
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला हा ग्रंथ आजही अनेकांना आपलं आयुष्य जगताना मार्गदर्शक ठरतो. चाणक्य यांचे विचारही आजही अनेकांना प्रेरणा देतात. माणसानं आदर्श जीवन कसं जगावं? याच थोडक्यात सार चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये सांगितलं आहे.
चाणक्य म्हणतात की जगात अशा तीन गोष्टी आहे, या गोष्टीपासून माणसानं दूर राहिलं पाहिजे, त्यातच त्याचं भलं आहे. या गोष्टी कधीच माणसांना आनंदानं सुखानं जगू देत नाही. त्या गोष्टी कोणत्या आहेत? आणि चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं? जाणून घेऊयात
कर्ज – आर्य चाणक्य म्हणतात कर्ज ही अशी गोष्ट आहे, जी मणसाला त्याच्या आयुष्यात सुखानं कधीच जगू देत नाही. आयुष्यभर कर्जाचं ओझ माणसाच्या डोक्यावर असंत. कर्जाची चिंता त्याच्या मनात असते, त्यामुळे तो कधीच सुखानं जगू शकत नाही. त्यामुळे आयुष्यात काहीही करा पण कधीच कर्जबाजारी होऊ नका असाल सल्ला आर्य चाणक्य देतात. आर्य चाणक्य म्हणतात पैशांचं असं नियोजन करा ज्यामुळे तुमच्यावर कधीच कर्जबाजारी होण्याची वेळ आली नाही पाहिजे. बचत करायला शिका असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
आजार – आर्य चाणक्य म्हणतात की जसं कर्ज हे माणवाचं शत्रू आहे, तसाच आजार देखील तुमचा सर्वात मोठा शत्रू आहे. तुम्ही जर वारंवार आजारी पडत असाला किंवा एखादा आजार तुम्हाला असेल तुम्ही कधीच आनंदानं जीवन जगू शकणार नाहीत, तुमच्याकडे असलेला सर्व पैसा हा त्या आजारांवरील उपचारातच खर्च होईल, त्यामुळे उत्तम आरोग्य कमवा असा सल्ला चाणक्य देतात.
शत्रू – आर्य चाणक्य म्हणतात की तुमच्या आयुष्यात शत्रू असता कामा नये, तुम्हाला जर एखादा शत्रू असेल तर त्याची भीती कायमच तुमच्या मनात असते, असं चाणक्य यांनी सांगितलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)