AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शनिवारच्या दिवशी चुकूनही करू नका या पाच चुका, शनिदेव होतील नाराज

शनिदेवाची वाईट नजर एखाद्या व्यक्तीवर पडल्यास त्याला अनेक संकटांना सामोरे जावे लागते. शनिदेवाच्या कृपेने व्यक्तीला जीवनात खूप प्रगती आणि यश प्राप्त होते. तसेच शनि दुःखापासून आराम देतो.

शनिवारच्या दिवशी चुकूनही करू नका या पाच चुका, शनिदेव होतील नाराज
शनिदेव उपायImage Credit source: Social Media
| Updated on: Mar 31, 2023 | 3:41 PM
Share

मुंबई : धार्मीक  मान्यतेनुसार, प्रत्येक दिवस देवी-देवतांना समर्पित आहे. त्याचप्रमाणे शनिवार हा शनिदेवाला समर्पित मानला जातो. या दिवशी नियमानुसार शनिदेवाची पूजा (Shaniwar Upay) केल्यास प्रत्येक इच्छा पूर्ण होते पण या दिवशी अशा काही गोष्टी आहेत ज्या करण्यास मनाई आहे. दुसरीकडे, लोकांनी या दिवशी काही काम करणे टाळावे. कारण असे केल्याने शनिदेव क्रोधित होतात. अशा परिस्थितीत वाईट परिणाम होऊ शकतात. जाणून घेऊया कोणती कामे आहेत जी शनिवारी करू नये.

शनिवारच्या दिवशी ही पाच कामे करणे टाळा

1 या वस्तू खरेदी करू नका : बर्‍याचदा असे घडते की शनिवारी व रविवारी  लोकं आपल्या कुटूंबासह बाहेर फिरायला जातात, मग ते मुलांचा हट्टीपणा पूर्ण करण्यासाठी खेळणी आणि इतर गोष्टी खरेदी करतात. पण हे लक्षात ठेवा की आपण आणलेली खेळणी किंवा वस्तू लोखंडाची नसावी. कारण लोखंडाच्या वस्तू शनिवारी खरेदी करण्यास सक्त मनाई आहे. तसेच आपण शिक्षणाशी सं-बंधित गोष्टी शनिवारशिवाय इतर कोणत्याही दिवशी घेवू शकता. पण शिक्षणाची कोणतीही गोष्ट शनिवारी खरेदी करू नये.  शनिवारी एक गोष्ट खरेदी करण्यास मनाई आहे ती म्हणजे चप्पल आणि शूज. असे मानले जाते की यामुळे घरात दारिद्य येते.

2. या गोष्टींचे सेवन करू नका : सूडबुद्धीने मिळवलेल्या व वाईट अंतःकरणाच्या गोष्टींचा शनिदेव खूप द्वेष करतात. हे लक्षात ठेवून आपण चुकूनही या दिवशी मांस आणि मद्याचे सेवन करू नये. शनिवारी संपूर्ण कुटूंबासह आपण  साधे घरगुती जेवण खाल्ल्यास बरे होईल.

3. असे कराल तर गरीब व्हाल : आपण शनिवारी मीठ विकत घेतल्यास आणि घरी आणल्यास ते आपल्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखे आहे. शनिवारी मीठ खरेदी केल्यास आपण गरीब होऊ शकता. इतकेच नाही तर शनिवारी तुम्ही मीठ घेऊ नये किंवा कोणालाही देऊ नये. असे केल्याने तुमच्यावरील कर्ज वाढते.

4. हे करणे टाळा :  शनिवारी आपण चुकूनही आपले केस किंवा दाढी करू नये. या दिवशी पार्लरमध्ये जाऊ नये आणि केस कापू नयेत यासाठीही स्त्रियांनी देखील काळजी घ्यावी. नखे देखील कापू नयेत. असे केल्याने शनि दोष होतो.

5. शनीदेवाचे दर्शन करतना ही चूक करू नका : शनिवारी मंदिरात शनिदेवाचे दर्शन घेण्यास गेला तर लक्षात ठेवा की चुकूनही त्यांच्या डोळ्यांमध्ये पाहू नका. असे करणे म्हणजे शनिदेवचा अपमान मानला जातो आणि यामुळे शनिदेव क्रोधीत होतात.

सरपंच हत्येप्रकरणी मोठी अपडेट आल्यानंतर धनंजय देशमुख यांची मागणी काय?
सरपंच हत्येप्रकरणी मोठी अपडेट आल्यानंतर धनंजय देशमुख यांची मागणी काय?.
संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांकडून मोठी अपडेट, कराडसह आरोपींवर..
संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांकडून मोठी अपडेट, कराडसह आरोपींवर...
प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याचं कारण समोर, पक्षाकडून मनधरणी अन्...
प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याचं कारण समोर, पक्षाकडून मनधरणी अन्....
साटम-शेलार अन् रंगा-बिल्याची खैर नाही, भाजप नेत्यावर मनसेचा निशाणा
साटम-शेलार अन् रंगा-बिल्याची खैर नाही, भाजप नेत्यावर मनसेचा निशाणा.
...तोपर्यंत घाई नको, मनसे-ठाकरे सेनेच्या युतीबाबत राज ठाकरेंची भूमिका
...तोपर्यंत घाई नको, मनसे-ठाकरे सेनेच्या युतीबाबत राज ठाकरेंची भूमिका.
आता तो विषय संपला...नाराजीच्या मुद्द्यावर मुनगंटीवारांचं स्पष्टच भाष्य
आता तो विषय संपला...नाराजीच्या मुद्द्यावर मुनगंटीवारांचं स्पष्टच भाष्य.
प्रशांत जगतापांचा पुणे शहर अध्यक्षपदाचा राजीनामा, तातडीन मुंबईला रवाना
प्रशांत जगतापांचा पुणे शहर अध्यक्षपदाचा राजीनामा, तातडीन मुंबईला रवाना.
राणे बंधूंमधील राजकीय संघर्ष टोकाला,16 जानेवारीनंतर मोठा बॉम्ब फुटणार?
राणे बंधूंमधील राजकीय संघर्ष टोकाला,16 जानेवारीनंतर मोठा बॉम्ब फुटणार?.
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय.
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?.