या तीन गोष्टी बायकोला पण सांगू नका, चाणक्यांनी दिला सुखी संसाराचा मंत्र

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला आहे. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी असं म्हटलं आहे की, काही गोष्टी या अशा असतात ज्या कोणालाच सांगता कामा नये.

या तीन गोष्टी बायकोला पण सांगू नका, चाणक्यांनी दिला सुखी संसाराचा मंत्र
chankya
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 26, 2026 | 10:09 PM

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये ज्या गोष्टी सांगितल्या आहेत, त्या गोष्टी आजही अनेकांना प्रेरणा देतात. माणसानं आपलं आयुष्य कसं जगावं? याबद्दल चाणक्य यांनी अनेक गोष्टी आपल्या या ग्रंथामध्ये सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात माणसाचं आयुष्य हे चढ -उताराने भरलेलं असतं, अनेकदा तुमच्या आयुष्यात संकट येतात. जशी संकट येतात तशी ती निघून देखील जातात. मात्र त्या काळात संयम ठेवणं महत्त्वाचं असतं. पुढे चाणक्य असे देखील म्हणतात की तुमच्या आयुष्यात जी काही संकट येतात त्यातील अनेक संकट ही तुम्ही तुमच्या हाताने तुमच्यावर ओढून घेतलेली असतात. जर तुम्हाला अशी संकट टाळायचे असतील तर तुम्हाला तुमच्या जीभेवर नियंत्रण ठेवणं गरजेचं असतं, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

आर्य चाणक्य म्हणतात आपल्या आयुष्यात अशा काही गुप्त गोष्टी असतात ज्या तुम्ही कधीही कोणालाही सांगितल्या नाही पाहिजेत. अगदी आपल्या पत्नीला देखील या गोष्टी तुम्ही सांगू नका, अन्यथा तुमचा संसार अडचणीत येऊ शकतो. तुम्ही मोठ्या संकटात सापडण्याची शक्यता असते. पहिली गोष्ट म्हणजे जर लग्नापूर्वी तुमचं प्रेम प्रकरण असेल आणि लग्न झाल्यानंतर तुम्ही तुमच्या  बायकोसोबत प्रामाणिक असाल तर तुमच्या लग्नापूर्वीच्या प्रेम प्रकरणाची माहिती कधीही बायकोला देऊ नका, त्यामुळे ती तुमच्यावर संशय व्यक्त करू शकते, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

चाणक्य पुढे म्हणतात तुमची एखादी कमजोरी असेल किंवा कमकूवत बाजू असेल तर त्याची माहिती देखील कधीही बायकोला देऊ नका, अडचणीच्या काळात त्यामुळे तुम्ही संकटात सापडू शकतात.  त्याचप्रमाणे जर तुमचा कोणी अमपान केला असेल जोपर्यंत तुम्ही तुमच्या अपमानाचा बदला घेत नाहीत, तोपर्यंत या गोष्टीची माहिती देखील कोणालाच देऊ नका असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us