Chandra Grahan 2021 : चंद्रग्रहण किती प्रकारचे असतात? जाणून घ्या त्याचं महत्त्व

या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण येत्या 19 नोव्हेंबर 2021 शुक्रवारी होणार आहे. ज्या दिवशी चंद्रग्रहण होईल त्या दिवशी कोणतेही शुभ कार्य करु नये असे म्हणतात. एवढेच नाही तर ग्रहण काळात घराबाहेरही पडू नये, असे सांगितले आहे. या दिवशी जेवढी शक्य तेवढी देवाची पूजा करावी, असंही म्हणतात.

Chandra Grahan 2021 : चंद्रग्रहण किती प्रकारचे असतात? जाणून घ्या त्याचं महत्त्व
lunar Eclipse 2021
Follow us
| Updated on: Nov 19, 2021 | 12:43 PM

मुंबई : Chandra Grahan 2021 : या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण येत्या 19 नोव्हेंबर 2021 शुक्रवारी होणार आहे. ज्या दिवशी चंद्रग्रहण होईल त्या दिवशी कोणतेही शुभ कार्य करु नये असे म्हणतात. एवढेच नाही तर ग्रहण काळात घराबाहेरही पडू नये, असे सांगितले आहे. या दिवशी जेवढी शक्य तेवढी देवाची पूजा करावी, असंही म्हणतात.

धार्मिक मान्यतांनुसार, सूर्य किंवा चंद्रग्रहण अशुभ मानले जाते. या वर्षातले शेवटचे चंद्रग्रहण याच महिन्यात होणार आहे. हे चंद्रग्रहण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, पूर्व आशिया, उत्तर युरोप आणि अमेरिकेत दिसणार आहे. 19 नोव्हेंबर रोजी होणारे चंद्रग्रहण आंशिक असेल, ज्याचा प्रभाव भारतातील आसाम आणि अरुणाचल प्रदेशात काही काळ दिसून येईल. ज्योतिषशास्त्रानुसार, वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ त्रासदायक ठरु शकतो.

चंद्रग्रहणाचा आंशिक टप्पा सकाळी 11:34 वाजता सुरु होईल आणि IST सायंकाळी 5:33 वाजता संपेल. या वर्षाच्या सुरुवातीलाही चंद्रग्रहण झाले होते, ज्याला “सुपर फ्लॉवर ब्लड मून” असे म्हटले गेले.

1. उपच्छाया चंद्रग्रहण (penumbral lunar eclipse)

ज्योतिष शास्त्रानुसार, उपच्छाया चंद्रग्रहण देखील असते. हे चंद्रग्रहण पृथ्वीची सावली मानली जाते. या ग्रहणात चंद्राच्या आकारमानावर कोणताही परिणाम होत नाही. यामध्ये चंद्राच्या प्रकाशात थोडासा अस्पष्टपणा असते, ज्यामध्ये ग्रहण ओळखणे सोपे नसते.

2. आंशिक चंद्रग्रहण (partial lunar eclipse)

ज्योतिषशास्त्रानुसार, आंशिक चंद्रग्रहण देखील खूप वेळा होते. हे ग्रहण तेव्हा होते जेव्हा पृथ्वी पूर्णपणे सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येत नाही, फक्त तिची सावली चंद्रावर पडते. हे ग्रहण फार काळासाठी नसते. मात्र, यामध्ये सुतकातील सर्व नियम पाळावे लागतात.

3. पूर्ण चंद्रग्रहण (total lunar eclipse)

संपूर्ण चंद्रग्रहणात सुतक कालावधी मानला जातो. यामध्ये सुतक ग्रहणाच्या वेळेच्या 12 तासापूर्वी लागतो. या ग्रहणात पृथ्वी पूर्णपणे चंद्र आणि सूर्याच्या मधे येते. ज्यामध्ये पृथ्वी चंद्राला पूर्णपणे व्यापते. या ग्रहणात चंद्राचा रंगही लाल होतो आणि त्यावर डागही दिसतात. ज्योतिषशास्त्रानुसार संपूर्ण चंद्रग्रहण हे सर्वात प्रभावी मानले जाते. तसेच, सर्व राशींवर याचा चांगला आणि वाईट प्रभाव पडतो.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Last Lunar Eclipse of 2021 | दरवर्षी सूर्यग्रहण चंद्रग्रहण का होते?, जाणून घ्या वैज्ञानिक कारण आणि धार्मिक महत्त्व

Lunar eclipse | शतकातील सर्वात मोठं चंद्रग्रहण, चंद्र लाल का दिसतो? जाणून घ्या चंद्र ग्रहणाबद्दलच्या खास गोष्टी

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.