AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nails Cutting Day: ‘या’ 4 दिवशी नख कापताय… व्हा सावध, होईल मोठं नुकसान

Nails Cutting Rule: हिंदू धर्मात परंपरेनुसार अनेक प्रथा चालत आल्या आहेत आणि आजच्या काळातील अनेक जण त्या प्रथा पाळतात देखील... नखे कापण्याबद्दल देखील अनेक गोष्टी शास्त्रांमध्ये सांगण्यात आल्या आहे... 'या' 4 दिवशी चुकूनही नखे न कापण्याचा सल्ला शास्त्रामध्ये देण्यात आला आहे.

Nails Cutting Day: 'या' 4 दिवशी नख कापताय... व्हा सावध, होईल मोठं नुकसान
Nails Cutting Rule
| Updated on: Nov 16, 2025 | 12:47 PM
Share

Nails Cutting Rule: आज धवपळीच्या जगात अनेक कामे योग्य वेळेत होत नाहीत. त्यामुळे अनेक जण जमेल तसं राहिलेला कामे पूर्ण करतात. पण हिंदू धर्मात प्रत्येक कामासाठी एक वेळ आणि दिवस ठरवून देण्यात आला आहे. त्यानुसार पुर्वीची लोकं स्वतःची कामे आवरत होती… हिंदू धर्मात प्रत्येक कार्यासाठी शुभ आणि अशुभ दिवस निश्चित केले आहेत. शुद्धता आणि सौंदर्याशी संबंधित कामे, जसे की नखे आणि केस कापणे, यासाठी देखील हिंदू धर्मग्रंथांमध्ये नियम आणि दिवस सांगितले आहेत.

हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, योग्य दिवशी आणि विहित विधींनुसार नखे कापल्याने सकारात्मक परिणाम मिळतात. मात्र, हिंदू धर्मग्रंथांमध्ये काही विशिष्ट दिवशी नखे कापण्यास मनाई आहे. या चार दिवसांत नखे कापल्याने आर्थिक अडचणी आणि दारिद्र्य येऊ शकते असे शास्त्रांमध्ये सांगितले आहे. तर चला जाणून घेऊया कोणते चार दिवस नखे कापू नयेत?

शनिवार : शनिवार हा दिवस सूर्य पुत्र आणि नऊ ग्रहांपैकी सर्वात महत्वाचा असलेल्या शनिदेवाला समर्पित आहे. शकुन शास्त्रात असे म्हटले आहे की नखे आणि केस यांसारखे शारीरिक अपव्यय शनि ग्रहाशी संबंधित आहेत. या दिवशी नखे कापल्याने शनिदेव क्रोधित होऊ शकतात. यामुळे आर्थिक नुकसान, दारिद्र्य आणि दुर्दैव होऊ शकते.

मंगळवार : मंगळवार हा भगवान हनुमान आणि मंगळ ग्रहाला समर्पित मानला जातो. मंगळ हा ऊर्जा आणि धैर्याचा स्रोत मानला जातो. शास्त्रानुसार, जो व्यक्ती मंगळवारी नखे कापतो, त्याचे धैर्य आणि आत्मविश्वास कमी होतो. एवढंच नाही तर, त्याच्यावर आसलेलं कर्ज देखील वाढतं.

गुरुवार : गुरुवार हा दिवस ज्ञान, बुद्धी आणि समृद्धीचा देवता बृहस्पतिला समर्पित मानला जातो. गुरुवारी नखे कापल्याने बृहस्पति कमकुवत होतो आणि वैवाहिक अडचणी वाढतात.

रविवार : रविवार हा सूर्यदेवाचा दिवस मानला जातो. तो आत्मा, आरोग्य आणि सन्मानाचा प्रतीक आहे. या दिवशी नखे कापणे अशुभ मानले जाते. असे केल्याने आत्मविश्वास आणि आदर कमी होतो.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
राजकारण पुन्हा तापलं! गडकरींनी तात्काळ राजीनामा... पुन्हा नव्या मागणी
राजकारण पुन्हा तापलं! गडकरींनी तात्काळ राजीनामा...  पुन्हा नव्या मागणीने मोठी खळबळ
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद, तब्बल
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद, तब्बल 400...
लाडक्या बहिणींना अखेर ती खुशखबर आलीच, आदिती तटकरेंनी थेट घोषणाच केली;
लाडक्या बहिणींना अखेर ती खुशखबर आलीच, आदिती तटकरेंनी थेट घोषणाच केली; लाखो महिलांन होणार फायदा!
मोदींच्या निवासस्थानाबाहेर... इंदिरा गांधींचा उल्लेख करत एकनाथ शिंदें
मोदींच्या निवासस्थानाबाहेर... इंदिरा गांधींचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंचा मोठा दावा!
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेची तब्येत खालावली; रुग्णालयातील फोटोंनी
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेची तब्येत खालावली; रुग्णालयातील फोटोंनी वाढवलं टेन्शन
आम्ही फेस टु फेस वाले, तुम्ही... भर मंचावरून एकनाथ शिंदे काय म्हणाले?
आम्ही फेस टु फेस वाले, तुम्ही... भर मंचावरून एकनाथ शिंदे असं का म्हणाले?
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला थेट अटक, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला थेट अटक, नेमकं काय घडलं?
ठाकरेंच्या सभेत बोलक्या बाहुल्याचाही सरकावर वर हल्लाबोल; थेट म्हणाला,
ठाकरेंच्या सभेत बोलक्या बाहुल्याचाही सरकावर वर हल्लाबोल; थेट म्हणाला, धुरंधर 3 मध्ये पंतप्रधान...
खड्डामंत्री म्हणत मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, एकाच...
खड्डामंत्री म्हणत मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, एकाच शब्दाने उडवली खळबळ
दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर स्वतः मुख्यमंत्री फडणवसीचं स्पष्टीकरण
दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवसीचं स्पष्टीकरण, म्हणाले...