Chanakya Niti : तरुणपणातील या चार चुकांची आयुष्यभर मिळते मोठी शिक्षा, चाणक्य काय सांगतात?
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. माणसानं आयुष्य कसं जगावं याचं थोडक्यात सार त्यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये सांगितलं आहे.

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहीला, हा ग्रंथ आजही अनेकांना आपलं आयुष्य जगताना मार्गदर्शक ठरतो. चाणक्य यांचे विचार आजही अनेकांना प्रेरणा देतात. माणसानं आयुष्य जगताना कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नयेत याचं थोडक्यात सार आर्य चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये सांगितलं आहे.
मानसानं आयुष्यात कोणत्या गोष्टी कराव्यात? कोणत्या गोष्टी करू नयेत? आदर्श पतीची लक्षणं काय आहेत? आदर्श पत्नी कोणाला म्हणावे? आपला मित्र कोणाला म्हणावं? आपला शत्रू कोणाला म्हणावं? आयुष्यातील कोणत्या गोष्टी गुप्त ठेवाव्यात, जीवनात सर्वात महत्त्वाचा पैसा आहे त्याची बचत कशी करावी? अशा एकना अनेक गोष्टींबद्दल चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये मार्गदर्शन केलं आहे.
दम्यान आर्य चाणक्य म्हणतात की अनेक जण आपल्या तरुणपणात काही चुका करतात. तरुणपणात त्यांना या चुकांची जाणीव होत नाही, मात्र त्यांचं आयुष्य जसजसं वाढतं तसतशी त्यांनी भूतकाळात केलेल्या चुकांची जाणीव त्यांना होते, मात्र त्यावेळी त्यांच्या हातात काहीही उरत नाही, त्यांच्यावर पश्चतापाची वेळ येते, जाणून घेऊयात आर्य चाणक्य नेमकं काय म्हणतात.
चुकीची संगत – आर्य चाणक्य म्हणतात माणसाच्या आयुष्यात संगतीला खूप महत्त्व आहे. तुम्ही कोणासोबत राहाता? याचा परिणाम तुमच्या आयुष्यात होत असतो. तुम्ही त्याच व्यक्तीप्रमाणे वागता, बोलता, त्या व्यक्तीला तुम्ही फॉलो करतात, अशा परिस्थितीमध्ये तो व्यक्ती जर चुकीचा असेल तर भविष्यात तुम्हाला त्याची फार मोठी किंमत चुकवावी लागते.
वेळेचा अपव्यय – आर्य चाणक्य म्हणतात तरुणपणा हा तुमच्या आयुष्यातील सुवर्णकाळ असतो, या काळात वेळेचा अपव्यय करू नका, त्याची फार मोठी किंमत तुम्हाला भविष्यकाळात मोजावी लागू शकते.
नशीबावर अवलंबून राहाने – चाणक्य म्हणतात कधीही नशीबावर अवलंबून राहू नका, कष्ट करा.
जुगार, व्यसन – आर्य चाणक्य म्हणतात या दोन गोष्टींपासून सदैव दूर राहा.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
