AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vaishakh Purnima 2021 : वैशाख पौर्णिमेला वर्षातले पहिले चंद्रग्रहण, ग्रहणाच्या परिणामांपासून वाचण्यासाठी हे उपाय करा

ज्योतिष शास्त्रानुसार चंद्रग्रहणाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी आपण सर्व प्रकारचे उपाय करतो. यावेळी उपछाया चंद्रग्रहण आहे. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी होणार्‍या चंद्रग्रहणाचे अशुभ परिणाम टाळण्यासाठी काय उपाय करावे ते जाणून घेऊया (Do These Upay To Avoid The Effect Of First Lunar Eclipse On Vaishakh Purnima 2021)-

Vaishakh Purnima 2021 : वैशाख पौर्णिमेला वर्षातले पहिले चंद्रग्रहण, ग्रहणाच्या परिणामांपासून वाचण्यासाठी हे उपाय करा
Lunar Eclipse
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: May 21, 2021 | 1:22 PM
Share

मुंबई : पौर्णिमा तिथीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. यावेळी वैशाख पौर्णिमा 26 मे रोजी येत आहे (Vaishakh Purnima 2021). या दिवशी भगवान बुद्धांचा जन्म झाला होता, अशी मान्यता आहे. म्हणूनच या दिवसाला बुद्ध पौर्णिमा म्हणतात. यावर्षी वैशाख पौर्णिमेला वर्षाचे पहिले चंद्रग्रहण लागणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार चंद्रग्रहणाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी आपण सर्व प्रकारचे उपाय करतो. यावेळी उपछाया चंद्रग्रहण आहे. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी होणार्‍या चंद्रग्रहणाचे अशुभ परिणाम टाळण्यासाठी काय उपाय करावे ते जाणून घेऊया (Do These Upay To Avoid The Effect Of First Lunar Eclipse On Vaishakh Purnima 2021)-

चंद्रग्रहण विशेष का आहे?

या वर्षाचे पहिले चंद्रग्रहण 26 मे रोजी लागणार आहे. हे छाया चंद्रग्रहण असेल. चंद्रग्रहणात सुतक काळात कोणतेही शुभ कार्य होत नाही. हे चंद्रग्रहण मुख्यत: पूर्व आशिया, ऑस्ट्रेलिया, अमेरिकेत दिसेल. तर भारतात हे चंद्रग्रहण एखाद्या सावलीसारखे दिसेल. म्हणून सुतक काळ भारतात असणार नाही. ज्योतिष शास्त्रानुसार या दिवशी काय केले पाहिजे ते जाणून घ्या

वैशाख पौर्णिमेच्या दिवशी काय करावे?

वैशाख पौर्णिमेला सकाळी लवकर उठावे आणि स्नान करुन व्रताचा संकल्प करावा. या दिवशी आंघोळ केल्यावर भगवान सूर्य यांच्या मंत्रांचा जप करताना अर्घ्य द्यावे. मग भगवान मधुसूदनची पूजा करावी आणि नैवेद्य अर्पण करावे आणि नंतर दान करावे. पौर्णिमेच्या तिथीला पवित्र स्नान आणि दान करण्याचे विशेष महत्त्व आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार, चंद्राला मनाचा स्वामी मानलं जाते. पौर्णिमेचा परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या मनावर होतो. या दिवशी चंद्र देवाची पूजा केल्याने शुभ परिणाम होतात. पौर्णिमेच्या तारखेला चंद्र देव यांची पूजा केल्यास कुंडलीतील चंद्राची स्थिती मजबूत होते. यामुळे तुमच्या सर्व समस्या दूर होतात. ज्या लोकांचं आरोग्य नेहमी खराब असते, त्यांनी विशेषत: चंद्राची पूजा केली पाहिजे. याने आपले आरोग्य लवकर सुधारेल.

Do These Upay To Avoid The Effect Of First Lunar Eclipse On Vaishakh Purnima 2021

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Buddha Purnima 2021 | यंदाची बुद्ध पौर्णिमा आहे अत्यंत विशेष, वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण आणि दोन शुभ योगायोग

Chaitra Purnima 2021 : आज चैत्र पौर्णिमा, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्व

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?