
आपल्या कामाशी निष्ठावन राहणे ही यशाची पहीली पायरी आहे. जर तुम्ही तुमच्या कामाप्रती आस्था दाखवली नाहीत तर तुम्हाला कधीही यश मिळणार नाही. जर तुम्ही असे करत असाल तर तुमची प्रतिमा मलिन होऊ शकते. आयुष्यात यश मिळवण्यासाठी कामाप्रती प्रमाणिक राहणे गरजेचे असते.

काही लोक भाग्य किंवा हातांच्या रेषांवर अवलंबून असतात, पण धर्मामध्ये कर्म करण्याचा संदेश देण्यात आला आहे. यासाठीच मेहनत करण्यासाठी कधीच घाबरू नका. तुमच्या हाताच्या रेषा तुम्हाला मदत करतील हे नक्की सांगता येत नाही पण तुमची मेहनत तुम्हाला नक्की मदत करेल.

तुम्ही घेत असणारे निर्णय तुमचे आयुष्य बदलतात. त्यामुळे कोणताही निर्णय घेण्याआधी विचार करा. निर्णय घेताना तुमच्या प्रियजनांचे अनुभव लक्षात घ्या पण तुमच्या मनाने आणि सद्सदविवेक बुद्धीने विचार करुन निर्णय घ्या. असे केल्यास यश तुमचेच असेल.

हाती आलेल्या पैशाचा योग्य वापर करा. जर तुम्ही कमवलेल्या पैशाचा अयोग्य वापर करत असाल तर देवी लक्ष्मी तुमच्या कडे टिकू शकणार नाही. तुमच्या कडे असलेल्या पैशाचा वापर तुम्ही धार्मिक कामांमध्ये सुद्धा लावू शकता.