AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Diwali 2022: धनत्रयोदशीला घरी आणा या चार वस्तू, शास्त्रात सांगितले आहे महत्त्व

धनत्रयोदशी हा दिवाळीतला महत्त्वाचा सण आहे. शास्त्रानुसार या दिवशी काही वस्तू खरेदी केल्याने खरात सुख-समृद्धी नांदते.

Diwali 2022: धनत्रयोदशीला घरी आणा या चार वस्तू, शास्त्रात सांगितले आहे महत्त्व
भगवान धन्वन्तरी Image Credit source: Social Media
| Updated on: Oct 20, 2022 | 10:35 PM
Share

मुंबई, अगदी दोन-तीन दिवसांवर धनत्रयोदशीचा (Dhanteras 2022) सण आलेला आहे. पौराणिक मान्यतेनुसार, धनत्रयोदशीच्या दिवशी समुद्रमंथनाच्या (Samudramanthan) वेळी भगवान धन्वंतरी (Bhagwan Dhanwantari) हातात अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते. भगवान धन्वंतरी हे देखील श्री हरीचे रूप मानले जाते. भगवान धन्वंतरी हे आयुर्वेदाचे जनक मानले जातात. याशिवाय धनत्रयोदशीच्या दिवशी यमाच्या म्हणजेच दक्षिण  दिशेने दिवा लावण्याची प्रथा आहे. शास्त्रानुसार असे मानले जाते की, धनत्रयोदशीच्या दिवशी ज्या काही वस्तू खरेदी केल्या जातात, त्या वस्तू वर्षभर घरात समृद्धी आणतात. धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरीची पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. चला जाणून घेऊया धनत्रयोदशीच्या दिवशी कोणकोणत्या गोष्टी खरेदी कराव्यात.

1. भांडी

धनत्रयोदशीच्या दिवशी भांडी खरेदी करण्याचीही परंपरा आहे, परंतु बहुतेकांना कोणती धातूची भांडी खरेदी करावी हे माहित नाही. जर तुम्हाला शंका असेल तर पितळेची भांडी खरेदी करा आणि ती तुमच्या घराच्या पूर्व दिशेला ठेवा.

2. गुंतवणूक करावी 

धनत्रयोदशीच्या दिवशी गुंतवणूक करणे खूप शुभ मानले जाते. या दिवशी धनाशी संबंधित जी काही कामे केली जातात, ती सर्व पूर्ण होतात आणि त्याच वेळी शुभ परिणामही प्राप्त होतात.

3. धणे

या दिवशी धने खरेदी करण्याचीही परंपरा आहे. धनत्रयोदशीला धने खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. हे समृद्धीचे प्रतीक मानले जाते. देवी लक्ष्मीला पूजेत धने अर्पण करून नंतर ते आपल्या तिजोरीत ठेवावे. तसेच या दिवशी कुंडीत किंवा अंगणात  कोथिंबीर पेरावी.

4. चांदी

या दिवशी चांदी खरेदी करणे देखील खूप शुभ मानले जाते. वास्तविक, चांदी हे चंद्राचे प्रतीक मानले जाते. चंद्र मनाला शांती आणि शीतलता देतो. त्यामुळे मन शांत ठेवण्यासाठी या दिवशी चांदीची कोणतीही वस्तू खरेदी करता येते.

5. पणती 

धनत्रयोदशीला यमाला दिवा दान करण्याचे विशेष महत्त्व आहे. धनत्रयोदशीच्या संध्याकाळी मुख्य दरवाजावर 13 दिवे लावावेत.  तसेच दक्षिण दिशेला देखील दिवा लावावा. शास्त्रात दक्षिण दिशेला यमाची दिशा म्हणतात.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.