AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराण -अमेरिकेमध्ये मध्यस्थी तर केली, पण आता पाकिस्तानवर हातात कटोरं घेण्याची वेळ, तब्बल 200 अब्ज रुपयांचा फटका

अमेरिका आणि इराणमध्ये युद्धाच्या 40 व्या दिवशी युद्धविराम झाला. या युद्धविरामासाठी पाकिस्तानने पुढाकार घेतला होता. मात्र आता पाकिस्तानच्या अडचणी वाढल्या असून, तब्बल 200 कोटी रुपयांचा फटका बसला आहे.

इराण -अमेरिकेमध्ये मध्यस्थी तर केली, पण आता पाकिस्तानवर हातात कटोरं घेण्याची वेळ, तब्बल 200 अब्ज रुपयांचा फटका
Shahbaz SharifImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 26, 2026 | 9:49 PM
Share

अमेरिका इराण आणि इस्त्रायलमध्ये तब्बल 40 दिवस युद्ध सुरू होतं. शेवटी 40 व्या दिवशी अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविराम झाला. या युद्धविरामासाठी पाकिस्तानने मध्यस्थी केली, मात्र आता हादरवणारी माहिती समोर आली आहे, अमेरिका आणि इराणमध्ये मध्यस्थी करणाऱ्या पाकिस्तानला तब्बल 200 अब्ज रुपयांचं नुकसान झालं आहे. पाकिस्तामध्ये आधीच महागाईचा आगडोंब उसळला आहे. वारंवार पाकिस्तानला कर्ज घेण्याची गरज पडत आहे, अशातच आता पाकिस्तानला तब्बल 200 अब्ज रुपयांचं नुकसान झालं आहे. अमेरिका आणि इराणमध्ये 40 दिवस युद्ध सुरू होतं. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणकडून स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद करण्यात आला होता. दरम्यान आता अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविराम झालेला असताना देखील अजूनही स्ट्रेट ऑफ होर्मूज सुरू करण्यात आलेला नाहीये. याचा मोठा फटका जगातील जवळपास सर्वच देशांना बसला आहे.

जगाला जेवढ्या कच्च्या तेलाची गरज आहे, त्यातील तब्बल 25 टक्के तेलाची वाहतूक एकट्या स्ट्रेट ऑफ होर्मूजमधून होते. मात्र हा मार्ग सध्या बंद असल्यामुळे जगासमोर मोठं संकट निर्माण झालं आहे. जे देश कच्चं तेल आणि एलपीजी साठी संपूर्णपणे इतर देशांवर अवलंबून आहेत, त्या देशांना याचा सर्वात मोठा फटका बसला आहे. यामध्ये पाकिस्तानचा देखील समावेश आहे. पाकिस्तान मोठ्या प्रमाणात इतर देशांकडून कच्च्या तेलाची आयात करतो, मात्र सध्या स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद असल्यामुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान होत आहे. देशातील कच्च्या तेलाचा साठा संपला आहे. पेट्रोल -डिझेलच्या दरात प्रचंड वाढ करण्यात आली आहे.

एवढंच नाही तर पाकिस्तानमध्ये वीजेची देखील कमतरता भासत असल्याने मोठ्या प्रमाणात लोडशेडिंगची समस्या निर्माण झाली आहे, ज्याचा थेट परिणाम हा उत्पादनावर झाला आहे. सरकारने ऊर्जेची कमतरता भरून काढण्यासाठी जी पाऊले उचलली आहेत, त्यावर देखील तेथील नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. युद्ध सुरू झाल्यापासून ते आतापर्यंत पाकिस्तानला तब्बल 200 अब्ज रुपयांचं नुकसान झालं आहे. जर परिस्थिती आणखी काही दिवस अशीच राहील तर समस्या आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल