Chanakya Niti : आई वडीलांनी मुलांना या गोष्टी शिकवल्याच पाहिजेत, चाणक्य काय म्हणतात?

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. पालकांनी मुलांचं संगोपन कसं करावं? याबद्दल चाणक्य यांनी आपल्या ग्रंथामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.

Chanakya Niti : आई वडीलांनी मुलांना या गोष्टी शिकवल्याच पाहिजेत, चाणक्य काय म्हणतात?
Chanakya
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 17, 2026 | 7:05 PM

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजही अनेकांना मार्गदर्शक ठरतात. चाणक्य म्हणतात मुलांवर योग्य वयात योग्य संस्कार हे झालेच पाहिजेत. जर तुम्ही तुमच्या मुलांवर योग्य वयात योग्य संस्कार केले नाहीत  तर ते वाईट मार्गाला देखील लागू शकतात. आर्य चाणक्य म्हणतात मुलं ही चिखलाच्या गोळ्या सारखी असतात, जसं एक कुंभार चिखलाच्या गोळ्याला आकार देऊन त्यापासून सुंदर अशी भांडी तयार करतो, त्याचप्रमाणे आई-वडिलांनी देखील आपल्या मुलांवर संस्कार केले पाहिजेत.  जर मुलांवर योग्य वयात योग्य संस्कार झाले तर ही मुलं भविष्यात कुटुंबाचा तर आधार बनताच परंतु अशा मुलांमुळे त्या राज्याचा देखील विकास होत असतो. सशक्त, निरोगी आणि बुद्धिवान तरुणांची  पिढी ही कोणत्याही देशाची संपत्ती असते. याच तरुणाच्या जीवावर देशाचा डोलारा उभा राहतो, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

मोठ्याचा आदर – चाणक्य म्हणतात आपल्यापेक्षा जी लोक वयाने मोठी असतात, त्यांचा अनुभव आपल्यापेक्षा प्रचंड असतो. त्यांनी जग जवळून पाहिलेलं असतं. त्यामुळे कोणत्यावेळी काय निर्णय घ्यायचे आणि कोणत्या परिस्थितीला कसं तोडं द्यायचं हे त्यांना चांगलं माहिती असतं, त्यामुळे अशा लोकांचा आदर केला गेला पाहिजे. आपल्या मुलांवर तसे संस्कार आई-वडिलांनी करावेत असं चाणक्य म्हणतात.

कष्ट – चाणक्य म्हणतात या जगात कष्टाशिवाय पर्याय नाही, प्रत्येक आई-वडिलांनी आपल्या मुलांना कष्ट करायला शिकवलं पाहिजे. कष्टाचं महत्त्व त्याच्या लक्षात आणून द्यावं, मुलं आळशी बनता कामा नये. जर मुलं आळशी बनलं तर संपूर्ण कुटुंबाचा नाश होऊ शकतो, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

शिक्षणाचं महत्त्व – आई -वडिलांनी मुलांना चांगलं शिक्षण देणं हे कुठल्याही आई-वडिलांचं कर्तव्य आहे. त्यामुळे मुलांना शिक्षणाचं महत्त्व लक्षात आणून देणं ही आई वडिलांची जबाबदारी आहे.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

 

 

Follow Us