AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hanuman Jayanti 2023 : हनुमान जयंतीला या सात गोष्टी चुकूनही करू नका, अन्यथा भोगावी लागतील अशुभ फळं

Hanuman Jayanti 2023 : हनुमान जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात 6 एप्रिल 2023 रोजी साजरा केला जाईल. या दिवशी पूजा करताना काही चुका प्रकर्षाने टाळणं गरजेचं आहे. चला जाणून घेऊयात याबाबत

Hanuman Jayanti 2023 : हनुमान जयंतीला या सात गोष्टी चुकूनही करू नका, अन्यथा भोगावी लागतील अशुभ फळं
Hanuman Jayanti 2023 : हनुमान जयंतीला या चुका करणं टाळा, नाही तर पश्चाताप करण्याची येईल वेळ
| Updated on: Apr 05, 2023 | 6:41 PM
Share

मुंबई – चैत्र पौर्णिमा म्हणजेच हनुमंताची जन्मतिथी..या दिवशी मोठ्या उत्साहाने हनुमान जयंती साजरी केली जाते. यंदा 6 एप्रिल 2023 रोजी हनुमान जयंती आहे. हनुमान भक्त मोठ्या श्रद्धेने या दिवशी मारुतीरायाची पूजाविधी करतात. त्रेतायुगात हनुमान यांचा जन्म चैत्र पौर्णिमेला मंगळवारी झाला होता. यामुळे मंगळवार बजरंगबलींना समर्पित आहे. या दिवशी सुंदरकांड, हनुमान चालीसा, मारुती स्त्रोताचं पठण केल्यास चांगलं फळ मिळतं.

हनुमान जयंती तिथी

चैत्र पौर्णिमा तिथी 5 एप्रिल 2023, सकाळी 9 वाजून 19 मिनिटांनी सुरु झाली आहे. चैत्र पौर्णिमा तिथी समाप्ती 6 एप्रिल 2023, सकाळी 10 वाजून 4 मिनिटं असेल. उदयतिथीनुसार हनुमान जयंती 6 एप्रिल 2023 रोजी साजरी केली जाईल.

हनुमान जयंतीला या गोष्टी चुकूनही करु नका

  • सुतक कालावधी – हनुमंताची पूजा कधीही सुतक काळात करू नये. म्हणजेच घरात किंवा जवळच्या नातेवाईकाचा मृत्यू झाल्यास सुतक लागतं. सुतक काळ 13 दिवसांसाठी पाळला जातो. या काळात पूजा विधी केली जात नाही.
  • स्त्रियांचा स्पर्श – चिरंजीवी बजरंगबली हे ब्रह्मचर्य आहेत. त्यामुळे हनुमान जयंतीला स्त्रियांनी त्यांना स्पर्श करू नये. या दिवशी ब्रह्मचर्याचं मोठ्या सक्तीनं पालन केलं जातं.
  • चरणामृत स्नान – हनुमान जयंतीला बजरंगबलीच्या चरणामृताचं स्नान करू नये. त्यांच्या पुजेत चरणामृत करण्याची पद्धत नाही.
  • काळे पांढरे वस्त्र घालू नका – बजरंगबलीच्या पूजेत चुकूनही काळे किंवा पांढरे वस्त्र घालू नये. यामुळे अशुभ परिणाम भोगावे लागतात.
  • खंडीत प्रतिमा किंवा मूर्ती – हनुमान जयंतीला बजरंगबलीच्या तुटक्याफुटक्या मूर्ती किंवा छबीचा वापर करू नये. कारण खंडित मूर्तीमुळे अशुभ फळं मिळतात.
  • मीठ – हनुमान जयंतीला मिठाचं सेवन करू नये. तसेच ज्या वस्तू तुम्हाला दान करायच्या आहेत त्यातही मिठ नसेल याची काळजी घ्यावी.
  • मास आणि मद्य – हनुमान जयंतीला मास आणि मद्याचं सेवन करू नये. तसेच शारीरिक संबंध ठेवू नये. तसेच रागाच्या भरात कोणताही अपशब्द वापरू नये.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
संविधानाशी द्रोह करणाऱ्यांचा शेवट कायद्यानेच होईल; सुनावणीनंतर...
Sanjay Raut On Shivsena Hearing | आम्ही निश्चिंत आहोत...संविधानाशी द्रोह करणाऱ्यांचा शेवट कायद्यानेच होईल; सुनावणीनंतर संजय राऊतांचा इशारा!
...अन् ते थेट कोर्टाच्या रेकॉर्डवर आलं.’ राऊतांनी सांगितली कोर्टातील म
Sanjay Raut | ...अन् ते थेट कोर्टाच्या रेकॉर्डवर आलं.’ राऊतांनी सांगितली कोर्टातील महत्त्वाची बाब
देशाच्या संविधानावर विश्वास...राऊतांच्या एका पोस्टने रंगवलं राजकारण
Sanjay Raut | देशाच्या संविधानावर विश्वास..., खेळ कायदेशीर मार्गानेच आटोपतोय... संजय राऊतांच्या एका पोस्टने रंगवलं राजकारण
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे...
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे दृश्य पाहाच!
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं....
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं बरळण्यापेक्षा...
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर, एका वाक्यातच...
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी अखेर Metaने मागितली माफी, पहा व्हिडीओ
वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळ
Walmik Karad | वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळबळ
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत?
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?