AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rahu Kaal | राहूकाळात चुकूनही कुठलं शुभ कार्य करु नये, अन्यथा अडचणी संपणार नाही, जाणून घ्या कधी असतो राहूकाळ

सनातन धर्मात कोणतेही कार्य करण्यासाठी शुभ वेळ (Rahu Kaal) असल्याचा उल्लेख आहे. हेच कारण आहे की ज्योतिषाचार्य यांच्याकडून ग्रह, नक्षत्र इत्यादींची स्थिती पाहिल्यानंतर कोणत्याही चांगल्या कार्यासाठी शुभ मुहूर्त काढला जाते.

Rahu Kaal | राहूकाळात चुकूनही कुठलं शुभ कार्य करु नये, अन्यथा अडचणी संपणार नाही, जाणून घ्या कधी असतो राहूकाळ
Rahu Kaal
| Updated on: May 25, 2021 | 9:31 AM
Share

मुंबई : सनातन धर्मात कोणतेही कार्य करण्यासाठी शुभ वेळ (Rahu Kaal) असल्याचा उल्लेख आहे. हेच कारण आहे की ज्योतिषाचार्य यांच्याकडून ग्रह, नक्षत्र इत्यादींची स्थिती पाहिल्यानंतर कोणत्याही चांगल्या कार्यासाठी शुभ मुहूर्त काढला जाते. असे म्हणतात की जर शुभ काम करण्याची वेळ अशुभ असेल तर त्या कामात अनेक व्यत्यय येऊ शकतात आणि ते काम लवकर पूर्ण होत नाही (Do Not Do Any Auspicious Work In Rahu Kaal Know The Reason And Timings Of Rahu Kaal).

राहुकाळ याला ज्योतिषानुसार अशुभ मानले जाते. दररोज एकदा दीड तास राहू काळ असतो. ज्योतिष तज्ज्ञांचे मत आहे की राहु काळात कोणतेही शुभ कार्य केले जाऊ नये. कारण, त्यामध्ये केलेल्या कामांमद्ये अनावश्यक अडथळे निर्माण होतात आणि ध्येय गाठण्यासाठी व्यक्तीला अनेक प्रयत्न करावे लागतात. राहू माणसाच्या मनात पुन्हा पुन्हा संभ्रम निर्माण करतो. त्याचवेळी काही विद्वानांचा असा विश्वास आहे की राहु कालावधीत केलेले कार्य विपरीत परिणाम आणतात, म्हणूनच ते अशुभ मानले जाते.

तीन दिवसांत विशेष टाळणे

राहु काळ आठवड्याच्या प्रत्येक दिवशी सुमारे दीड तास असतो. यादरम्यान वेळेवर पूर्णपणे राहुच् वर्चस्व असते. परंतु राहु काळची वेळ दरदिवशी वेगवेगळी असते आणि ही सूर्यास्तापूर्वी असते. शुभ कार्यांसाठी रविवार, मंगळवार आणि शनिवार हे दिवस विशेष मानले जातात. राहू काळाचा कालावधी छायाग्रह कालखंड म्हणूनही ओळखला जातो.

कोणत्या दिवशी, कोणत्या वेळी राहु काळ

– सोमवारी सकाळी 7:30 ते रात्री 9:00 वाजेपर्यंत राहू काळ असतो

– मंगळवारी दुपारी 3:00 ते साडेचारपर्यंत राहू काळ असतो

– बुधवारी दुपारी 12:00 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत राहू काळ असतो

– गुरुवारी दुपारी 1:30 ते 3:00 वाजेपर्यंत, म्हणजेच दिवसाचा सहावा भाग राहू काळ असतो

– शुक्रवारी दिवसाचा चौथा भाग राहू काळ असतो, म्हणजेच सकाळी 10:30 ते सकाळी 12:00 पर्यंत राहू काळ असतो.

– शनिवारी सकाळी 9:00 ते रात्री 10:30 पर्यंतचा काळ राहू काळ मानला जातो.

– रविवारी 4:30 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत राहू काळ असतो

ही कामे करण्यास मनाई आहे –

1. यज्ञ, कथा किंवा कोणताही विशेष धार्मिक आयोजन करु नये

2. कोणतेही नवीन काम जसे कुठल्या दुकान वगैरेचा शुभारंभ यादरम्यान करु नये

3. साखरपुडा, विवाह, मुंडन, प्रवास इत्यादी गोष्टी करु नका. जर हे करणे फार महत्वाचे असेल तर हनुमान चालीसाचे पठन करुन पंचामृत प्या, मग शुभ कार्याला प्रारंभ करा.

Do Not Do Any Auspicious Work In Rahu Kaal Know The Reason And Timings Of Rahu Kaal

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chandra Grahan 2021 | चंद्रग्रहण कसे पाहावे आणि काय खबरदारी घ्यावी?

हवन केल्याने वास्तु आणि ग्रह दोषातून मुक्तता मिळेल, जाणून घ्या याचं धार्मिक आणि वैज्ञानिक महत्व

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.