
हिंदू धर्मामध्ये गुरुवारचा दिवस भगवान विष्णू यांना समर्पित आहे. असं मानलं जातं, या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्यानं घरात सुख, समृद्धी येते. आयुष्यात कधीच पैशांची कमी राहात नाही. धार्मिक मान्यता आनुसार पिवळा रंग हा विष्णू यांचा आवडता रंग आहे. त्यामुळे तुम्ही जर गुरुवारी पिवळ्या रंगाशी अथवा हळदिशी संबंधित काही उपाय केले तर भगवान विष्णू तुमच्यावर प्रसन्न होतील, त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेलं. येणाऱ्या प्रत्येक संकटातून तुमची सुटका होईल, सोबतच धन लाभ देखील होईल. चला तर जाणून घेऊयात गुरुवारी भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी काय उपाय करावेत? त्याबद्दल जाणून घेऊयात.
आर्थिक संकटं दूर होतील
गुरुवारी सकाळी लवकर उठून अंघोळ करा, त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करा, या दिवशी पिवळे कपडे परिधान करणं खूप शुभ मानलं जातं. त्यानंतर भगवान विष्णू यांची भक्ती भावाने पूजा करा. त्यानंतर एक ग्लास पाणी घेऊन त्यात थोडी हळद टाका, त्यानंतर आता या पाण्याला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडा. प्रत्येक गुरुवारी हा सोपा उपाय केल्यास तुमच्या घरात सूख, समुद्धी येते, तुमच्यावर येणारं प्रत्येक संकट दूर होतं. आयुष्यात कधीही पैशांची कमी भासत नाही.
गुरु ग्रह मजबूत होतो
जर तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये किंवा व्यावसायात अडचणींचा सामना करावा लागत असेल तर याचा अर्थ तुमच्या कुंडलीमध्ये गुरु ग्रह कमजोर आहे. गुरु ग्रहाला मजबूत करण्यासाठी दर गुरुवारी अंघोळीच्या पाण्यात थोडीशी हळद टाका आणि या पाण्यानं अंघोळ करा. धार्मिक मान्यतेनुसार हळदीच्या पाण्यानं अंघोळ केल्यास आयुष्यातील सर्व नकारात्मकता दूर होते, आणि कुंडलीमध्ये गुरु ग्रह मजबूत होतो.
गुरुवारी सकाळी उठून अंघोळ करून माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची मनोभावे पूजा केली पाहिजे. त्यानंतर एका ग्लासभर पाणी घ्या, त्यामध्ये हळद टाका आणि हे पाणी तुमच्या घरातील तुळसीला अर्पण करा,यामुळे माता लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्यावर राहील आणि तुमची भरभराट होईल, तुमचे सर्व आर्थिक संकटं दूर होतील.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)