AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘रामायणा’त रावणाच्या पायाखाली निळ्या रंगाचा ‘तो’ व्यक्ती नेमका कोण? जाणून घ्या उत्तर…

रावणाच्या सिंहासनावर त्याच्या पायाखाली असलेल्या या माणसाबद्दल अनेक कथा आहेत. या व्यक्तीच्या अस्तित्वाच्या आणि त्याच्या बंदिवान बनण्यामागे अनेक प्रकारच्या कथा प्रचलित आहेत.

'रामायणा'त रावणाच्या पायाखाली निळ्या रंगाचा ‘तो’ व्यक्ती नेमका कोण? जाणून घ्या उत्तर...
रामायणात रावणाच्या पायाखाली निळ्या रंगाचा ‘तो’ व्यक्ती नेमका कोण?
| Updated on: Apr 24, 2021 | 12:50 PM
Share

मुंबई : रामायणाशी संबंधित अनेक कथा भारतात प्रचलित आहेत. रामायण (Ramayan) ही एक अशी कहाणी आहे, जी प्रत्येकाला पहायला आवडते आणि प्रत्येक हिंदू कुटुंबात ती वाचली जाते. गेल्या वर्षी कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन झाला होता आणि याचकाळात रामानंद सागर यांची जुनी ‘रामायण’ मालिका टीव्हीवर प्रसारित झाली होती. या मालिकेने टीआरपीचे सर्व रेकॉर्ड तोडले होते. या व्यतिरिक्त लोकांना रामायणाशी संबंधित कथा देखील ऐकायला आवडतात. भगवान राम तसेच रावणाबद्दलही अनेक कथा प्रचलित आहेत (Know about that blue person under Ravan Sinhasan in Ramayan).

जेव्हा जेव्हा आपण रामायण पाहिले असेल तेव्हा कदाचित आपणास ते लक्षात आले असेल किंवा नसेल, पण रावणाच्या सिंहासनाच्या पायाजवळ एक माणूस असायचा. या व्यक्तीची त्वचा पूर्ण निळी आहे आणि तो खाली झोपलेला आहे. पण, आपण कधी विचार केला आहे का की, हा व्यक्ती कोण आहे, जो नेहमी रावणाच्या पायाखाली खाली दबलेला आहे? चला तर, जाणून घेऊया तो व्यक्ती कोण आहे आणि त्यामागची कथा काय आहे….

कोण आहे हा निळ्या रंगाचा माणूस?

रावणाच्या सिंहासनावर त्याच्या पायाखाली असलेल्या या माणसाबद्दल अनेक कथा आहेत. या व्यक्तीच्या अस्तित्वाच्या आणि त्याच्या बंदिवान बनण्यामागे अनेक प्रकारच्या कथा प्रचलित आहेत. इंटरनेटवरील माहिती आणि बर्‍याच पंडितांच्या कथा वेगवेगळ्या गोष्टी प्रकट करतात. तथापि, बहुतेक अहवालांमध्ये असे दिसून आले आहे की, ही व्यक्ती नऊ ग्रह देवतांपैकी एक शनिदेव आहे. असे म्हणतात की, रामायणात रावणाच्या सिंहासनावर त्याच्या पायाखाली असणारी ही व्यक्ती म्हणजे खुद्द शनिदेव आहेत.

पौराणिक कथेनुसार म्हटले जाते की, रावण खूप मोठा ज्योतिषी होता आणि त्याने नऊ ग्रह आपल्या ताब्यात घेतले होते. ज्योतिषशास्त्रात या 9 ग्रहांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे आणि त्यांच्या स्थानाच्या आधारावर भविष्य वर्तवले जाते. असे म्हणतात की, रावणाने सर्व ग्रहांना आपल्या पायाजवळ बंदिस्त केले होते. अशा परिस्थितीत रावणाने आपल्या पुत्रांच्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती आपल्या नियंत्रणाखाली ठेवली. या 9 ग्रहांमध्ये निळ्या रंगाचे केवळ शनिदेव होते (Know about that blue person under Ravan Sinhasan in Ramayan).

अशी देखील एक कथा…

ज्योतिष शास्त्रानुसार शनिच्या दृष्टीचा एखाद्या व्यक्तीच्या जीवनावर खूप परिणाम होतो. अशा परिस्थितीत शनी आपल्या दृष्टीने रावणाच्या कुंडलीतील शुभ स्थान खराब करू इच्छित होते आणि ते तसे प्रयत्न करत राहिले. असे म्हणतात की, एकदा रावणाच्या पुत्राची कुंडली बनवताना रावणाने सर्व ग्रहांची जागा स्वतःच्या मर्जीने निश्चित केली. पण शनि पुन्हा पुन्हा आपली जागा बदलण्याचा प्रयत्न करत होते, त्यामुळे रावणपुत्र अमर होऊ शकले नाहीत. तेव्हा रावणाने या गोष्टी नियंत्रित करण्यासाठी शनिदेवाला त्याच्या पायाखाली धरून ठेवले.

कसे मुक्त झाले शनिदेव?

शनिदेवाच्या मुक्तीची देखील एक कहाणी आहे. ती अशी की, जेव्हा हनुमान लंकेत गेले होते, तेव्हा त्याने लंका जाळण्याच्या वेळी शनिदेवला रावणाच्या गुलामगिरीतून मुक्त केले होते. याआधी नारद मुनी यांनी रावणाला आपल्या शब्दात अडकवून शनिदेवांना तुरूंगात हलवले होते. परंतु, रावणाने शनिदेवाला तुरूंगात टाकली आणि तुरूंगाच्या दारावर शिवलिंग अशा प्रकारे ठेवले की, शनिदेव त्यावर पाय न ठेवता पळूच शकत नाहीत. यानंतर हनुमानजी लंकेत आले आणि त्यांनी शनिदेव यांना आपल्या डोक्यावर बसवले आणि त्यांना मुक्त केले. शनिदेवांना आधीच असे वरदान मिळाले होते की, हनुमान त्यांना मुक्त करतील. बर्‍याच कथांमध्ये असेही म्हटले जाते की, रावणाने काल, मृत्यू यांनादेखील वश केले होते.

(टीप : हा लेख प्रचलित कथांच्या आधारे लिहिला गेला आहे. याचे पोक्त पुरावे नाहीत.)

(Know about that blue person under Ravan Sinhasan in Ramayan)

हेही वाचा :

Shani Pradosh Vrat 2021 : शनी प्रदोषच्या दिवशी करा हे विधी, उपाय, घरात येईल सुख समृद्धी

Kedarnath Temple | पांडवांनी केदारनाथ मंदिर का बनवलं? जाणून घ्या पांडव आणि महादेवाची ही पौराणिक कथा

मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.