
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, कुटनीतीतज्ज्ञ तसेच अर्थतज्ज्ञ देखील होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. माणसानं पैशांचं नियोजन कसं करावं? याबाबत चाणक्य यांनी या ग्रंथामध्ये मार्गदर्शन केलं आहे. चाणक्य म्हणतात या जगात पैसा ही सर्वात मोठी गोष्ट आहे, तुमच्याकडे जर पैसा असेल तर तुमच्यावर कोणतंही संकट आलं तर तुम्ही त्यातून सहज बाहेर पडू शकतात. जर तुमच्याकडे पैसा असेल तर तुमच्यावर येणारी अनेक संकट येण्यापूर्वीच नष्ट होतात. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीनं आपल्या उत्पन्नातून काही विशिष्ट रक्कम ही बचत केलीच पाहिजे. परंतु पुढे चाणक्य असंही म्हणतात की काही कामांसाठी पैसा खर्च देखील केला पाहिजे. तुम्ही जेव्हा अशा कामांमध्ये पैसा खर्च करता तेव्हा ती तुम्ही तुमच्या नशीबासाठी केलेली गुंतवणूक असते, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.
गरीब आणि निराधार लोकांना मदत – चाणक्य म्हणतात माणसानं हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे की आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो, या समाजामुळेच आपण मोठं झालेलो असतो. समाज आपल्याला मोठं करण्याचं काम करतो, त्यामुळे आपण या समजाचं काही तरी देणं लागतो, या भावनेतून आपण आपल्या उत्पन्नातील विशिष्ट वाटा हा गरीब आणि निराधार लोकांसाठी खर्च केला पाहिजे, ही तुम्ही भविष्यकाळासाठी केलेली गुंतवणूकच असते, यामुळे तुमचं नशीब बळकट होतं.
धार्मिक कार्यासाठी मदत – चाणक्य म्हणतात माणसानं नेहमी धार्मिक कार्यासाठी मदत केली पाहिजे, तुम्ही जेव्हा धार्मिक कार्यसाठी मदत करता तेव्हा तुमच्याकडील धन हे कमी होत नाही, उलट वाढतच जातं, ही देखील एक प्रकारची गुंतवणूक असते, ज्यातून तुम्हाला देवाचा आशीर्वाद मिळतो, आणि तुमचा उद्धार होतो.
सार्वजनिक कामांमध्ये, अन्नदानामध्ये मदत – आर्य चाणक्य यांच्या मते माणसानं नेहमी सार्वजनिक कामांमध्ये सहभागी व्हावं, यामधून तुमचा जनसंर्पक वाढतो, त्यामुळे सार्वजनिक कार्यासाठी तसेच अन्नदानाच्या कार्यक्रमासाठी सढळ हातानं मदत केली पाहिजे, जेव्हा पैसा तुमची साथ देत नाही, तेव्हा तुम्ही कमावलेली माणसंच तुमच्या उपयोगाला येतात असं चाणक्य यांनी म्हटलं आहे, त्यामुळे या तीन ठिकाणी माणसानं गुंतवणूक करावी असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)