AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : या चार ठिकाणी कधीच घर बांधू नका, चाणक्य काय सांगतात?

चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. घर कसं असावं? ते कुठे बांधावं? याबाबत त्यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथात माहिती दिली आहे.

Chanakya Niti : या चार ठिकाणी कधीच घर बांधू नका, चाणक्य काय सांगतात?
| Updated on: Aug 09, 2025 | 4:11 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनिती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, हा ग्रंथ आजही अनेकांना आपलं आयुष्य जगताना प्रेरणा देतो. चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्याचा मानवाच्या रोजच्या जीवनाशी संबंध येतो. चाणक्य हे एक अर्थतज्ज्ञ होते, त्यामुळे पैशांचं नियोजन कसं करावं? पैशांची बचत कशी करावी? पैसा कुठे आणि कसा खर्च करावा? याबाबत देखील त्यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये मार्गदर्शन केलं आहे.

चाणक्य यांनी घर बांधताना काय काळजी घ्यावी? घर कुठे खरेदी करू नये? घर कुठे खरेदी करावं? तुम्ही जिथे घर बांधणार आहात ती जागा कशी असावी याबाबत देखील मार्गदर्शन केलं आहे. जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे.

चाणक्य म्हणतात तुम्ही जिथे घर बांधतात किंवा जिथे वास्तव्याला असतात, त्या परिसराचा, तेथील लोकांचा तुमच्यावर परिणाम होतं असतो. त्यामुळे घर बांधत असताना आपणं घर नेमकं कुठे बांधत आहोत? जी जागा  आपल्यासाठी योग्य आहे का? याचा विचार आवश्य करावा.

चाणक्य पुढे म्हणतात अशा जागेवर चुकूनही घर बांधू नका, जिथे तुमच्यासाठी रोजगार नसेल. कारण तुम्हाला जर नोकरी मिळाली नाही तर तुम्ही घर तर बांधाल मात्र ते चालवण्यासाठी संसारासाठी तुम्हाला पैशांची आवश्यकता असते. त्यामुळे चुकूनही अशा ठिकाणी घर बांधू नका, जिथे रोजगार नसेल.

शिक्षण- चाणक्य म्हणतात चांगलं शिक्षण हाच मानवाच्या विकासाचा पाया असतो, त्यामुळे जिथे चांगलं शिक्षण मिळणार नाही, अशा ठिकाणी आपलं घर नसावं, शिक्षणामुळेच मानवाची प्रगती होते. माणूस रोजगारासाठी सक्षम बनतो, त्यामुळे अशाच ठिकाणी घर बांध जिथे शिक्षणाच्या सोई उपलब्ध असतील, तसेच जिथे आरोग्याच्या सोई नसतील आणि सज्जन लोक नसतील अशा ठिकाणी घर बांधू नये असं चाणक्य म्हणतात.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपके
Exclusive | माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपकेने सांगितलं जंतर-मंतरवर पहिल्या दिवशी काय घडलं?
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; देवस्थानात...
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; पाणी देवस्थानात शिरल्यानंतरही भक्तिभावाने महाआरती
भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात, नवी माहिती...
Ashok Kharat | भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात...नेमकी नवी माहिती काय?
धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले, तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने...
Rain Update | धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले तरी... तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने विसर्ग सुरु
मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन...; साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
Ameet Satam on Raj Thackeray | मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन म्हणत...; अमित साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
Raj Thackeray | NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच...
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच... भाजपच्या बड्या नेत्याने सांगितली खदखद
सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
Sada Sarvankar On Raj Thackeray | 18 कोटींच्या चोरीचा दावा चुकीचा?; सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
Abhijeet Dipake | अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही...
Sonam Wangchuk | आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही; सरकारला सोनम वांगचुक यांचा थेट इशारा