शनिवारी पिंपळाच्या झाडाशी संबंधीत 4 उपाय करा, आयुष्यातील सर्व दु:ख चुटकीसरशी नाहीशी होतील

शनिवारी पीपळाची पूजा केल्याने शनिदेवाशी संबंधित त्रासांपासून मुक्ती मिळते. पुराणांमध्ये स्वतः शनिदेवाला सांगितले आहे की जो कोणी पीपळाची पूजा करेल, पिंपळाला स्पर्श करेल त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.असे संदर्भ मिळतात.

शनिवारी पिंपळाच्या झाडाशी संबंधीत 4 उपाय करा, आयुष्यातील सर्व दु:ख चुटकीसरशी नाहीशी होतील
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मृणाल पाटील

Nov 20, 2021 | 9:27 AM

मुबंई : शनिवारी पिंपळाची पूजा केल्याने शनिदेवाशी संबंधित त्रासांपासून मुक्ती मिळते. पुराणांमध्ये स्वतः शनिदेवाला सांगितले आहे की जो कोणी पिंपळाची पूजा करेल, पिंपळाला स्पर्श करेल त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.असे संदर्भ मिळतात.

मुंबई : शनिवार हा शनिदेवाला समर्पित आहे. शनिदेवाला न्यायाची देवता मानतात. ज्या प्रमाणे माणूस काम करतो त्या प्रमाणे शनिदेव कर्मफळ देतो अशी मान्यता आहे. जर शनी एखाद्यावर प्रसन्न असेल तर त्या व्यक्तीच्या जीवनात कोणत्याही प्रकारची कमतरता येत नाही. दुसरीकडे, शनि जर एखाद्यावर कोपला तर तो त्याचा शारीरिक, आर्थिक आणि मानसिक अशा तिन्ही प्रकारे छळ करतो. अशा व्यक्तीला जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. परंतु अशा संकटाच्या वेळी जर एखाद्या व्यक्तीने पिंपळाच्या झाडाची पूजा केली तर त्याच्या आयुष्यातील शनिशी संबंधित दुःख संपुष्टात येते.

ब्रह्मपुराणाच्या 118 व्या अध्यायात एका संदर्भाद्वारे सांगण्यात आले आहे की, स्वतः शनिदेवाने सांगितले होते की, जो कोणी शनिवारी पिंपळाची पूजा करेल, पिंपळाला स्पर्श करेल त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. त्याला शनिशी संबंधित त्रासांना कधीही सामोरे जावे लागणार नाही. अशा व्यक्तीच्या घरात लक्ष्मी वास करते आणि त्यांचे सर्व दुःख दूर होतात. येथे जाणून घ्या पिंपळाशी संबंधित काही उपाय नक्की करून पाहा जेणे करुन तुमच्या आयुष्यातील अनेक अडचणी दूर होतील

pipal tree

1. प्रत्येक शनिवारी पिंपळाच्या झाडाच्या मुळास स्पर्श करून नमस्कार करावा आणि संध्याकाळी मोहरीच्या तेलाचा दिवा लावून पिंपळाच्या झाडाची 5 किंवा 9 वेळा प्रदक्षिणा करावी. असे केल्याने शनिशी संबंधित सर्व त्रास दूर होतात. कुटुंबात सुख-समृद्धी नांदते.

pipal tree

2. गीतेत श्रीकृष्णाने सांगितले आहे की पिंपळाच्या झाडामध्ये माझा वास आहे. शनिदेव भगवान श्रीकृष्णाला आपले प्रमुख देवता मानतात. जर तुम्हाला तुमच्या कामात अडचणी येत असतील किंवा यश मिळत नसेल तर दुधात गूळ आणि पाणी मिसळून दर शनिवारी पिंपळात टाका. तुमची इच्छा असेल तर तुम्ही हे काम रोज करू शकता.

pipal tree

3. शनिवारी पिंपळाचे पान उचलून घरी आणावे. त्यावर अत्तर लावा आणि हे पान पर्समध्ये ठेवा. दर महिन्याला पाने बदला. असे केल्याने कधीही पैशाची कमतरता भासत नाही.

pipal tree

4. तुम्हाला कोणतीही विशेष इच्छा पूर्ण करायची असेल तर जुन्या पिंपळाच्या झाडा जवळ तुपाचा दिवा लावा आणि समोर उभे असताना हनुमान चालिसाचे पठण करा. यानंतर पिंपळाच्या पानावर तुमची इच्छा लिहा. यामुळे घरात समृद्धी येते आणि प्रत्येक इच्छा पूर्ण होते.

(टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे.)

संबंधित बातम्या :

Mirror Vastu Tips : घरात आरसा कोणत्या दिशेला लावावा, जाणून घ्या आरशाशी संबंधित सर्व महत्त्वाचे वास्तु नियम

Peacock Feather Remedies | मोराचे पिस केवळ वास्तू दोषच नाही तर नकारत्मकाता देखील काढते, जाणून घ्या याचे जादूई उपाय

20 November 2021 Panchang | मार्गशीर्ष महिना कसा असेल? शुभ-अशुभ मुहूर्त कोणते? जाणून घ्या इत्यंभूत माहिती

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें