AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ 5 सवयी जगातील सर्वात मजबूत व्यक्तीलाही बनवू शकतात कमकुवत

आचार्य चाणक्य हे नेहमी जीवन सुखकारक होण्यासाठी मोलाचे उपदेश देत असतात. तुम्ही आयुष्यात जर त्यांच्या या मार्गदर्शनचं अनुकरण केल्यास तुम्हाला कोणत्याच समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. यासाठी चाणक्ययांनी सांगितलेल्या पाच वाईट सवयींबद्दल जाणून घेऊयात ज्या टाळून तुम्ही तुमचे जीवन आणि यश सुरक्षित करू शकता.

'या' 5 सवयी जगातील सर्वात मजबूत व्यक्तीलाही बनवू शकतात कमकुवत
चाणक्य नीती
| Edited By: | Updated on: Nov 30, 2024 | 3:58 PM
Share

आचार्य चाणक्य यांची धोरणे आजही जीवनात मार्गदर्शक म्हणून काम करतात. त्यांच्या मते काही वाईट सवयी असतात ज्या कोणत्याही बलवान व्यक्तीला कमकुवत बनवू शकतात. जर तुम्ही सुद्धा या सवयी सोडण्याचा प्रयत्न केला नाही तर तुमचे यश सुख सगळंकाही धोक्यात येऊ शकते. चला जाणून घेऊया चाणक्ययांनी सांगितलेल्या पाच वाईट सवयींबद्दल, ज्या टाळून तुम्ही तुमचे जीवन आणि यश सुरक्षित करू शकता.

१. कोणावरही विश्वास न ठेवणे

चाणक्य यांच्या मते इतरांवर विश्वास न ठेवण्याची सवय माणसाला कमकुवत बनवते. या सवयीमुळे एकटेपणा आणि सामाजिक पाठबळाचा अभाव निर्माण होतो. विश्वास आणि सहकार्याशिवाय यश टिकवणे अवघड होऊन बसते.

२. आव्हानांपासून दूर पळणे

तुम्हाला जर आव्हानांना सामोरे जाण्याची भीती वाटत असेल तर तुमचे यश फार काळ टिकणार नाही. चाणक्य यांनी म्हटले आहे की जो व्यक्ती आव्हाने स्वीकारतो आणि त्यातून शिकतो तोच आपली ताकद टिकवून ठेवू शकतो.

३. भूतकाळात अडकून पडणे

आचार्य चाणक्य यांच्या मते तुम्ही जर तुमच्या भूतकाळातील चुका किंवा अडचणींमध्ये अडकून पडणे व्यक्तीचेपडलात तर वर्तमान आणि भविष्य बिघडू शकते. तसेच तुमचा भूतकाळ मागे टाकणे तर हाच जीवनाचा योग्य मार्ग आहे.

४. नकारात्मक विचार

नकारात्मक विचार माणसाला कमकुवत आणि निराशावादी बनवतात. चाणक्य यांनी सकारात्मक विचार हेच यशाचा आधार असल्याचे सांगितले आहे. जर तुम्ही नेहमीच नकारात्मक विचारांमध्ये असाल तर तुम्हाला तुमच्या पूर्ण क्षमतेचा वापर करू शकणार नाही.

५. चुकांकडे दुर्लक्ष करणे

चुकांपासून न शिकणे ही सर्वात मोठी कमजोरी आहे. चाणक्य यांनी चुका स्वीकारणे आणि त्या सुधारणे हीच यशाची गुरुकिल्ली असल्याचे म्हटले आहे.अशातच तुम्ही जर तुमच्या चुकांकडे दुर्लक्ष करत असाल तर तुम्ही आयुष्यात कधीच पुढे जाऊ शकणार नाही.

मुनगंटीवार म्हणाले, मंत्री सभागृहात येत नसतील तर त्याच्यावर बिबटे सोडा
मुनगंटीवार म्हणाले, मंत्री सभागृहात येत नसतील तर त्याच्यावर बिबटे सोडा.
उदे गं आई उदे उदे... सांगलीत यल्लमा देवाच्या यात्रेत भक्तीचा महापूर
उदे गं आई उदे उदे... सांगलीत यल्लमा देवाच्या यात्रेत भक्तीचा महापूर.
विरोधी पक्षनेतेपद निवडीसंदर्भात उद्धव ठाकरे यांच्याकडून भेटी-गाठी
विरोधी पक्षनेतेपद निवडीसंदर्भात उद्धव ठाकरे यांच्याकडून भेटी-गाठी.
मुंबईचा फॉर्म्युला फिक्स? शिंदे म्हणाले, येणाऱ्या निवडणुका महायुती...
मुंबईचा फॉर्म्युला फिक्स? शिंदे म्हणाले, येणाऱ्या निवडणुका महायुती....
नाशिक तपोवनमधील वृक्षतोडीला राष्ट्रीय हरित लवादाकडून स्थगिती
नाशिक तपोवनमधील वृक्षतोडीला राष्ट्रीय हरित लवादाकडून स्थगिती.
केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; 2027 मध्ये जनगणना दोन टप्प्यात
केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; 2027 मध्ये जनगणना दोन टप्प्यात.
महायुतीचा BMC साठी फॉर्म्युला ठरला, कुठं 100% युती? कोणाला किती जागा?
महायुतीचा BMC साठी फॉर्म्युला ठरला, कुठं 100% युती? कोणाला किती जागा?.
विधानभवन लॉबीतील राडा प्रकरणी विशेषाधिकार समितीचा अहवाल सादर
विधानभवन लॉबीतील राडा प्रकरणी विशेषाधिकार समितीचा अहवाल सादर.
कोण कुणाचे लाडके, उदय सामंत मुख्यमंत्र्यांचे की उपमुख्यमंत्र्यांचे?
कोण कुणाचे लाडके, उदय सामंत मुख्यमंत्र्यांचे की उपमुख्यमंत्र्यांचे?.
वडेट्टीवार दुसऱ्या दिवशी सभागृहात भडकले, शेतकऱ्यांच्या भावना समजून घ्य
वडेट्टीवार दुसऱ्या दिवशी सभागृहात भडकले, शेतकऱ्यांच्या भावना समजून घ्य.