Dussehra 2022: ना रावण, ना कुंभकरण रामायणात हा होता सर्वात शक्तिशाली राक्षस

रामायणात राम आणि रावण हे जरी मुख्य पात्र असले तरी याशिवाय आणखी एक पात्र असे होते जे रावणापेक्षाही बलवान होते.

Dussehra 2022: ना रावण, ना कुंभकरण रामायणात हा होता सर्वात शक्तिशाली राक्षस
मालिकेतील मेघनादचे पात्र
Image Credit source: Social Media
नितीश गाडगे

|

Oct 05, 2022 | 6:54 PM

मुंबई, जेव्हा आपण महाभारत आणि रामायणासारखे (Ramayan Story) ग्रंथ वाचतो तेव्हा आपले लक्ष नायक आणि खलनायकांवर जास्त असते. सहसा ज्यांचे पात्र या दोन विभागात येत नाही त्या पात्रांकडे आपण फारसे लक्ष देत नाही. असेच एक पात्र होते रावणाचा मुलगा इंद्रजित (Son Of Rawan) म्हणजेच मेघनाद (Meghnad). इंद्रजित रावणाच्या सैन्यात होता. तो खूप शक्तिशाली, कुशल आणि निष्ठावान होता. असे म्हणतात की, सर्व पराक्रमी देवही त्याच्यापुढे कमी पडले. फारसा प्रसिद्धीत न आलेल्या इंद्रजितबद्दल काही आख्यायिका.

1. रावणाचा कर्तृत्ववान पुत्र

आपल्याला माहित आहे की रावण खूप शक्तिशाली होता. त्याला एक कुशल पुत्र हवा होता. त्यावेळी पृथिलोकावर रावणाची दहशत होती. रावणाच्या भीतीमुळे ग्रहांनी अशी वेळ तयार केली, त्यामुळे रावणाच्या पुत्राचा जन्म शुभ मुहूर्तावर झाला. परिणामी रावणाच्या मुलाला चांगले आयुष्य मिळाले.

2. जन्मानंतर ज्याच्या रडण्याने आकाशात झाला गडगडाट

रावणाच्या पुत्राला रावणाची पत्नी मंदोदरीने जन्म दिला. आणि जेव्हा तो जन्माला आला तेव्हा त्याच्या रडण्याच्या आवाजाने आकाशात गडगडाट झाला. त्यामुळे त्याचे नाव मेघनाद ठेवण्यात आले.

3. पराक्रमी योद्धा होण्याची तयारी

मेघनादाला शुक्रदेवाने शिक्षण दिले होते. शुक्र हे असुरांचे गुरू होते. त्यांचे अनेक प्रसिद्ध शिष्यही होते. त्यापैकी प्रल्हाद, बळी आणि भीष्म असे काही प्रसिद्ध आहेत. शुक्राने मेघनादाला त्यांना युद्धाची सर्व रहस्ये शिकवली. मेघनादने त्याच्याकडून सर्व शस्त्रे आणि रणनीती जाणून घेतली. त्याने त्यात प्रभुत्व मिळवले. युद्धव्यतिरिक्त, मेघनादने जादूटोण्याच्या कला देखील शिकल्या, ज्या त्या वेळी फार कमी लोकांना अवगत होत्या.

4. इंद्राचा पराभव करून स्वर्गावर विजय

देव आणि असुर नेहमी एकमेकांशी लढत असत. यापैकी एका युद्धात रावण आणि मेघनाद यांनीही भाग घेतला होता. युद्धात रावणाचा पराभव होऊन तो बेशुद्ध झाला. मेघनाद संतापला आणि त्याने इंद्राशी युद्ध केले. त्याने इंद्राचा पराभव करून त्याला आपल्या रथात बांधून पृथ्वीवर नेले. ब्रह्मदेवाला भीती वाटली की मेघनाद देवांचा राजा इंद्राचा वध करेल. म्हणून ब्रह्मदेवाने मेघनादांना वरदानाच्या बदल्यात इंद्राला सोडण्यास सांगितले.

5. कोणत्याही युद्धात पराभूत न होण्याचे वरदान

मेघनादांनी अमरत्वाचे वरदान मागितले. ब्रह्मदेव म्हणाले की हे निसर्ग नियमांच्या विरुद्ध आहे. त्यामुळे ब्रह्मदेवाने त्याला युद्धात पराभूत न होण्याचे वरदान दिले. मेघनादला एक वरदान मिळाले की त्याला कोणीही पराभूत करू शकणार नाही. पण एका अटीवर की युद्धात जाण्यापूर्वी त्याला यज्ञ करावा लागेल आणि आपल्या आराध्य देवीची पूजा करावी लागेल. इंद्राचा पराभव केल्यामुळेच ब्रह्मदेवाने मेघनादचे नाव इंद्रजित ठेवले.

6. रामायणाच्या युद्धात त्याने एकट्याने वानरसेनेचा पराभव केला

रावणाचा पराभव आणि कुंभकर्णाचा मृत्यू झाल्यानंतरच इंद्रजित युद्धात उतरला. युद्धात त्याने आपले सर्व भाऊ गमावले होते. तो अजिंक्य होता. ज्या दिवशी तो युद्धात उतरला त्याच दिवशी त्याने रामाच्या सैन्यात आपली दहशत पसरवली. युद्धादरम्यान त्याला कोणीही पराभूत करू शकले नाही.

7. रामाला कळले इंद्रजिताचे रहस्य

इंद्रजीतला वाटले की, आपण हे रामासोबतचे युद्ध सहजासहजी जिंकू शकणार नाही. त्यामुळे युद्धात उतरण्यापूर्वी यज्ञ करण्याचा निर्णय घेतला. रावणाचा भाऊ विभीषण हा चांगला माणूस होता. सीतेचे अपहरण अजिबात योग्य नाही असे त्यांचे मत होते. त्याने राम आणि लक्ष्मणाला इंद्रजित अजिंक्य असण्याचे रहस्य सांगितले. त्यानंतर लक्ष्मण आणि हनुमानाने यज्ञात विघ्न आणले. पूजेच्या ठिकाणी शस्त्र नसावे यज्ञाचा नियम होता. लक्ष्मणानेही हा नियम मोडण्याचा प्रयत्न केला.

8.  लक्ष्मणाविरुद्ध सर्वात भयंकर शास्त्राने वार केला

लक्ष्मणाने आपल्या देवीचा अपमान केल्यामुळे आणि विभीषणाच्या फसवणुकीमुळे इंद्रजितला खूप राग आला. त्याने विभीषणालाही मारण्याचा संकल्प केला पण लक्ष्मणाने विभीषणाला वाचवले. युद्धाच्या शेवटी, इंद्रजितने संपूर्ण सृष्टीतील सर्वात शक्तिशाली तीन शस्त्रे वापरली – ब्रह्मांड अस्त्र, पशुपतास्त्र आणि वैष्णवशास्त्र. यापैकी एकही शस्त्र लक्ष्मणाला स्पर्श करू शकले नाही.

9. राम सर्वसाधारण नसल्याचे जाणवले

वैष्णवस्त्र – विष्णूचे शस्त्र. ज्याने लक्ष्मणाला स्पर्शदेखील केला नाही. इंद्रजितला समजले की लक्ष्मण आणि राम हे सामान्य नाहीत. आपल्या जादुई सामर्थ्याचा वापर करून त्याने लगेच स्वतःला रावणाच्या समोर आणले. सीता परत देण्याची रावणाला प्रार्थनाही केली.

10. रावणाने केला इंद्रजितचा अपमान

सत्तेच्या नशेत रावणाने स्वतःच्या मुलाच्या सल्ल्याला धुडकाविले. जसा रावणाने विभीषणाचा अपमान केला होता तसाच अपमान इंद्रजितचा देखील केला.  युद्धातून पळून जाण्यासाठी त्याने इंद्रजितला भित्रा म्हटले. इंद्रजित संतापला आणि म्हणाला की, मुलगा म्हणून कर्तव्य बजावत राहीन. त्यानंतर रावणानेही सीतेची सुटका करणार नसल्याचे सांगितले.

11. इंद्रजितने आपला पराभव स्वीकारला

इंद्रजितला समजले की त्याचे वडील सीतेला कधीही सोडणार नाहीत. राम आणि लक्ष्मण यांच्यात दैवी गुण  आहे, हेही त्यांना कळून चुकले. लक्ष्मणाच्या हातून आपला मृत्यू स्वीकारून तो शेवटी युद्धात उतरला, पण तरीही त्यांनी हे युद्ध धैर्याने लढले. पण यावेळी लक्ष्मणाने इंद्रजितचा वध केला. लक्ष्मणाने पृथ्वीवरील सर्वात शक्तिशाली योद्धा मारला होता.

हे सुद्धा वाचा

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें