Chanakya Niti : चाणक्य म्हणतात या तीन लोकांची समाजात कायम उपेक्षाच होते
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. माणसाचा समाजात वावरत असताना व्यवहार कसा असावा? याबद्दल चाणक्य यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत.

आर्य चाणक्य म्हणतात माणसानं या समाजात कसं रहावं याचे काही नियम आहेत, जेव्हा एखादा व्यक्ती या नियमांकडे दुर्लक्ष करतो तेव्हा समाजही अशा लोकांकडे दुर्लक्ष करतो. असे लोक समाजात आपला मान सन्मान गमावून बसतात. परिणामी जेव्हा अशा व्यक्तीला एखाद्या गोष्टींची गरज असेल तेव्हा समाज कधीही अशा व्यक्तीची मदत करत नाही, अशा व्यक्तींच्या वाट्याला आयुष्यभर उपेक्षाच येते. त्यामुळे माणसानं समाजात वावरत असाताना कही गोष्टी नियम हे कटाक्षानं पाळले पाहिजेत. जे लोक अशा प्रकारचा व्यवहार करातात, ते कायम समाजाच्या आदरास पात्र असतात, त्यांची कीर्ती दूर दूर पर्यंत पसरते. त्यामुळे समाजात वावरत असताना काय काळजी घेतली पाहिजे? आणि कोणत्या लोकांच्या वाट्याला कायम उपेक्षा येते? याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
पती असूनही माहेरी राहणारी स्त्री – चाणक्य म्हणतात ज्या स्त्रीचं लग्न झालं आहे, तिचा पती जिवंत आहे, मात्र असं असूनही जी स्त्री आपल्या माहेरीच राहाते, अशा स्त्रीची समाज कायम उपेक्षा करतो, कारण लग्नानंतर कोणत्याही महिलेसाठी तिचं सासर हेच तिचं घर असतं, लग्नानंतर सासरी महिलेला जेवढा मान मिळतो, तेवढा मान हा माहेरी मिळेलच हे सांगता येत नाही.
दुसर्यावर अवलंबून असलेला व्यक्ती – चाणक्य म्हणतात जो व्यक्ती शरीरानं धडधाकट आहे. जो व्यक्ती कष्ट करून पैसा कमावू शकतो, तो व्यक्ती जर पैशांच्या बाबतीमध्ये जेव्हा दुसऱ्यावर अवलंबून असतो, तेव्हा समाज कायम अशा व्यक्तीची उपेक्षाच करतो, अशा व्यक्तीचं आयुष्य संकटानं भरलेलं असतं, त्यामुळे कधीही कोणावर अववलंबून राहू नये.
रोजगार नसलेला कुटुंबप्रमुख – चाणक्य म्हणतात घरातील कुटुंबप्रमुखावर त्या घराची संपूर्ण जबाबदारी असते, त्यामुळे अशा स्थितीमध्ये त्याने चांगले पैसे कमावावेत आणि कुटुंबातील सर्वांची काळजी घ्यावी, त्यांना आनंदात ठेवावं अशी अपेक्षा कुटुंबप्रमुखाकडून केली जाते. मात्र जर कुटुंब प्रमुख काही कामच करत नसेल तर अशा कुटुंबांच्या वाट्याला दु:ख येते, अशा व्यक्तीची त्याच्या घरचे तर उपेक्षा करतातच पण समाज देखील अशा लोकांकडे दुर्लक्ष करतो, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
