T20i : वर्ल्ड कपआधीच्या शेवटच्या टी 20i मालिकेसाठी टीम जाहीर, कुणाला संधी? पहिला सामना कधी?
T20I Series : श्रीलंका विरुद्ध इंग्लंड यांच्यात एकूण 3 टी 20i सामन्यांचा थरार रंगणार आहे. दोन्ही संघांसाठी ही मालिका वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीच्या हिशोबाने फार निर्णायक असणार आहे.

इंग्लंड क्रिकेट टीमने हॅरी ब्रूक याच्या नेतृत्वात यजमान श्रीलंकेवर 3 सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशा फरकाने विजय मिळवला. इंग्लंडची मालिकेत पराभवाने सुरुवात झाली होती. मात्र त्यानंतर इंग्लंडने सलग 2 सामने जिंकत मालिका आपल्या नावावर केली. त्यांनतर आता उभयसंघात टी 20i मालिकेचा थरारा रंगणार आहे. दोन्ही संघांची ही टी 20i वर्ल्ड कपआधी शेवटची मालिका असणार आहे. श्रीलंकेने या मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. या मालिकेतील तिन्ही सामने हे एकाच मैदानात खेळवण्यात येणार आहेत.
श्रीलंका-इंग्लंड टी 20I मालिकेचं वेळापत्रक
पहिला सामना, शुक्रवार, 30 जानेवारी, पल्लेकेले
दुसरा सामना, रविवार, 1 फेब्रुवारी, पल्लेकेले
तिसरा सामना, मंगळवार, 3 फेब्रुवारी, पल्ल्केले
इंग्लंड विरूद्धच्या टी 20I सीरिजसाठी श्रीलंका टीम : दासुन शनाका (कर्णधार), पथुम निसांका, कामिल मिश्रा, कुसल मेंडीस, कुसल जेनिथ परेरा, धनंजया डी सिल्वा, चारिथ असलंका, जेनिथ लियानागे, पवन रथनायके, वानिंदू हसरंगा, दुनिथ वेल्लागे, महेश तीक्षाना, दुष्मंथा चमीरा, प्रमोद मदुशन, मथीशा पाथीराना आणि एशान मलिंगा.
