Chanakya Niti : असे लोकं कधीच आयुष्यात प्रगती करू शकत नाहीत, चाणक्य यांनी लक्षणं सांगीतली

चाणक्य हे एक महान विचारवंत होते, त्यांनी आपल्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, चाणक्य म्हणतात अशा काही गोष्टी असतात त्यांना जो व्यक्ती घाबरतो तो आपल्या आयुष्यात कधीच प्रगती करू शकत नाही, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे त्याबद्दल.

Chanakya Niti : असे लोकं कधीच आयुष्यात प्रगती करू शकत नाहीत, चाणक्य यांनी लक्षणं सांगीतली
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 06, 2025 | 6:35 PM

आर्य चाणक्य हे त्या काळातील एक महान विचारवंत होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी जे विचार मांडले आहेत, त्यातील अनेक गोष्टी 21 व्या शतकामध्ये आज देखील खऱ्या असल्याची प्रचिती येते. चाणक्य यांनी आपल्या ग्रंथामध्ये मानवी जीवनाशी संबंधित प्रत्येक विषयांसंदर्भात लिहून ठेवलं आहे. चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये भित्र्या व्यक्तीची काही लक्षण सांगितली आहेत, असा व्यक्ती कधीच प्रगती करू शकत नाही असं ते म्हणतात, जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे त्याबद्दल?

छोट्या -छोट्या गोष्टींमुळे आत्मविश्वास गमावतात – चाणक्य म्हणतात आत्मविश्वास ही अशी गोष्ट आहे, जो जर तुमच्याकडे असेल तर जगातील अशी कोणतीच गोष्ट नाही की ती तुमच्यासाठी अशक्य आहे. तुम्ही तुमच्या आत्मविश्वासाच्या बळावर हे संपूर्ण जग देखील जिंकू शकता. मात्र समाजात असे काही लोक असतात, जे छोट्या-छोट्या गोष्टींमुळे देखील आपला आत्मविश्वास गमावतात, असे लोक आयुष्यात कधीच प्रगती करू शकत नाहीत, त्यामुळे काही जरी झालं तरी तुम्ही तुमचा आत्मविश्वास कधीच गमावू नका असा सल्ला चाणक्य देतात.

जे कायम दुसर्‍यावर अवलंबून राहतात – चाणक्य म्हणतात जे लोक स्वत: काहीही कष्ट करत नाहीत, जे कायम दुसऱ्यावर अवलंबून असतात असे लोक त्यांच्या आयुष्यात कधीच प्रगती करत नाहीत, ते कधीच स्वावलंबी बनत नाहीत, त्यांना कायम दुसऱ्या व्यक्तीच्या आधाराची गरज भासते, आणि असा आधार मिळाला नाही तर हे लोक संकटात येतात. त्यामुळे दुसऱ्यावर कधीही अवलंबून राहू नका.

जे टीकेला घाबरतात – संत कबीर यांनी म्हटलं आहे की निंदकाचे घर असावे शेजारी, चाणक्य यांनी देखील हेच सांगितलं आहे. चाणक्य म्हणतात आपल्यावर जी टीका होते, त्यातून आपल्याला आपल्यामध्ये असलेले अवगुण लक्षात येतात. ते आपण दूर केले तर आपली प्रगती होऊ शकते, त्यामुळे कधीही टीकेला घाबरू नका.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)