Chanakya Niti : चुकीचं दान तुम्हाला बनवू शकतं कंगाल, चाणक्यांनी दिला मोलाचा सल्ला
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात की दानासारखं या जगात दुसरं कोणतं पुण्य नाही. मात्र दान देताना सुद्धा काही नियमांचं पालन करणं गरजेचं असतं. अन्यथा तुम्ही कंगाल व्हाल, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात की या जगात दाना इतकं दुसरं महान पुण्य नाही. जो व्यक्ती आपल्या आयुष्यात गरजू लोकांना दान करतो, त्याच्या कुळाचा उद्धार होतो. अशा व्यक्तीला त्याच्या आयुष्यात मोठा मान-सन्मान प्राप्त होतो. परंतु दान देताना काही नियमांचं पालन करणं देखील गरजेचं असतं. जर तुम्ही हे नियम पाळले नाहीत तर तुमचं आयुष्य देखील उद्ध्वस्त होऊ शकतं. चाणक्य यासाठी एक उदाहरण देतात, चाणक्य म्हणतात दान नेहमी गरजू व्यक्तीलाच दिलं पाहिजे. तरच तुम्ही दिलेल्या दानाचा योग्य फायदा होतो. एखाद्या व्यक्तीला तुम्ही दिलेल्या दानाची गरज नाही, परंतु तरी देखील तुम्ही अशा व्यक्तीला दान दिलं तर असा व्यक्ती तुम्ही दिलेल्या दानाचा किंवा पैशांचा चुकीच्या गोष्टींसाठी उपयोग करू शकतो. त्यामुळे तुम्ही देखील या पापामध्ये अप्रत्यक्षपणे भागीदार होतात, त्यामुळे दान हे नेहमी काळजीपूर्वकच दिलं पाहिजे असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.
गरज ओळखा- चाणक्य म्हणतात तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीला दान देण्याची इच्छा झाली तर त्याला किती गरज आहे? हे आधी ओळखा. कारण या जगात असे देखील अनेक लोक आहेत, ज्यांना दानाची किंवा तुमच्या पैशांची खरच गरज नसते, ते फक्त उधळपट्टी करण्यासाठी पैसे घेतात. ते तुम्ही त्यांना दिलेले पैसे चुकीच्या मार्गाने खर्च करतात. त्यामुळे खऱ्या गरजूपर्यंत तुमची मदत पोहोचू शकत नाही, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
स्वार्थी लोकांना मदत करू नका – चाणक्य म्हणतात या जगात असे देखील काही लोक असतात जे प्रचंड स्वार्थी आणि असमाधानी असतात. तुम्ही त्यांना कितीही मदत केली तरी देखील त्यांचं समाधान होत नाही. ते प्रत्येकवेळी तुमच्याकडून मदतीची अपेक्षा ठेवूनच असतात. अशा लोकांना तुम्ही तुमची संपूर्ण संपत्ती जरी दान केली तर देखील त्या लोकांना कमीच पडणार आहे. अशा लोकांना तुम्ही जर मदत करायला जाल तर तुम्ही स्वत: कंगाल व्हाल त्यामुळे अशा लोकांना कधीही मदत करू नका असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
दान कोणाला करावं? चाणक्य म्हणतात ज्या लोकांना खरी गरज आहे, अशाच लोकांना तुम्ही मदत करा, त्यामुळे तुम्हाला पुण्य मिळेल समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)