AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dhanteras 2022: भारतातील ‘हे’ मंदिरं आहेत भगवान धन्वंतरीला समर्पित आहे, धनत्रयोदशीला होते भाविकांची गर्दी

उद्या धनत्रयोदशी आहे. आयुर्वेदाचे जनक भगवान धन्वन्तरी यांना हा दिवस समर्पित आहे. भारतात भगवान धन्वन्तरी यांची काही प्राचीन मंदिरं आहेत.

Dhanteras 2022: भारतातील 'हे' मंदिरं आहेत भगवान धन्वंतरीला समर्पित आहे, धनत्रयोदशीला होते भाविकांची गर्दी
भगवान धन्वन्तरी यांचे मंदिर Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Oct 22, 2022 | 7:48 PM
Share

मुंबई,  धनत्रयोदशीच्या (Dhanteras 2022) दिवशी भगवान धन्वंतरीची पूजा केली जाते. उद्या  23 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशीचा सण साजरा केला जाणार आहे. भगवान धन्वंतरी (Dhanwantari) हे विष्णूचा अवतार आणि आयुर्वेदाचे जनक आहेत. धर्मग्रंथानुसार धनत्रयोदशीच्या दिवशी  समुद्र मंथानंतर भगवान धन्वंतरी अमृत कलश घेऊन महासागरातून बाहेर पडले होते. भगवान धन्वंतरी यांचे भारतात मंदिरं देखील आहेत. धनत्रयोदशीच्या दिवशी या मंदिरात भाविकांची गर्दी असते. चला जाणून घेऊया या मंदिरांबद्दल.

रंगनाथस्वामी मंदिर

धनत्रयोदशीच्या दिवशी  तामिळनाडूमध्ये असलेल्या रंगनाथस्वामी मंदिरात भक्तांची गर्दी असते. हे मंदिर भगवान धन्वंतरीला समर्पित आहे. या मंदिरात प्रसाद म्हणून औषधी वनस्पती दिल्या जातात.

श्री धन्वंतरी मंदिर

तमिळनाडूमध्ये भगवान धन्वंतरीचे आणखी एक प्रसिद्ध मंदिर आहे. ते कोईम्बतूर येथे आहे.

धन्वंतरी मंदिर

हे मंदिर नेल्लुवाई येथे आहे. असे मानले जाते की या मंदिरात भगवान धन्वंतरीची मूर्ती अश्विनी देवांनी स्थापित केली होती. हे मंदिर 5000 वर्षे जुने आहे.

थोट्टुवा मंदिर

हे मंदिर भगवान धन्वंतरीचे प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिरातील देवतेची मूर्ती सुमारे 6 फूट उंच आहे. या मंदिरात लोण्याचा प्रसाद दिला जातो.

धनत्रयोदशीला घरी आणा या दोन वस्तू

1. भांडी

धनत्रयोदशीच्या दिवशी भांडी खरेदी करण्याचीही परंपरा आहे, परंतु बहुतेकांना कोणती धातूची भांडी खरेदी करावी हे माहित नाही. जर तुम्हाला शंका असेल तर पितळेची भांडी खरेदी करा आणि ती तुमच्या घराच्या पूर्व दिशेला ठेवा.

2. धणे

या दिवशी धने खरेदी करण्याचीही परंपरा आहे. धनत्रयोदशीला धने खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. हे समृद्धीचे प्रतीक मानले जाते. देवी लक्ष्मीला पूजेत धने अर्पण करून नंतर ते आपल्या तिजोरीत ठेवावे. तसेच या दिवशी कुंडीत किंवा अंगणात  कोथिंबीर पेरावी.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
आम्ही निवडणुक आयोगाची 'ती' चूक समोर आणली, अपात्रतेबाबत... सुनावणीनंतर
आम्ही निवडणुक आयोगाची 'ती' चूक समोर आणली, अपात्रतेबाबत... सुनावणीनंतर ठाकरे गटाकडून पहिली प्रतिक्रिया
एकनाथ शिंदे यांची निवडच बेकायदेशीर... ठाकरेंच्या वकिलांच्या दाव्याने..
एकनाथ शिंदे यांची निवडच बेकायदेशीर... वकिलांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद म्हणजे काय ब्रम्हवाक्य नाही, आम्ही...
कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद म्हणजे काय ब्रम्हवाक्य नाही, आम्ही... शिंदे गटातील नेत्याच्या विधानाने खळबळ
आम्हाला अपात्रतेवर निर्णय द्यायचा आहे; कोर्टाच्या सुनावणीत मोठा खुलासा
मोठी बातमी! आम्हाला अपात्रतेवर निर्णय द्यायचा आहे; सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीत मोठा खुलासा, मात्र शिवसेना कुणाची? ह्यावर सस्पेन्स कायम
अपात्रतेआधीच चिन्ह दिलं, निवडणूक आयोगाला धारेवरच धरलं
Shivsena SC Hearing | सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल यांचा मोठा दावा! अपात्रतेआधीच चिन्ह दिलं, निवडणूक आयोगाला धारेवरच धरलं
मुलीला पलंगाच्या टोकाला बांधलं अन्... डार्क वेबचा वापर करून कट?
Nagpur | मुलीला पलंगाच्या टोकाला बांधलं अन्... वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लेकाचं भयनाक कृत्य
विधिमंडळ पक्ष म्हणजे मूळ पक्ष नाही; कोर्टात सिब्बल यांचा युक्तिवाद
Shivsena Symbol Hearing Update | विधिमंडळ पक्ष म्हणजे मूळ पक्ष नाही; सुप्रीम कोर्टात सिब्बल यांचा सडेतोड युक्तिवाद
विधिमंडळ स्तरावर शिंदेंकडे बहुमत होतं, मात्र... कपिल सिब्बल
विधिमंडळ स्तरावर शिंदेंकडे बहुमत होतं, मात्र... कपिल सिब्बल यांच्या युक्तीवादाने डाव पलटणार?
सप्टेंबरमध्ये मोठा निर्णय! अभिजीत दिपकेंनी सांगितली CJP ची पुढील रणनीत
सप्टेंबरमध्ये मोठा निर्णय! अभिजीत दिपकेंनी सांगितली CJP ची पुढील रणनीती
मंत्रिमंडळ बैठकीनंतर मोदी-शाह यांची तातडीची बैठक; नेमकं काय शिजतंय?
PM Modi–Amit Shah Meeting | मंत्रिमंडळ बैठकीनंतर मोदी-शाह यांची तातडीची बैठक; नेमकं काय शिजतंय?