AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : या तीन गोष्टी फक्त भाग्यवान माणसांनाच मिळतात, चाणक्य काय म्हणतात?

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळातही अनेकांना मार्गदर्शक ठरतात. आर्य चाणक्य म्हणतात या जगात अशा तीन गोष्टी आहेत, ज्या फक्त भाग्यवान माणसांनाच मिळतात.

Chanakya Niti : या तीन गोष्टी फक्त भाग्यवान माणसांनाच मिळतात, चाणक्य काय म्हणतात?
chankyaImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 17, 2026 | 8:39 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील एखाद्या व्यक्तीला जगण्याची प्रेरणा देऊ शकतात. माणसानं आदर्श आयुष्य कसं जगावं याचं थोडक्यात तत्त्वज्ञान चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये सांगितलं आहे. चाणक्य म्हणतात या जगात काही गोष्टी या अशा असतात, ज्या फक्त भाग्यवान माणसांच्याच वाट्याला येतात. तुम्ही कितीही श्रीमंत असाल, तुम्ही त्यासाठी कितीही प्रयत्न केला तरी देखील तुम्ही त्या गोष्टी खरेदी करू शकत नाही. त्यामुळे माणसाने नेहमी आपलं कर्म चांगलं ठेवावं, ज्याचं कर्म चांगलं आहे, त्याच्या वाट्याला कधीही दु:ख येत नाही. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

सद्गुणी संतती – चाणक्य म्हणतात ज्या व्यक्तींचं कर्म चांगलं असतं, त्यांच्या पोटी सद्गुणी संतती जन्माला येते. अशा व्यक्तींच्या पोटी जन्माला आलेलं मुलं संपूर्ण कुळाचा उद्धार करतं. म्हतारापणात आपल्या आई-वडिलांचा आधार बनतं. मात्र असं मुलं केवळ फक्त भाग्यवान माणसाच्या पोटीच जन्माला येऊ शकतं. तुम्ही कितीही श्रीमंत असाल आणि जर तुमचे कर्म चांगले नसतील तर तुमच्या पोटी अशी संतती कधीच जन्म घेऊ शकत नाही. त्यासाठी माणसाने नेहमी आपले कर्म हे चांगले ठेवले पाहिजेत, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

आई- वडिलांचं प्रेम – चाणक्य म्हणतात या जगात तुम्ही सर्व काही विकत घेऊ शकतात. परंतु तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीही आई-वडिलांचं प्रेम विकत घेऊ शकत नाहीत. जे लोक खरोखर भाग्यवान असतात, त्यांच्या वाट्याला दीर्घकाळ आई-वडिलांचं प्रेम येतं. त्यामुळे माणसाने आई-वडिलांची सेवा करून आपलं आयुष्य सार्थकी लावावं असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

मान, सन्मान – चाणक्य म्हणतात तुम्ही कितीही श्रीमंत असाल एकवेळी लोक तुमचा तुमच्या तोंडावर भलेही आदर करतील. परंतु तुमच्या पाठीमागे कायम तुमची निंदाच करतात. परंतु या जगात फार थोडे लोक असे असतात, ज्यांना त्यांच्यासमोरही सन्मान मिळतो आणि त्यांच्या पाठीमागे देखील लोक त्यांनी निंदा न करता त्यांचं कौतुकच करतात.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला