Chanakya Niti | सावधान ! चाणक्य नीतीमध्ये सांगितलेल्या मुलांच्या 4 सवयींकडे दुर्लक्ष केलेत, तर भविष्यात पश्चाताप नक्की होणार

लहानमुलं मातीच्य मडक्या प्रमाणे असतात. त्यांना आपण जसा आकार देवू ते तसे वागतात. त्यामुळेच मुलांचे संगोपन करताना पालकांनी खूप काळजी घेणे आवश्यक आहे. त्यांना सुरुवातीपासूनच चांगल्या गोष्टी शिकवा अन्यथा भविष्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल.

| Edited By: Mrunal Patil | Updated on: Dec 16, 2021 | 9:13 AM
1 / 4
 जर तुमचे मूल तुमच्याशी खोटे बोलत असेल तर पालकांनी सावध होऊन मुलाची ही सवय मोडली पाहीजे. खोटे बोलण्याची सवय खूप वेगाने वाढते. याची वेळीच काळजी घेतली नाही, तर ते मूल मोठे झाल्यावर तुमच्यासोबत या पद्धती वापरून पाहतील. तसेच, यामुळे, तो चुकीच्या मार्गावर देखील जाऊ शकतो.

2 / 4

चाणक्यच्या मते, मुलांमध्ये हट्ट करण्याची सवयही खूप वेगाने विकसित होते, एखादी गोष्ट हवी म्हणजे हवीच. पण मुलांचे सर्वच हट्ट पुरवू नका. त्यांना योग्य आणि अयोग्य यातील फरक सांगा. त्यांनी जे मागितले ते लगेच देऊ नका, जास्त लाड केल्याने त्यांच्या सवयी बिघडतात.

3 / 4

मुले ओल्या मातीसारखी असतात. आजूबाजूला जे काही घडते ते ते स्वीकारतात. मुलं जास्त वेळ त्यांच्या पालकांसोबत घालवतात म्हणून ते तुम्हाला ही चांगल्या सवयी आत्मसात करा.

4 / 4

मुलासमोर कधीही भांडू नका. त्यामुळे मुलांमध्ये राग आणि चिडचिडेपणा निर्माण होतो. लहानपणापासूनच मुलांमध्ये चांगल्या संस्कारांचा पाया घाला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us