना शत्रूपण करू नये, आणि मित्र देखील असता कामा नये.

पोकळ सहानुभूती – चाणक्य म्हणतात जे लोक पोकळ सहानुभूती दाखवतात, वर -वर खूप प्रेम आहे असं दाखवतात, मात्र तुमच्यावर जेव्हा संकट येतं तेव्हा असे लोक तुमच्यापासून दूर निघून जातात, अशा लोकांपासून कायम सावध राहिलं पाहिजे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)