
हिंदू धर्म ग्रंथांमध्ये सोमवार व्रताचा विशेष उल्लेख आहे. माता पार्वतीने भगवान शंकर पती म्हणून मिळावे म्हणून सोमवारी व्रत केले होते अशी धार्मिक मान्यता आहे. सोमवार हा संपूर्णपणे देवांचे देव महादेवांच्या पूजेसाठी समर्पित आहे.
सोमवारच्या व्रताचे पुण्य लाभल्याने भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह झाला असे सांगितले जाते. सोमवारच्या व्रतात महादेवाची पूजा करून शिवलिंगाचा अभिषेक करावा. सोमवारी शिवलिंगाला फुलासह अनेक वस्तू अर्पण केल्या जातात.
असे मानले जाते की शिवलिंगाला काही वस्तू अर्पण केल्याने व्यक्तीला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे सोमवारी पूजा करताना शिवलिंगाला काही वस्तू अर्पण करणे वर्जित आहे. शास्त्रानुसार शिवलिंगाला काही वस्तू अर्पण करणे वर्ज्य आहे. अशा परिस्थितीत सोमवारी शिवलिंगाला काय अर्पण करू नये ते जाणून घेऊयात.
तुळस
शिवलिंगावर तुळस अर्पण करू नये. पौराणिक कथेनुसार भगवान शिवाने तुळशीचा पती जालंधर राक्षसाचा वध केला होता. यासाठी शिवलिंगाला तुळशीची पाने अर्पण करू नयेत. तसेच शिव पुजेमध्ये तुळशीच्या पानांचा वापर करू नये.
हळद
हिंदू धर्मात हळद शुभ मानली जाते. हळदीचा वापर अनेक शुभ कार्यात आणि पूजेत केला जातो. मात्र शिवलिंगावर हळद अर्पण करू नये. असे मानले जाते की शिव लिंगावर हळद अर्पण केल्याने पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही.
नारळाचे पाणी
शिवलिंगावर सोमवारी किंवा इतर कोणत्याही दिवशी नारळाचे पाणी अर्पण करू नये. नारळाच्या पाण्याने महादेवाचा कोप होतो अशी धार्मिक मान्यता आहे. तसेच व्यक्तीला जीवनात पैशाच्या कमतरतेचा सामना करावा लागू शकतो.
तुटलेले तांदूळ
तुटलेले तांदूळ शिवलिंगाला अर्पण करू नये अशी मान्यता आहे की शिवलिंगावर तुटलेले तांदूळ अर्पण केल्याने भगवान शिव क्रोधित होतात आणि पूजेचे फळ देत नाही. तसेच कोणत्याही देवतेच्या पूजेमध्ये तुटलेले तांदूळ अर्पण करू नये.
तीळ
तीळ दुधात मिसळून शिवलिंगाला अर्पण करू नये. जगाचा निर्माता भगवान विष्णू यांच्या मिलनातून तिळाचा जन्म झाला अशी धार्मिक धारणा आहे. या कारणास्तव शिवलिंगावर तीळ अर्पण करणे वर्ज मानले जाते.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)