AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : आयुष्यात यश मिळवायचंय? मग चाणक्यांच्या या तीन नियमांचं पालन कराच

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, तसेच ते कुटनीतीतज्ज्ञ देखील होते. माणसानं आपल्या आयुष्यात यशस्वी होण्यासाठी काय करावं? याबद्दल अनेक गोष्टी चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये सांगितल्या आहेत, त्यातीलच काही गोष्टींबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

Chanakya Niti : आयुष्यात यश मिळवायचंय? मग चाणक्यांच्या या तीन नियमांचं पालन कराच
chankya Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 25, 2026 | 7:55 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ तसेच कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. माणसानं आपलं आयुष्य कसं जगावं? याचं थोडक्यात सार चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये सांगितलं आहे. चाणक्य यांनी धनानंदासारख्या बलाढ्य राजाचा पराभव करून चंद्रगुप्तला राज्य दिलं आणि आपल्या अपमानाचा बदला घेतला अशी आख्यायिका आहे. चाणक्य यांनी आपल्या आयुष्यात मोठं यश मिळवलं होतं. त्यामुळे माणसानं आयुष्यात यश कसं मिळवावं? याबद्दल अनेक गोष्टी चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात ज्याच्याकडे संयम असतो, त्याला जगातील कोणतीही ताकद कधीही पराभूत करू शकत नाही. जर तुमचा एकदा पराभव झाला असेल तर त्याला घाबरून प्रयत्न करणं सोडू नका, जर तुम्ही प्रयत्न सोडले तर तो तुमचा खरा पराभव असतो, मात्र पूर्वीच्या अनुभवातून धडा घेऊन जो माणूस प्रयत्न करतो, तो त्याच्या आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो. माणसाला जर त्याच्या आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर त्याच्याकडे तीन गुण असणं गरजेचं असतं, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे त्याबद्दल?

कष्ट – आर्य चाणक्य म्हणतात या जगात कष्टाला पर्याय नाही. तुम्हाला कोणतीही गोष्ट मिळवायची असेल तर त्यासाठी तुम्हाला कष्ट हे करावेच लागणार आहेत.जर तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट केले तर या जगात अशी कोणतीही ताकद नाही, जी तुम्हाला यशस्वी होण्यापासून थांबवू शकेल. त्यामुळे तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये आहात, त्या क्षेत्रात प्रामाणिकपणे कष्ट करा. खूप कष्ट करा, तर आणि तरच तुम्हाला यश मिळू शकतं. कष्ट ही अशी शिडी आहे, जी तुम्हाला यशाच्या मार्गापर्यंत पोहोचवणार आहे, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

नवीन शिकण्याची इच्छा – चाणक्य म्हणतात माणसानं कधीही शिकणं बंद करू नये, तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत आहात, त्या क्षेत्रामध्ये सतत काही न काही नवीन गोष्टी येत असतात. जर तुम्हाला तुमच्या क्षेत्रात यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला त्या सर्व नवीन गोष्टी आत्मसात केल्या पाहिजेत. कोणतंही काम ताकदीच्या बळावर करण्याऐवजी त्यासाठी डोक्याचा वापर करा ते काम स्मार्ट पद्धतीने करा. तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत आहात, त्या क्षेत्रातील बारकावे शिकून घ्या आणि काम परफेक्ट करा असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

प्रामाणिकपणा – आर्य चाणक्य म्हणतात तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करत असाल तिथे कामात प्रामाणिकपणा ठेवा. जर तुम्ही प्रामाणिकपणे काम केल तर तुम्ही आयुष्यात नक्कीच एक न एक दिवस यशस्वी होणार आहात. पण जर तुमच्या कामात प्रामाणिकपणा नसेल तर तुम्हाला समाधान लाभणार नाही. त्यामुळे प्रामाणिकपणा महत्त्वाचा आहे, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
भोंदू खरातनंतर आणखी एका बुवाचं थक्क करणारं कांड, अमावस्येच्या रात्री..
भोंदू खरातनंतर आणखी एका बुवाचं थक्क करणारं कांड, अमावस्येच्या रात्री...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का, खासदार उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? राजका
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का, खासदार उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? राजका.
वाल्मिक कराडला जेलमध्ये टीव्ही, व्हीआयपी ट्रीटमेंट अन्... कैद्याची नवी
वाल्मिक कराडला जेलमध्ये टीव्ही, व्हीआयपी ट्रीटमेंट अन्... कैद्याची नवी.
विदर्भात उष्णतेची लाट कायम; अकोल्यात 45°C, नागपुरात पारा 44°C पार
विदर्भात उष्णतेची लाट कायम; अकोल्यात 45°C, नागपुरात पारा 44°C पार.
मुख्यमंत्री आणि ठाकरे भेटः 'प्रबुद्ध भारत'च्या संपादकांचा खळबळजनक दावा
मुख्यमंत्री आणि ठाकरे भेटः 'प्रबुद्ध भारत'च्या संपादकांचा खळबळजनक दावा.
ठाकरे–फडणवीस गुप्त भेटीच्या चर्चांवर मुनगंटीवारांचे स्पष्टीकरण
ठाकरे–फडणवीस गुप्त भेटीच्या चर्चांवर मुनगंटीवारांचे स्पष्टीकरण.
ऑपरेशन टायगरबाबत मोठी अपडेट, 'अनेक नेते आमच्या संपर्कात, त्यापैकी...'
ऑपरेशन टायगरबाबत मोठी अपडेट, 'अनेक नेते आमच्या संपर्कात, त्यापैकी...'.
बागेश्वर बाबाच्या '४ मुले जन्माला घाला' वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस...
बागेश्वर बाबाच्या '४ मुले जन्माला घाला' वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस....
विधानपरिषद निवडणुकीत नवा ट्विस्ट, शिरसाटांचा मोठा दावा- ठाकरेच उमेदवार
विधानपरिषद निवडणुकीत नवा ट्विस्ट, शिरसाटांचा मोठा दावा- ठाकरेच उमेदवार.
राघव चड्ढा यांच्यासारखं... पंजाबमधील घडामोडींवर भाजप नेत्याचं मोठं विध
राघव चड्ढा यांच्यासारखं... पंजाबमधील घडामोडींवर भाजप नेत्याचं मोठं विध.