AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Door Vastu Tips : दाराशी संबंधित वास्तुदोषामुळे येते दुर्भाग्य, दूर करण्यासाठी करा हे उपाय

घर बांधताना सर्वप्रथम मुख्य दरवाजाच्या दिशेकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. वास्तूनुसार पूर्व दिशेला बांधलेला मुख्य दरवाजा खूप शुभ मानला जातो. असे मानले जाते की या दिशेला बनवलेले मुख्य द्वार घराच्या प्रमुखासाठी भाग्यवान सिद्ध होते आणि त्याला विविध स्त्रोतांमधून उत्पन्न मिळते.

Door Vastu Tips : दाराशी संबंधित वास्तुदोषामुळे येते दुर्भाग्य, दूर करण्यासाठी करा हे उपाय
दाराशी संबंधित वास्तुदोषामुळे येते दुर्भाग्य
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Nov 08, 2021 | 7:07 PM
Share

मुंबई : अन्न, वस्त्र आणि निवारा या जीवनाच्या तीन मूलभूत गरजा आहेतय यापैकी एक असलेले स्वप्नातील घर बनवताना आपण वास्तु नियमांची विशेष काळजी घेतली पाहिजे. ज्या लोकांना सुख-समृद्धी हवी असेल, त्यांनी विशेषत: घराचा मुख्य दरवाजा नेहमी वास्तुनुसारच बनवावा, कारण अशा प्रकारे तुमच्या घरात सुखाचे आगमन होते. जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्या घरात अचानक कलह आणि त्रास वाढू लागला आहे आणि तयार केलेले काम बिघडू लागले आहे, तर तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाशी संबंधित या वास्तु नियमांनुसार एकदा लक्ष द्यावे. तसेच मुख्य दरवाजाशी संबंधित वास्तू दोष लवकरात लवकर दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

या दिशेला शुभ असतो मुख्य दरवाजा

घर बांधताना सर्वप्रथम मुख्य दरवाजाच्या दिशेकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. वास्तूनुसार पूर्व दिशेला बांधलेला मुख्य दरवाजा खूप शुभ मानला जातो. असे मानले जाते की या दिशेला बनवलेले मुख्य द्वार घराच्या प्रमुखासाठी भाग्यवान सिद्ध होते आणि त्याला विविध स्त्रोतांमधून उत्पन्न मिळते. इंद्र हा पूर्व दिशेचा स्वामी आहे. मुख्य दरवाजा या दिशेला केल्याने त्या घराच्या प्रमुखाची प्रत्येक इच्छा पूर्ण होते.

घराच्या दारांची संख्या किती असावी

वास्तूनुसार घराच्या दारांची संख्या कधीही विषम नसावी. वास्तूमध्ये हा एक मोठा दोष मानला जातो. अशा स्थितीत तुम्ही घरामध्ये दरवाज्यांची संख्या नेहमी 2, 4, 6, 8, 12 ठेवू शकता, परंतु दरवाजांची संख्या चुकूनही 10 असू नये, कारण वास्तूमध्ये हे शुभ मानले जात नाही.

मुख्य दरवाजाचा आकार किती असावा

घराचे मुख्य प्रवेशद्वार बनवताना, त्याच्या आकाराकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. वास्तू सुंदर बनवण्याच्या प्रक्रियेत नियमांकडे कधीही दुर्लक्ष करू नये. वास्तूनुसार मुख्य दरवाजाची लांबी नेहमी रुंदीच्या दुप्पट असावी.

मुख्य दरवाजाला वास्तूनुसार रंग द्या

वास्तूनुसार घराच्या मुख्य दरवाजाची दिशा आणि आकार याशिवाय त्याच्या रंगावरही विशेष लक्ष दिले पाहिजे. वास्तु नियमांनुसार घराच्या मुख्य दरवाजाला पांढरा, हलका निळा किंवा हलका हिरवा रंग लावणे नेहमीच शुभ असते. मुख्य दरवाजा कधीही काळ्या रंगाने रंगवू नका.

दाराशी संबंधित वास्तु दोष आणतो दुर्भाग्य

जर तुमच्या घराचे दरवाजे उघडताना किंवा बंद करताना आवाज येत असेल किंवा ते उघडताना किंवा बंद करताना काही अडचण येत असेल तर ती ताबडतोब दुरुस्त करा, कारण दाराशी संबंधित अशा दोषांमुळे मोठ्या प्रमाणात कलह आणि दुर्भाग्य निर्माण होते. (Door Vastu Tips, do this remedies for remove your architectural defects)

इतर बातम्या

Chhath Puja 2021: दिल्लीत यमुना नदीच्या विषारी फेसाच्या पाण्यात भाविकांनी केली छठ पुजा ! बघा फोटो

Shiv Puja Tips | सर्व प्रकारचे भय, रोग, दुःख दूर होतील, महादेवाच्या पुजेत 5 गोष्टी केल्यास इच्छाप्राप्ती होईल

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?