AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कामिका एकादशीला दुर्मिळ द्विपुष्कर योग, जाणून घ्या पूजेचा शुभ मुहूर्त

यंदा कामिका एकादशीला दुर्मिळ असा द्विपुष्कर योग तयार होत आहे. या शुभ योगादरम्यान भगवान विष्णू आणि शिवाची पूजा करणे विशेष महत्त्वाचे मानले जाते. चला या पूजेची तारीख, शुभ वेळ, कथा आणि महत्त्व याबद्दल जाणून घेऊयात.

कामिका एकादशीला दुर्मिळ द्विपुष्कर योग, जाणून घ्या पूजेचा शुभ मुहूर्त
| Edited By: | Updated on: Aug 08, 2026 | 8:53 PM
Share

प्रत्येक महिन्यात दोन वेळा एकादशी साजरी केली जाते. त्यामुळे संपुर्ण वर्षात एकूण 24 एकादशी येतात. अशातच जेव्हा अधिक महिना आल्यास दोन एकादशी यात जोडल्या जाऊन त्यावर्षाला 26 एकादशी साजरी केली जाते. यंदा चातुर्मासातील पहिली एकादशी येणार आहे. त्यातच ही एकादशी अनेक दुर्मिळ आणि शुभ योग घेऊन येत आहे. पंचांगानुसार या दिवशी मृगशिरा नक्षत्र आणि हर्षण योग, तसेच द्विपुष्कर योगाचा शुभ संयोग होत आहे. या एकादशीच्या व्रताचे सर्वात विशेष वैशिष्ट्य म्हणजे ते ऋषीमुनी, संत, वैष्णव आणि गृहस्थ या सर्वांकडून सारख्याच प्रकारे पाळले जाईल. असे मानले जाते की या दिवशी भगवान सत्यनारायणाची कथा सांगणे, मातीची पूजा करणे आणि रुद्राभिषेक केल्याने शाश्वत पुण्य प्राप्त होते. चला तर मग ही कामिका एकादशी कधी आहे तसेच पूजेचा शुभ वेळ हे जाणून घेऊयात.

कामिका एकादशी 2026 तारीख, पुजेचा मुहूर्त, शुभ वेळ

द्रिक पंचांगानुसार, आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षाची एकादशी तिथी 8 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 1 वाजून 59 मिनिटांनी सुरू होईल आणि 9 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजून 04 मिनिटांनी संपेल. उदय तिथीनुसार 9 ऑगस्ट रोजी सूर्योदयाच्या वेळी एकादशी तिथी असल्याने, कामिका एकादशीचे व्रत रविवार 9 ऑगस्ट 2026 रोजी पाळले जाईल. 10 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 5 वाजून 47 मिनिटं ते 8 वाजेच्या दरम्यान व्रत सोडणे शुभ मानले जाते.

कामिका एकादशी यावेळी खास का आहे?

यावर्षी कामिका एकादशीला सकाळी 11 वाजून 04 मिनिट ते दुपारी 2 वाजून 43 मिनिट या वेळेत द्विपुष्कर योग तयार होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार द्विपुष्कर योग अत्यंत शुभ मानला जातो. असे मानले जाते की या योगात केलेल्या शुभ कर्मांची फळे अनेक पटींनी वाढतात. म्हणूनच सामान्य दिवसांपेक्षा या दिवशी पूजा, नामजप, तपश्चर्या, दानधर्म आणि उपवास यांना अधिक महत्त्व दिले जाते. चातुर्मासात येणाऱ्या या एकदाशीला भगवान विष्णूसह भगवान शिवाची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. अनेक भक्त याच दिवशी भगवान हरीच्या पूजेसोबत रुद्राभिषेक आणि शिवपूजा करतात.

कामिका एकादशीला या पद्धतीने करा पूजा

सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठा, स्नान करा आणि स्वच्छ वस्त्रे परिधान करा. त्यानंतर भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता यांचे ध्यान करा आणि उपवासाचे व्रत घ्या. भगवान हरी यांना पिवळी फुले, तुळशीची पाने, पंचामृत, फळे आणि नैवेद्य अर्पण करा. विष्णू सहस्रनाम, ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ या मंत्राचा जप करा आणि एकादशीच्या व्रताची कथा सांगा. चातुर्मासात ही एकादशी येत असल्याने भगवान शिवाला जल अर्पण करणे, रुद्राभिषेक करणे आणि महामृत्युंजय मंत्राचा जप करणे हे देखील शुभ मानले जाते.

कामिका एकादशीचे धार्मिक महत्त्व

सनातन धर्मात, कामिका एकादशी ही पापांचा नाश करणारी आणि इच्छा पूर्ण करणारी एकादशी मानली जाते. धार्मिक श्रद्धेनुसार या दिवशी भक्तीभावाने आणि नियमितपणे उपवास केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि भक्तांवर त्यांचे विशेष आशीर्वाद वर्षाव करतात. मान्यतेनुसार या दिवशी विष्णू सहस्रनामाचे पठण करणे, श्री हरीच्या मंत्रांचा जप करणे, सत्यनारायण कथा करणे, पूजा करणे आणि रुद्राभिषेक करणे अत्यंत फलदायी मानले जाते.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं; राज ठाकरेंचं विधान
Raj Thackeray : मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंचं वक्तव्य, CM स्वतःच हसू लागले
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड काय...
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड नेमकी काय चर्चा?
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय...
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय म्हणाले?
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले...
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले, ‘ते विधान तरुणांसाठी होतं!’
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश...
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश मस्केंची मागणी
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! ठाकरेंचे नेते आयुक्तांच्या भेटीला
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस आयुक्तांच्या भेटीला
मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर,
Eknath Shinde On Purnekar Case : मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर, म्हणाले...
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा;
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा; ठाण्याच्या राजकारणात काय काय घडतंय?
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण...
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! प्रदीप पूर्णकर प्रकरणावरून ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण तापले
नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी...
MLC Election Results 2026 : नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी राजकीय गणित बदललं