Shani Jayanti 2022: शनिच्या साडेसाती पासून वाचायचंय ? मग शनि जयंतीला हे उपाय कराच

Shani Jayanti 2022: शनिच्या साडेसाती पासून वाचायचंय ? मग शनि जयंतीला हे उपाय कराच
शनी जयंती 2022

Shani Jayanti 2022: यावेळी शनी जयंती मे महिन्यातील 30 तारखेला आली आहे. यादिवशी शनी देवाची विधीवत पूजा केली जाते. शनीची साडेसाती असलेल्या लोकांनी हे उपाय नक्की केले पाहीजे. शनी देवाची साडेसाडी कमी होईल. तसंच शनी देवाची कृपा प्राप्त होईल

सिद्धी बोबडे

| Edited By: सिद्धेश सावंत

May 26, 2022 | 1:34 PM

दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील अमावस्येला शनि जयंती (Shani Jayanti2022)येते. यावर्षी शनि जयंती मे महिन्यातील 30 तारखेला आली आहे. यादिवशी शनि देवाची विधीवत पूजा केली जाते. असं केल्याने शनि देवाची (ShaniDev) कृपा प्राप्त होते. सर्व दु:खं नाहीशी होतात. यावेळी काही राशींच्या लोकांवर शनीचा प्रभाव आणि साडेसातीचा प्रकोप आहे. यात वृश्चिक आणि कर्क (Scorpio and Cancer) राशीवर शनीचा प्रभाव आहे. तर, मीन, कुंभ आणि मकर (Capricorn) राशीवर साडे सातीचा प्रकोप आहे. अशात शनिच्या प्रकोपात असलेल्या लोकांसाठी ही एक चांगली संधी आहे. शनि जयंतीच्या दिवशी तुम्ही हे उपाय करू शकता. हे उपाय केल्याने तुम्हाला शनीच्या वाईट दृष्टीतून सुटकारा मिळू शकतो.

शनि जयंतीच्या दिवशी हे उपाय करा

शनि जयंतीच्या दिवशी शनी चालीसेचे पठन करा. त्याने शनी देव प्रसन्न होतात. असं करणं फलदायी मानलं जातं. शनि जयंतीच्या दिवशी दानाला विशेष महत्व आहे. यादिवशी गरजू लोकांना दान करणं अजिबात विसरू नका. असं केल्याने लाभदायक फळ प्राप्त होती.शनी जयंतीच्या दिवशी हनुमानाची पूजा केल्याने लाभ प्राप्त होतो. यादिवशी हनुमानाच्या पूजेला विशेष महत्व आहे. हनुमानाची पूजा करणाऱ्या लोकांवर शनी देवाची वाईट दृष्टी पडत नाही.

– शनि जयंतीच्या दिवशी वाहत्या पाण्यात नारळ सोडा. असं केल्याने शनीची वाईट दृष्टी तुमच्यावर पडत नाही.

-यादिवशी काळे तीळ, मोहरीचं तेल, काळे उडीद, काळी चादर, चामड्याच्या चप्पला तिळाचे तेल, लोह दान करू शकता.

सात मुखी रुद्राक्ष वापरा –

रुद्राक्ष शनीचे प्रतीनिधित्व करतात. यादिवशी सातमुखी रुद्राक्ष घातल्याने शनीची कृपा प्राप्त होते. साडेसातीतून सुटकारा मिळते.शनिदोषाच्या शांतीसाठी दररोज महामृत्युंजय मंत्र किंवा ओम नम: शिवाय चा जप करा.

तुमची सावली तेलात पाहून ते तेल दान करा –

शनी जयंतीच्या दिवशी छाया पत्र दान करा. यासाठी एका भांड्यात मोहरीचे तेल घ्या. त्यात तुमची सावली पहा. तुम्ही मातीचा दिवा किंवा स्टीलटा दिवा यासाठी वापरू शकता. त्यात तुमची सावली बघा. त्यानंतर तो दिवा किंवा ते भाडं कोणाला तरी दान करा.

पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा –

शनि जयंतीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्याने घरातील संकटं कलहं दूर होतात. शांतता लाभते. व्यवसायात नोकरीत प्रगती होते.

या मंत्रांचा जप करा

ॐ प्रां प्रीं प्रौं सः शनैश्चराय नमः.

ॐ शं शनैश्चराय नमः.

ॐ त्रयम्बकं यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम | उर्वारुक मिव बन्धनान मृत्योर्मुक्षी मा मृतात

ॐ निलान्जन समाभासं रविपुत्रं यमाग्रजम |छायामार्तंड संभूतं तं नमामि शनैश्चरम ||

हे सुद्धा वाचा

(दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे. याबाबत आम्ही कोणताही दावा करत नाही.)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें