देवभूमीला 23 मोठ्या ग्लेशियरपासून धोका, 25 KM बर्फाने मोठे टेन्शन, नेपाळची पुनरावृत्ती ? संशोधनात काय उघड?
उत्तराखंडातील भारतीय मध्य हिमालयात २३ ग्लेशियर्सने १९९० ते २०२४ च्या दरम्यान २५.६ किलोमीटर बर्फ गायब झाला आहे. वाडिया इन्स्टिट्यूट आणि यूपीईएसचे संशोधन

उत्तराखंडातील ग्लोबल वार्मिंग आणि पर्यावरणातील बदलाच्या धोक्याची चाहूल दाखवणारे एक संशोधन पुढे आले आहे.यामुळे संशोधकांनासह पर्यावरण तज्ज्ञांची चिंता वाढवली आहे. भारतीय मध्य हिमालयातील ग्लेशियर वेगाने मागे सरकत आहे. ही बाब एका वैज्ञानिक संशोधनातून समोर आली आहे. UPES, डेहरादून आणि वाडिया इन्स्टीट्यूट ऑफ हिमालयन जियोलॉजीच्यआ संशोधकांचे हे संशोधना १५ सप्टेंबर २०२६ च्या Discover Geoscience मध्ये प्रसिद्ध झाले आहे.
अभ्यासात १९९०-२०२४ च्या दरम्यान प्रकाशित संशोधन, फील्ड सर्व्हे, सॅटेलाईट इमेजरी, DEM आणि अन्य उपलब्ध स्टडीचा यात उल्लेख केला आहे. या संशोधनात २३ प्रमुख ग्लेशियरसाठी २५,६२१ मीटरचे एकूण घसरण नोंदली गेली आहे.
अभ्यासात एका भागात ग्लेशियरचा सरासरी मागे हटण्याचा ( Retreat Rate ) २३.२३ मीटर प्रति वर्षे सांगितले जात आहे. तर अहवालात दिलेल्या समरी टेबलमध्ये arithmetic mean २४.६३ मीटर प्रति वर्ष असे म्हटले जात आहे. म्हणजे अहवालात या ग्लेशियरच्या सरासरी घसरणी संदर्भात असंगती सांगितली जाते.
सर्वात वेगाने ग्लेशिअर घसरतंय
सर्वात मागे घसरण्यात टिहरी गढवाल येथील खातलिंग ग्लेशियरचा समावेश आहे. ज्या घसरणीचा वेग १९६५-२०१४ दरम्यान सरासरी ८८ मीटर प्रति वर्ष नोंदली गेली आहे. या काळात हा ग्लेशियर सुमारे ४.३४ किमी मागे हटले होते. यामुळे ग्लेशियर छोट्या भागात तुटले आहे.
घसरणीचा वेग
पिंडारी (Pindari) येथे साल २०००-२०१८ मध्ये ४५.८ मीटर/ वर्ष
मिलाम ( Milam)साठी १९७२-२०१८ मीटर/वर्ष
गंगोत्री (Gangotri)साठी १९३२-२००४ मध्ये सुमारे २२ मीटर/ वर्ष
चोराबाडी (Chorabari)साठी ६.८ मीटर/वर्ष
भागीरथी (Bhagirathi)साठी ३.७ मीटर/वर्ष
सतोपंथ (Satopanth) वेगवेगळ्या दर मीटर वेगवेगळे दर
१९६२-२०२० साठी ६.२ मीटर/वर्ष
