शुभेच्छा तरी कशा द्याव्यात…, रोहित पवारांचं ते ट्विट चर्चेत, शपथविधीवर पहिली प्रतिक्रिया
आज सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर रोहित पवार यांनी ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

आज सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे, राजभवनामध्ये या शपथविधी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्यपालांनी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. दरम्यान सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच त्यांच्याकडे इतरही तीन खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे, ज्यामध्ये क्रीडा आणि युवक कल्याण, राज्य उत्पादन शुल्क आणि अल्पसंख्यांक मंत्रालयाचा समावेश आहे. दरम्यान त्यापूर्वी सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी देखील निवड करण्यात आली, आज मुंबईमध्ये राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली होती, या बैठकीमध्ये एकमतानं सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच रोहित पवार यांनी एक ट्विट केलं आहे, हे ट्विट आता चांगलंच चर्चेत आलं आहे.
नेमकं काय म्हणाले रोहित पवार?
‘राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून मा. सुनेत्राकाकी यांनी शपथ घेतली, याचा आनंद आहे. खरं म्हणजे मा. अजितदादांची जागा कुणीच घेऊ शकत नाही पण किमान सुनेत्राकाकींच्या रुपात तरी आम्ही तिथं अजितदादांना पाहू..! डोक्यावर डोंगराएवढं दुःख असताना आणि आम्ही सर्वजण शोकाकूल असताना त्यांना शुभेच्छा तरी कशा द्याव्यात, हे कळत नाही..!’ असं ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे.
राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून मा. सुनेत्राकाकी यांनी शपथ घेतली, याचा आनंद आहे. खरं म्हणजे मा. अजितदादांची जागा कुणीच घेऊ शकत नाही पण किमान सुनेत्राकाकींच्या रुपात तरी आम्ही तिथं अजितदादांना पाहू..! डोक्यावर डोंगराएवढं दुःख असताना आणि आम्ही सर्वजण शोकाकूल असताना… pic.twitter.com/Hon07ArlFL
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 31, 2026
सुनेत्रा पवार यांच्याकडे तीन खात्यांची जबाबदारी
दरम्यान सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्याकडे तीन खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आली ज्यामध्ये क्रीडा आणि युवक कल्याण, राज्य उत्पादन शुल्क आणि अल्पसंख्यांक मंत्रालय या खात्यांचा समावेश आहे. मात्र सुनेत्रा पवार यांच्याकडे अर्थखातं देण्यात आलेलं नाहीये, समोर आलेल्या माहितीनुसार अर्थसंकल्प सादर होईपर्यंत या खात्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांकडेच राहणार आहे, त्यानंतर हे खातं पुन्हा राष्ट्रवादीला देण्यात येणार आहे.
