AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Indira Ekadashi 2026 : वर्षानुवर्षांचा पितृदोष होईल दूर, इंदिरा एकादशीला पिंपळाचा ‘हा’ उपाय करा!

पितृ पक्षात येणारी इंदिरा एकादशी पितरांच्या शांतीसाठी आणि भगवान विष्णूच्या कृपेसाठी विशेष मानली जाते. या दिवशी पींपळाशी संबंधित काही उपाय केल्याने पितृदोषाचा प्रभाव कमी होण्यास मदत होते, असे मानले जाते. जाणून घ्या, इंदिरा एकादशीला कोणते उपाय करावेत.

Indira Ekadashi 2026 : वर्षानुवर्षांचा पितृदोष होईल दूर, इंदिरा एकादशीला पिंपळाचा ‘हा’ उपाय करा!
पितृदोषासाठी उपाय Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Edited By: | Updated on: Oct 05, 2026 | 9:27 PM
Share

पितरांचे स्मरण, त्यांच्या शांतीसाठी प्रार्थना आणि भगवान विष्णूची उपासना यासाठी इंदिरा एकादशीला विशेष महत्त्व आहे. पितृ पक्षात येणारी ही एकादशी यंदा 6 ऑक्टोबर 2026 रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी भगवान विष्णूची पूजा करण्यासोबतच पितरांच्या शांतीसाठी विविध धार्मिक उपाय केले जातात. पिंपळाच्या झाडाला हिंदू धर्मपरंपरेत विशेष महत्त्व असल्याने इंदिरा एकादशीला पिंपळाशी संबंधित काही उपाय करण्याचीही परंपरा आहे. हे उपाय केल्याने पितृदोषाचा प्रभाव कमी होण्यास मदत होते, अशी श्रद्धा आहे. जाणून घेऊया, या दिवशी पिंपळाशी संबंधित कोणते उपाय करता येतात.

पिंपळाखाली दिवा लावा

इंदिरा एकादशीच्या संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा किंवा शुद्ध तुपाचा दिवा लावण्याचा उपाय सांगितला जातो. धार्मिक मान्यतेनुसार, पिंपळाजवळ दीप प्रज्वलित करून पितरांचे स्मरण केल्याने त्यांच्या शांतीसाठी केलेली प्रार्थना फलदायी ठरू शकते. घराच्या मुख्य दरवाजा जवळ दिवा लावा

इंदिरा एकादशीच्या रात्री घराच्या मुख्य दरवाजा जवळही दिवा लावण्याची परंपरा सांगितली जाते. प्रवेशद्वारावर दीप प्रज्वलित केल्याने घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते. तसेच पितरांचे आशीर्वाद कुटुंबावर राहतात आणि घरातील वातावरण प्रसन्न राहते, अशी मान्यता आहे.

स्वयंपाकघरात करा दीपदान

स्वयंपाकघराला देवी अन्नपूर्णेशी जोडलेले पवित्र स्थान मानले जाते. त्यामुळे इंदिरा एकादशीच्या रात्री स्वयंपाकघरातही दिवा लावण्याचा उपाय सांगितला जातो. धार्मिक मान्यतेनुसार, स्वयंपाकघरात दीपदान केल्याने घरात अन्न-समृद्धी टिकून राहण्यास आणि पितरांची कृपा मिळण्यास मदत होते. कुटुंबात सुख-समृद्धी नांदावी यासाठीही हा उपाय केला जातो.

नदीकिनारी दीपदान करा

इंदिरा एकादशीच्या दिवशी पवित्र नदीच्या किनारी दिवा लावणेही शुभ मानले जाते. गंगा किंवा यमुना नदीच्या किनारी दीपदान करणे शक्य नसेल, तर घरात एका पात्रात किंवा कलशात पाणी भरून त्याजवळ दिवा लावता येतो. पितरांचे स्मरण करून केलेले हे दीपदान पूर्वजांच्या शांतीसाठी श्रद्धा व्यक्त करण्याचे माध्यम मानले जाते.

तुळशीजवळ दिवा लावा

भगवान विष्णूच्या पूजेमध्ये तुळशीला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे इंदिरा एकादशीच्या संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावण्याचीही परंपरा आहे. भगवान विष्णूची कृपा मिळावी आणि पितरांना शांती व सद्गती लाभावी, यासाठी हा उपाय केला जातो. तुळशीजवळ दिवा लावताना भगवान विष्णूचे स्मरण आणि प्रार्थना करण्याचेही महत्त्व सांगितले जाते.

मंदिरात दीपदान करा

इंदिरा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूच्या मंदिरात किंवा इतर देवळात जाऊन दीपदान करण्याचा उपायही सांगितला आहे. भगवान विष्णूची आराधना आणि दीपदान केल्याने नकारात्मकता दूर होण्यास तसेच पितरांच्या शांतीसाठी केलेल्या धार्मिक कर्मांना शुभ फल मिळण्यास मदत होते.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
कल्याणमध्ये भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड
Kalyan : कल्याणच्या सहजानंद चौकात भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड, नेमकं काय घडलं?
पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट, नेमकं काय घडलं?
आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून....
Raj Thackeray : आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात
आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील..
Vivekanad Patil : आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील आक्रमक, MPSC अध्यक्षांना थेट इशारा
मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या....
Mangesh Chivte : मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या अर्ज भरणार, पण पुणे शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीत पेच कायम?
मुंबईत पाणीकपात अन् रस्ते धुण्यासाठी 8 कोटी 25 लाख; पालिकेच्या....
Mumbai : मुंबईत पाणीकपात अन् रस्ते धुण्यासाठी 8 कोटी 25 लाख; पालिकेच्या प्रस्तावावर संतापाचा सूर, पडद्यामागे काय घडतंय?
फॉर्म सिक्समध्ये बेकायदेशीर बदल सिद्ध; गांधींचा ज्ञानेश कुमारांवर....
Rahul Gandhi : फॉर्म सिक्समध्ये बेकायदेशीर बदल सिद्ध; राहुल गांधींचा ज्ञानेश कुमारांवर गंभीर आरोप, म्हणाले...
हनी सिंहच्या अडचणी वाढल्या?; महाराष्ट्र सायबरकडून समन्स, मात्र चौकशीला
honey singh : हनी सिंहच्या अडचणी वाढल्या?; महाराष्ट्र सायबरकडून समन्स, मात्र चौकशीला गैरहजर
आम्ही 2022 ला काहीतरी केलं....; शिरसाटांच्या विधानाने चर्चांना उधाण
Sanjay Shirsat : आम्ही 2022 ला काहीतरी केलं....; संजय शिरसाटांच्या त्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?...
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?; फडणवीसांची राज्यपालांकडे मोठी शिफारस, काय आहे मागणी?