डिसेंबर 2025मध्ये महासंकट ? ग्रहांचं महासंक्रमण… हवामानापासून राजकारणापर्यंत मोठ्या उलथापालथी घडणार… सतर्क राहावे लागणार
डिसेंबर 2025 मध्ये गुरु, बुध आणि मंगळ या ग्रहांच्या महासंक्रमणामुळे हवामान, अर्थव्यवस्था आणि राजकारणात मोठ्या उलथापालथी घडणार आहेत. ५ ते ९ डिसेंबर दरम्यान होणारे हे बदल अनेक क्षेत्रांवर परिणाम करतील, ज्यामुळे अस्थिरता निर्माण होईल. या काळात सावध राहावे, कारण हा महिना अनेक महत्त्वाच्या घडामोडींचा साक्षीदार ठरेल.

यंदाच्या वर्षातील शेवटच्या महिन्यात म्हणजे डिसेंबर 2025मध्ये सर्वांनाच सतर्क राहावे लागणार आहे. कारण 5 ते 9 डिसेंबरच्या दरम्यान गुरू, बुध आणि मंगळ हे तीन मोठे ग्रह रास बदलत आहेत. या पाच दिवसाच्या ग्रह संक्रमणामुळे हवामानापासून ते अर्थव्यवस्थेपर्यंत आणि राजकारणापासून सामान्य जनजीवनापर्यंत सर्वांवरच मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्यात सर्वांनाच सावध राहावे लागणार आहे. हा महिना घडामोडी आणि उलथापालथीचा असेल असं सांगितलं जात आहे.
डिसेंबर 2025ची सुरुवात होताच ग्रह एकमेकांना आव्हान देत असल्याचं दिसून येईल. महिन्याचा पहिला आठवडा असामान्य असणार आहे. गुरू, बुध आणि मंगळ हे तिन्ही ग्रह सातत्याने आपली स्थिती बदलत असतात आणि प्रत्येक बदल स्वत:ची ऊर्जा घेऊन येत असतो. पंचागानुसार 5 ते 9 डिसेंबरचा कालखंड हा संपूर्ण महिन्याचा पाया ठरणार आहे.
महिना अस्थिर…
हवामानाती बदल, त्यानंतर थंडी, शेअर मार्केटमध्ये तेजी आणि परत मंदी, राजकारणात तोंडसुख घेण्याचे प्रकार, कृषी क्षेत्रातील चढउतार… अशा प्रत्येक क्षेत्राला ग्रहांच्या चालीचा परिणाम भोगावा लागमार आहे. हा महिना स्थिर नसेल. या महिन्यात प्रत्येक आठवड्यात नवीन ऊर्जा आणि नवीन परिणाम पाहायला मिळणार आहे. सूर्याचा 16 डिसेंबर रोजी धनी राशीत प्रवेश होणार आहे. त्यामुळेच बऱ्याच उलाढाली होणार आहे. त्यामुळे नवीन वळण मिळणार आहे. संपूर्ण महिनाच समजून घ्यायचा असेल तर ग्रह संक्रमणाला सविस्तर समजून घेणे आवश्यक आहे.
हवामान बदलणार, बाजार तापणार
डिसेंबर महिना हा सामान्य शांत आणि थंड महिना नाहीये. 5 डिसेंबर रोजी गुरुचा मिथुनमध्ये प्रवेश होणार असून त्यामुळे वातावरणाच्या संतुलनावर परिणाम होणार आहे. गुरु जेव्हा वायू प्रधान राशीत येतो तेव्हा हवा, धुके, थंडी पसरते. दक्षिणेला पावसाचा अभाव राहणार आहे. या बदलाचा थेट बाजारावरही परिणाम होताना दिसत आहे. तेल, तीळ, शेंगदाणा, नारळ, सुपारी, राईचं तेल, सोनं आणि चांदी सारख्या उत्पादनात अचानक तेजी वाढणार आहे. केवळ एका दिवसासाठी ही तेजी नसेल तर येणाऱ्या आठवड्यापर्यंत बाजारात एक अस्वस्थता दिसणार आहे.
मसाले, धान्य, डाळ आणि तेलात मंदी
6 डिसेंबर रोजी बुधाचे वृषभ राशीतील प्रवेशामुळे ही तेजी मंदावेल. मसाले, धान्य, डाळ आणि तेल आदी सर्वांमध्ये मंदीचे संकेत आहेत. पंचागातील हे संकेत आधुनिक बाजारातही सटिक लागू होतात. कारण बुध तर्क, व्यापार, भाव, संचार आणि व्यवहारांचा ग्रह आहे. पृथ्वी तत्त्वांच्या राशीत हा ग्रह येताच निर्णय घेणं थंडावेल. भाव पडण्याची किंवा स्थिर राहण्याची शक्यता आहे. व्यापारी समुदाय बाजारातील हालचालीमुळे सतर्क होईल.
