Chaitra Purnima 2021 : आज चैत्र पौर्णिमा, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्व

Chaitra Purnima 2021 : आज चैत्र पौर्णिमा, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्व
Chaitra Pournima

पौर्णिमा हा हिंदू धर्मातील एक शुभ सण आहे (Chaitra Purnima 2021). या दिवशी लोक दिवसभर उपवास पाळतात आणि चंद्र पाहिल्यानंतर उपवास सोडतात. याशिवाय, भगवान विष्णूप्रती श्रद्धा व्यक्त करण्यासाठी भाविक सत्यनारायण पूजा करतात.

Nupur Chilkulwar

|

Apr 27, 2021 | 9:29 AM

मुंबई : पौर्णिमा हा हिंदू धर्मातील एक शुभ सण आहे (Chaitra Purnima 2021). या दिवशी लोक दिवसभर उपवास पाळतात आणि चंद्र पाहिल्यानंतर उपवास सोडतात. याशिवाय, भगवान विष्णूप्रती श्रद्धा व्यक्त करण्यासाठी भाविक सत्यनारायण पूजा करतात. या दिवशी हनुमान जयंतीचा (Hanuman Jayanti) शुभ सण देखील साजरा केला जातो आहे. हनुमान जयंती हा सण भगवान हनुमानाच्या जन्मानिमित्त चिन्हांकित केला जातो. अशा योगायोगामुळे या दिवसाचे महत्त्व अजून वाढले आहे (Chaitra Purnima 2021 Know The Shubh Muhurat And Importance Of This Day).

चैत्र पौर्णिमा कधी आहे?

चैत्र पौर्णिमा 26 एप्रिल रोजी होईल. चैत्र महिन्यातील पौर्णिमेच्या तिथीला चैत्र पौर्णिमा म्हणून ओळखले जाते.

चैत्र पौर्णिमेचा शुभ मुहूर्त 26 एप्रिल रोजी दुपारी 12:44 वाजता सुरु होईल आणि 27 एप्रिल रोजी सकाळी 9:01 वाजता संपेल.

चैत्र पौर्णिमेची पूजा विधी

या दिवशी भाविक लवकर उठून स्नान करतात

यानंतर ते भगवान विष्णूची पूजा करतात आणि मंत्रांचा जप करतात

ओम नमो नारायण, यासारख्या मंत्र जप करतात

त्यानंतर भाविक प्रसाद वाटप करतात.

चैत्र पौर्णिमेचे महत्त्व

या शुभ दिवशी भक्त गंगा नदीत स्नान करतात. परंतू, यावेळी कोरोनोच्या सद्यस्थितीमुळे उत्सव काही वेगळा असेल. गंगा नदीत स्नान केल्याने भाविकांना त्यांच्या पापांपासून आणि त्रासातून मुक्तता मिळते असे मानले जाते.

भक्त या दिवशी मंत्र जप करतात आणि सत्यनारायणाची पूजा करतात. तसेच, या दिवशी त्यांनी लोकप्रिय सत्यनारायण कथेचं पठण केलं जातं. याशिवाय भक्त गरीबांना दान करतात आणि या दिवशी गरजूंना मदत करतात.

भगवान हनुमानाचा जन्म चैत्र पौर्णिमेच्या दिवशी झाला होता, म्हणून हा दिवस हनुमान जयंती म्हणून देखील साजरा केला जातो. भक्त या दिवशी भगवान हनुमानाची पूजा करतात आणि ते एक दिवस उपवास करतात.

या वेळी चैत्र पौर्णिमेला काहीशी प्रतिकूल परिस्थिती आहे, म्हणूनच तुम्ही घरीच राहून ही पूजा करावी. असे केल्याने आपण केवळ स्वत: चेच रक्षण करु शकत नाही तर आपल्या कुटुंबाचे, मित्रांचे आणि शेजारच्या लोकांचेही जीव वाचवू शकाल.

Chaitra Purnima 2021 Know The Shubh Muhurat And Importance Of This Day

टीप – मास्क लावा, सोशल डिस्टन्स पाळा आणि आपले हात वारंवार धुवा. असे केल्याने आपण सर्वजण सुरक्षित राहू आणि या कोरोना साखळीलाही तोडण्यात आपली भूमिका पार पाडू शकू.

संबंधित बातम्या :

‘रामायणा’त रावणाच्या पायाखाली निळ्या रंगाचा ‘तो’ व्यक्ती नेमका कोण? जाणून घ्या उत्तर…

जेव्हा भगवान नरसिंहाला शांत करण्यासाठी महादेवाने घेतला सर्वेश्वर अवतार, जाणून घ्या नेमकं काय घडले?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें