
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, तसेच ते एक अर्थतज्ज्ञ देखील होते. त्यामुळे माणसानं पैसा कसा कमवावा? पैशांचा वापर कसा करावा? पैसे कुठे खर्च करावेत आणि कुठे खर्च करू नयेत? याबाबत चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात माणसाच्या आयुष्यात जेवढं महत्त्व पैशांचं असतं, तेवढं महत्त्व इतर कोणत्याही गोष्टींचं नसतं. तुम्ही पैशांच्या जोरावर या जगात प्रत्येक गोष्ट मिळवू शकतात, त्यामुळे प्रत्येक माणसानं पैसा हा कमावलाच पाहिजे, मात्र पैसा कमावताना कधीही चुकीच्या मार्गाचा अवलंब करता कामा नये, तुम्ही जेव्हा पैसा कमवण्यासाठी चुकीच्या मार्गाचा अवलंब करता तेव्हा असा पैसा फार काळ तुमच्या हातात टिकत नाही, त्याची मोठी किंमत तुम्हाला मोजावी लागते. चला तर माग जाणून घेऊयात आर्य चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.
फसवणूक – चाणक्य म्हणतात तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीची फसवणूक करून पैसा कमवता, तेव्हा असा पैसा कधीही तुमच्या हातात टिकत नाही.भलेही तुम्ही एखाद्याची आज फसवणूक कराल, आणि पैसा कमवाल परंतु असा पैसा कधीच तुम्हाला आयुष्यभर पुरणार नाही, अशा पैशांना कधीही बरकत नसते, त्यामुळे कधीही कोणाची फसवणूक करू नका, लक्षात ठेवा फक्त कष्टाचाचा पैसा टिकतो.
आयत धन – चाणक्य म्हणतात जेव्हा तुम्हाला आयत धन मिळत मग ते कोणत्याही मार्गाने मिळालेलं का असेना, असं धन कधीच तुमच्या हातात जास्त काळ टिकत नाही, कारण असं धन हे अकस्मात तुम्हाला मिळालेलं असतं, त्यामुळे त्याचं नियोजन कसं करायचं? हे तुम्हाला माहिती नसतं, तसेच अशा अचानक आलेल्या धनामुळे तुम्हाला इतरही वाईट संगती लागण्याची शक्यता असते, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
वाईट संगती – चाणक्य म्हणतात यशाला जसा शॉर्टकट नसतो, तसेच पैशांना देखील शॉर्टकट नसतो, ते कष्ट करूनच कमावे लागतात. मात्र अनेकजण असा विचार करतात की आपण लगेचच श्रीमंत झालो पाहिजे, त्यासाठी ते जुगार खेळतात, लॉटरीच्या नादी लागतात, कष्ट सोडून देतात, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)