सोने–चांदीवर परिणाम काय?
7 डिसेंबरला मंगळ धनु राशीत प्रवेश करताच संपूर्ण वातावरण पुन्हा एकदा तीव्र होईल. मंगळ अग्नी आणि ऊर्जेचा कारक आहे, तर धनु विस्तार आणि गतिचे प्रतीक. या संयोगामुळे धान्य, गहू, तृणधान्य, कापूस, रसपदार्थ आणि तेलबिया यांसारख्या वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता असते. सोने आणि चांदीवरही याचा स्पष्ट परिणाम दिसतो. शेती, परिवहन, लॉजिस्टिक्स आणि सरकारी धोरणांमध्येही या दिवसापासून हालचाल दिसून येते. प्रशासन निर्णय वेगाने घेऊ लागते आणि प्रवास, क्रीडा, सुरक्षा आणि लष्करी हालचालींनाही गती मिळते.
डिसेंबरचा सर्वात महत्त्वाचा दिवस
9 डिसेंबरचा दिवस अत्यंत संवेदनशील मानला जातो. मंगळ अनुराधा आणि ज्येष्ठा नक्षत्रांच्या प्रभावात येतो, ज्यांना पारंपरिक ज्योतिषात सत्ता, नियंत्रण, आदेश, वाद आणि संघर्ष यांचे प्रतीक मानले जाते. पावसाचा अभाव, उत्तर भारतातील कोरडी थंडी, राज्यांमधील राजकीय बयानबाजी, प्रशासकीय तणाव आणि बाजारातील अनिश्चितता — या सर्व परिस्थिती ग्रहस्थितीशी थेट जोडल्या जातात.
हा दिवस महिन्यातील अत्यंत महत्त्वाच्या दिवसांपैकी एक आहे, कारण मंगळ आणि बुध यांचा हा अप्राकृतिक संबंध लोकांच्या वर्तनावर, हवामानावर, शासनव्यवस्थेवर आणि आर्थिक धोरणांवर थेट परिणाम करणार आहे. याचा प्रभाव केवळ देशातच नव्हे तर परदेशातही जाणवेल.
या चार दिवसांचा — 05, 06, 07 आणि 09 डिसेंबरचा — संयुक्त प्रभाव समजून घेणे म्हणजे संपूर्ण महिन्याची दिशा समजून घेणे.
आधी ओलावा, मग थंडी; आधी तेजी, मग मंदी; आधी ऊर्जा, मग घाई–गडबड — असे परिवर्तन दिसेल. डिसेंबर 2025 लोकांना संपूर्ण काळ सावध राहण्याचे संकेत देतो.
राजकीय उलथापालथींचा महिना
16 डिसेंबरला सूर्य धनु राशीत प्रवेश करतो, ज्याला धनु संक्रांती म्हणतात. या परिवर्तनाला धार्मिक, सामाजिक आणि नीतिगत दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. सूर्याचा हा गोचर अध्यात्म, दानधर्म, प्रवास, नीति, न्याय, शिक्षण आणि परराष्ट्र संबंधांमध्ये सक्रियता आणतो. सरकारी विभागांत कामकाजाची गती वाढते, अर्थसंकल्पपूर्व तयारी सुरू होते आणि काही मोठ्या निर्णयांचे संकेत मिळू लागतात. राजकीय हालचालींमध्येही गंभीरता येते, राजकीय पक्षांतील संघटनात्मक स्तरावर प्रलंबित कामांना वेग येतो. संघटनेचे नव्या स्वरूपाचे दर्शन घडते. या गोचरामुळे अल्पवृष्टीसंबंधित परिस्थितीही स्थिर होऊ लागतात.
ज्योतिषीय गणना आणि पंचांग यांनुसार डिसेंबर 2025 ला हलक्यात घेणे योग्य नाही. हा महिना सावधानता, निरीक्षण आणि व्यावहारिक संयमाची मागणी करतो. जे लोक वेळ पाहून निर्णय घेतात, त्यांच्यासाठी हा महिना संधी उघडू शकतो; परंतु जे आपल्या भावना आणि घाईगडबडीत निर्णय घेतात, त्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
