Chanakya Niti : पद प्रतिष्ठेपेक्षाही जास्त महत्त्वाच्या असतात या चार गोष्टी, चाणक्यांनी सांगितला सुखी जीवनाचा मंत्र
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. चाणक्य म्हणतात माणसाच्या आयुष्यात अशा काही गोष्टी असतात, ज्या पद प्रतिष्ठेपेक्षा कितीतरी महत्त्वाच्या असतात, याच गोष्टींवरुन माणसाची पारख होते, त्याची खरी ओळख समोर येते. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात माणूस आयुष्यभर आपलं पद आणि प्रतिष्ठेला जपत असतो. परंतु अशा काही गोष्टी आहेत, ज्या माणसाच्या पद प्रतिष्ठेपेक्षाही जास्त महत्त्वाच्या आहेत. जर या गोष्टी कुठल्याही माणसाकडे असतील तर अशा माणसांवर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवू शकता. तुमची कधीही फसवणूक होणार नाही. तसेच ज्या माणसांमध्ये हे गुण असतात, अशा माणसांच्या वाट्याला कधीही पराभव येत नाहीत. मात्र जे लोक आयुष्यभर आपल्या अंहकाराला चिकटून बसतात, त्यांच्यावर मात्र भविष्यात पश्चातापाची वेळ येते. त्यामुळे माणसाने आयुष्यात नम्र असणं गरजेचं आहे. चाल तर मग जाणून घेऊयात आर्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये नेमकं काय सांगितलं आहे? त्याबद्दल.
नम्रता – चाणक्य म्हणतात तुम्ही आयुष्यात कितीही प्रगती करा, कितीही यश संपादन करा, परंतु तुमच्याकडे जर नम्रता नसेल तर तुमच्या या सर्व यशाची किंमत शून्य आहे. त्यामुळे माणसाने नेमही नम्र असावं. जे लोक स्वभावाने नम्र असतात, सर्वांचा आदर करतात, अशा लोकांना मिळालेलं यश दीर्घकाळ टिकतं. परंतु जर तुमच्या अंगात नम्रता नसेल तर तुम्हाला जेवढ्या वेगात यश मिळालं आहे, तेवढ्याच वेगात तुमच्या प्रगतीचा आलेख खालवू देखील शकतो, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
खोटं न बोलणं- चाणक्य म्हणतात आयुष्यात माणसाने कधीही खोटं बोलू नये, तुमच्या खरं बोलण्यामुळे एखाद्या व्यक्तीचं मन देखील दुखवू शकतं, मन दुखवू द्या, परंतु खोटं बोलणं टाळा. जो माणूस खोटं बोलतो त्याच्यावरचा लोकांचा विश्वास कमी होतो. असा माणूस आपलीच फसवणूक करत असतो, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
शिस्त – चाणक्य म्हणतात जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात यश पाहिजे असेल तर तुमच्या अंगात शिस्त असणं गरजेचं आहे. जर तुमच्याकडे शिस्त नसेल तर तुम्ही कोणतंही काम व्यवस्थित करू शकत नाहीत. त्यामुळे आयुष्यात शिस्त ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, जर तुमच्याकडे शिस्त असेल तर तुम्हाला पद प्रतिष्ठा आपोआप मिळते, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
लोभ – चाणक्य म्हणतात आयुष्यात लोभ कधीही करू नका, स्वार्थासाठी कोणाचीही फसवणूक करू नका, जर तुम्ही लोभ टाळला तर आयुष्यात तुम्हाला खरं समाधान लाभेल.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)