Holika Dahan 2021 Upay : आर्थिक समस्या, वैवाहिक जीवनातील अडचणी, ग्रह क्लेश होतील दूर, होलिका दहनला हे उपाय करा…

होळी रंगाचा सण आहे (Holi 2021). देशभरात हा सण मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरा (Holika Dahan) केला जातो.

Holika Dahan 2021 Upay : आर्थिक समस्या, वैवाहिक जीवनातील अडचणी, ग्रह क्लेश होतील दूर, होलिका दहनला हे उपाय करा...
Holika Dahan
Nupur Chilkulwar

|

Mar 26, 2021 | 1:12 PM

मुंबई : होळी रंगांचा सण आहे (Holi 2021). देशभरात हा सण मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरा (Holika Dahan) केला जातो. होळीचा सण हा फाल्गुन महिन्याच्या पोर्णिमेला दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पोर्णिमेच्या रात्री होलिका दहन केलं जातं आणि दुसऱ्या दिवशी धुलिवंदन असतं. यावर्षी 28 मार्चला होलिका दहन केलं जाईल, तर 29 मार्चला सकाळी धुलिवंदन असेल. पण, होळीचा सण यावर्षी आणखी एका कारणामुळे खास ठरणार आहे. ज्योतिषशास्त्र जाणकारांच्या मते, यावेळी होळीवर 499 वर्षांनंतर ग्रहांचा दुर्मिळ योग येतो आहे (Do These Upay During Holika Dahan For Prosperity And Happiness In Married Life).

ज्योतिषांनुसार होलिका दहन (Holika Dahan) दरम्यान काही विशेष वस्तू टाकण्याचं विशेष महत्त्व असंत. यामुळे घरावरील सर्व संकट टळतात आणि कुटुंबात सुख- समृद्धी येते.

आर्थिक समस्या सुटतील

जर तुमच्या घरी आर्थिक समस्या असेल तर होलिका दहनादरम्यान अग्नीमध्ये चणे, मटार, गहू आणि अलसी टाका. त्याशिवाय पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावून सात वेळा परिक्रमा करा.

दाम्पत्य जीवनात आनंद परतेल

जर कुणाच्या मुलीच्या विवाहात काही समस्या उद्भवत आहेत किंवा एखाद्या व्यक्तीच्या वैवाहिक जीवनात समस्या असतील तर चिमुटभर कुंकू होलिका दहनच्या अग्नीला समर्पित करा. याने पती-पत्नीमधील गोडवा आणि प्रेम वाढेल.

ग्रह क्लेश होतील दूर

होलिका दहनच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच धुलीवंदनच्या दिवशी घरात भस्म शिंपडा आणि कुटुंबातील सदस्यांना भस्मचा टीका लावा. असं केल्याने घरा सुख-समृद्धी निवास करेल. सोबतच लक्ष्मीचीही कृपा राहिल.

यंदाच्या होळीला तब्बल 499 वर्षानंतर दुर्मिळ योग

यावेळची होळी खूप खास असणार आहे. तब्बल 499 वर्षांनंतर होळीच्या निमित्ताने अत्यंत दुर्मिळ योग तयार होणार आहे. 29 मार्चच्या पौर्णिमेच्या दिवशी चंद्र कन्या राशीत विराजमान होईल, तर शनि ग्रह स्वतःच्या राशीमध्ये राहील. असा ग्रह योगायोग 3 मार्च 1521 रोजी झाला होता. त्यामुळे होळीला 499 वर्षानंतर दुर्मिळ महायोग तयार होतो आहे. त्याशिवाय, यावेळी सर्वार्थसिद्धि योगात होळी साजरी करण्यात येणार आहे, त्याचप्रमाणे अमृतासिद्धी योगही या दिवशी येणार आहे .

होळीचा शुभ मुहूर्त

💠 होलिका दहनचा दिवस : 28 मार्च 2021

💠 रंगपंचमी दिवस : 29 मार्च 2021

💠 होलिका दहनचा शुभ मुहूर्त : संध्याकाळी 6:37 वाजल्यापासून ते रात्री 8:56 वाजेपर्यंत

💠 पौर्णिमेची तिथी प्रारंभ : 28 मार्च सकाळी 3:27 वाजता

💠 पौर्णिमेची तिथी समाप्ती : 29 मार्च 12:17 वाजता.

Do These Upay During Holika Dahan For Prosperity And Happiness In Married Life

 संबंधित बातम्या :

Holi 2021 | या 5 राशीच्या लोकांसाठी यंदाची होळी ठरणार लकी, ग्रहांच्या शुभ योगायोगाने मोठा फायदा होणार

Lathmar Holi 2021 | बरसाना येथे लठमार होळी, कधीपासून सुरु झाली ही परंपरा जाणून घ्या…

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें