AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतात 1000 कोटींच्या कमाईनंतर ‘धुरंधर’ OTT वर रिलीज, पण चाहते प्रचंड नाराज, कारण ऐकून तुम्हालाही येईल राग

भारतात 1000 कोटींची कमाई केल्यानंतर 'धुरंधर' चित्रपट OTT वर प्रदर्शित करण्यात आला आहे. मात्र, OTT वरील चित्रपट पाहून अनेक चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे. नेमकं काय घडलं?

भारतात 1000 कोटींच्या कमाईनंतर 'धुरंधर'  OTT वर रिलीज, पण चाहते प्रचंड नाराज, कारण ऐकून तुम्हालाही येईल राग
Image Credit source: Social media
| Updated on: Jan 31, 2026 | 8:54 PM
Share

Dhurnadhar OTT Release On Netflix: रणवीर सिंगचा बहुचर्चित आणि ब्लॉकबस्टर ठरलेला चित्रपट ‘धुरंधर’ 5 डिसेंबर रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक यश मिळवत तब्बल 1200 कोटींचा टप्पा पार करण्यात यशस्वी ठरला. आता हाच चित्रपट 30 जानेवारी रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर रिलीज झाला असून, खास बाब म्हणजे हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू या तीन भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे.

ओटीटीवर रिलीज होताच चाहत्यांनी ‘धुरंधर’ पुन्हा एकदा पाहण्यास सुरुवात केली. नेटफ्लिक्सने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (पूर्वीचा ट्विटर) वर चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची माहिती शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले, ‘धुरंधर एक एपिक गाथा उलगडताना पाहा. आता नेटफ्लिक्सवर हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये.’ या पोस्टवर अनेक चाहत्यांनी आनंद व्यक्त केला. मात्र, रिलीजच्या काही तासांतच प्रेक्षकांकडून नाराजीचे सूर उमटू लागले.

चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहिल्यानंतर अनेक चाहत्यांनी दावा केला आहे की ओटीटी वर्जनमधून सुमारे 10 मिनिटांचे सीन कट करण्यात आले आहेत तसेच काही शिवीगाळ असलेले डायलॉग्स म्युट करण्यात आले आहेत. यामुळे अनेक प्रेक्षक संतप्त झाले असून, सोशल मीडियावर त्यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे.

नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप

एका युजरने लिहिले, ‘छी! नेटफ्लिक्स इंडियाने पूर्ण मूड खराब केला. आम्हाला अनसेंसर्ड वर्जन पाहायचं होतं.’ तर दुसऱ्या युजरने म्हटले, चित्रपटामधून 10 मिनिटांचा कट लावला आहे. एका अन्य युजरने थेट सवाल उपस्थित करत लिहिले, हे अनसेंसर्ड वर्जन नाही. 18+ प्लॅटफॉर्मवर अडल्ट फिल्म सेंसर्ड करण्याचा काय अर्थ?

या प्रकरणामुळे नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणाऱ्या कंटेंटच्या सेन्सॉरशिपवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. अनेक प्रेक्षकांचे म्हणणे आहे की सिनेमागृहात दाखवलेला वर्जन ओटीटीवरही तसाच असायला हवा विशेषतः जेव्हा प्लॅटफॉर्म 18+ कंटेंटसाठी ओळखला जातो.

दरम्यान, बॉक्स ऑफिसच्या कामगिरीकडे पाहिल्यास, सॅकनिल्कच्या प्राथमिक आकडेवारीनुसार ‘धुरंधर’ने भारतात 56 दिवसांत 835.83 कोटी रुपयांची कमाई केली आहे. जगभरात या चित्रपटाने 1,344.74 कोटी रुपयांची कमाई करत एक भव्य विक्रम नोंदवला आहे. भारतातील एकूण ग्रॉस कलेक्शननेही 1000 कोटींचा टप्पा पार केला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचे बजेट सुमारे 250 कोटी रुपये होते त्यामुळे नफ्याच्या बाबतीतही ‘धुरंधर’ प्रचंड यशस्वी ठरली आहे.

सुनेत्रा पवार बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री पहा शपथविधी
सुनेत्रा पवार बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री पहा शपथविधी.
अजित पवारांच्या घरून सुप्रिया सुळे थेट दिल्लीला रवाना
अजित पवारांच्या घरून सुप्रिया सुळे थेट दिल्लीला रवाना.
असं कसं होऊ शकतं? अजित पवारांच्या विमान अपघातावर जयंत पाटलांचा सवाल
असं कसं होऊ शकतं? अजित पवारांच्या विमान अपघातावर जयंत पाटलांचा सवाल.
सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड, थोड्याच वेळात शपथविधी
सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड, थोड्याच वेळात शपथविधी.
गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार
गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार.
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?.
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट.
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग...
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग....
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं...
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं....
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश.