AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Diwali 2022: धनत्रयोदशीला झाडणीचे हे पाच उपाय करेल सर्व आर्थिक समस्या दूर

धनत्रयोदशीला केलेल्या काही उपायांमुळे घरात लक्ष्मी टिकून राहते. विशेष म्हणजे या उपायांसाठी फार पैसे देखील खर्च करावे लागत नाही.

Diwali 2022:  धनत्रयोदशीला झाडणीचे हे पाच उपाय करेल सर्व आर्थिक समस्या दूर
धनतेरस उपाय Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Oct 21, 2022 | 11:54 PM
Share

मुंबई, रविवार 23 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशीचा सण (Dhanteras Upay) आहे. धनत्रयोदशीला पितळेची आणि चांदीची भांडी खरेदी करण्याची परंपरा आहे. असे मानले जाते की या दिवशी भांडी खरेदी केल्याने संपत्ती आणि समृद्धी प्राप्त होते. धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी यमदेवाला दिवा दान केला जातो. धनत्रयोदशीच्या दिवशी केलेले काही उपाय खूप फायदेशीर असतात. यामध्ये झाडूशी संबंधित उपाय विशेषतः प्रभावी आहेत. चला जाणून घेऊया झाडूशी संबंधित या उपायांविषयी, जे धनत्रयोदशीच्या दिवशी देवी लक्ष्मीच्या आशीर्वादासाठी केले जातात.

धनत्रयोदशीला करा झाडूचे हे उपाय

  1. ज्योतिषशास्त्रानुसार झाडूचा संबंध धनाची देवी लक्ष्मीशी आहे. त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन झाडू खरेदी करावा. या दिवशी झाडू दान करणे देखील खूप शुभ मानले जाते.
  2. पैशाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी धनत्रयोदशीच्या दिवशी तीन झाडू खरेदी करा त्यापैकी एक मंदिरात चुपचाप ठेऊन या. असे मानले जाते की यामुळे सर्व प्रकारचे आर्थिक त्रास दूर होतात.
  3. धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन झाडू खरेदी करा आणि त्याच झाडूने संपूर्ण घर स्वच्छ करा. वापरल्यानंतर, हा झाडू कुठेतरी लपवून ठेवा जेथे लोक पाहू शकत नाहीत.
  4. धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन झाडू आणा पण जुना झाडू फेकून देऊ नका. धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी जुन्या झाडूची पूजा करा. यानंतर नवीन झाडूची पूजा करा आणि घरात सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करा.
  5. जुन्या झाडूला काळा धागा बांधा आणि तो दाराच्या मागे ठेवा. यामुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही. झाडू हे देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते, म्हणून  झाडूचा अनादर करणे म्हणजे संपत्तीची देवी लक्ष्मीचा अनादर करणे होय. असे केल्याने माता लक्ष्मी नाराज होते.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट