Holi 2021 | या 5 राशीच्या लोकांसाठी यंदाची होळी ठरणार लकी, ग्रहांच्या शुभ योगायोगाने मोठा फायदा होणार

यंदाची होळी अत्यंत विशेष मानली जात आहे कारण 28 मार्चच्या दिवशी (Holi 2021 Brings Happiness And Wealth) असा शुभ योग जुळतो आहे

Holi 2021 | या 5 राशीच्या लोकांसाठी यंदाची होळी ठरणार लकी, ग्रहांच्या शुभ योगायोगाने मोठा फायदा होणार
Holi And Astrology
Nupur Chilkulwar

|

Mar 26, 2021 | 11:00 AM

मुंबई : यंदाची होळी अत्यंत विशेष मानली जात आहे कारण 28 मार्चच्या दिवशी (Holi 2021 Brings Happiness And Wealth) असा शुभ योग जुळतो आहे. ज्याचा काही राशींवर विशेष परिणाम होणार आहे. चंद्रासोबत गुरुचा नवम पंचम शुभ योग जुळतो आहे, जो लोकांना आर्थिक लाभ देणार आहे. तर शुक्र आणि सूर्य मीन राशीमध्ये विराजमान असेल (Holi 2021 Brings Happiness And Wealth In These Five Zodiac Signs Life).

त्याशिवाय, शनिदेव अपल्या राशी मकरमध्ये असेल. गुरु या दिवशी खाली असेल, पण शनी उपस्थितीतीमुळे नीचभंज राजयोगमध्ये उपस्थित असेल. याप्रकारे ग्रहांचा हा योग अनेक राशींसाठी शुभ फळ देणारा मानला जात आहे. जाणून घ्या तुमच्या राशीवर याचा काय परिणाम होणार –

कुंभ राशी

होळीपासून शनिदेवच्या राशी कुंभच्या लोकांच्या आयुष्यात मोठे बदल येणार आहेत. जे लोक गेल्या अनेक काळापासून नोकरीच्या शोधात आहेत आणि त्यांना यश मिळत नाहीये, त्यांच्या जीवनात एप्रिल महिन्यापासून मोठे बदल येणार आहेत. चांगली नोकरी मिळेल, त्याशिवायजर ते कुठे पैसे गुंतवू इच्छितात तर ही वेळ त्यांच्यासाठी अनुकूल असेल. या गुंतवणुकीचा तुम्हाला भविष्यात लाभ नक्की होईल. कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल आणि जोडीदारासोबत जवळीक वाढेल.

कर्क राशी

या राशीचा स्वामी चंद्र आहे आणि चंद्र अत्यंत शुभ योगमध्ये आहे. आशात कर्क राशीच्या लोकांची कलात्मक आणि रचनात्मक क्षमता वाढेल. आता ती वेळ येणार आहे जेव्हा तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल. त्यासाठी तुम्ही गेल्या अनेक काळापासून प्रतिक्षा करत आहात त्या कार्यात यश मिळेल. गुंतवणूक करण्यासाठी ही वेळ अनुकूल आहे. या दरम्याव जर तुम्ही कुठला मोठा निर्णय घेता तर तो देखील तुमच्या पक्षात असेल.

मीन राशी

लग्न इच्छूक असणाऱ्यांना लवकरच खुशखबर मिळू शकते. दाम्पत्य जीवनात गोडवा वाढेल. कार्यक्षेत्रात तुमचं स्थान वाढेल आणि मान-सन्मानही वाढेल. घर खरेदी करण्याबाबत विचार करत असाल तर ते प्रयत्न चांगले फळ देऊ शकतात. जर कुठे गुंतवणूक केली असेल तर धन लाभ होण्याचीही शक्यता आहे.

कन्या राशी

भाऊ-बहिणीच्या संबंधात गोडवा वाढेल. कुठली भेटवस्तूही मिळू शकते. कुठल्या स्पर्धा परीक्षेत तयारी करत असाल तर त्यात तुम्हाला यश लाभेल. लवकरच धन लाभ होऊ शकतो. थांबलेली कामं पूर्ण होण्याची शक्यता आहे. ही होळी तुमच्या आयुष्यात आनंदाचा रंग घेऊन येणार आहेत.

धनु राशी

या राशीचे लोक साडे सातीच्या अखेरच्या चरणात आहेत. यांची रुची आध्यात्मिकतेकडे वाढू शकते. कुटुंबात कुठलं धार्मिक आयोजनही होऊ शकतं. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर धन लाभ होऊ शकतो, तसेच जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर लवकरच तुम्हाला नोकरी मिळेल. बिघडलेली कामं होतील आणि मोठ्यांचा आशीर्वाद मिळेल.

Holi 2021 Brings Happiness And Wealth In These Five Zodiac Signs Life

संबंधित बातम्या :

Horoscope 26th March 2021 | ‘या’ राशींवर असणार देवी लक्ष्मीची कृपा, जाणून घ्या तुमचा दिवस कसा असेल…

Holashtak and Holi 2021 | का साजरी केली जाते होळी? जाणून घ्या होलाष्टक ते होळीपर्यंतची संपूर्ण माहिती

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें